सांगोल्यातील दोघे भीषण कार अपघातात जागीच ठार
झाड उन्मळून पडले, एअर बॅगा कुचकामी
थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
कार पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात सांगोला तालुक्यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला. हे युवक हबिसेवाडी येथील आहेत. हा भीषण अपघात जत तालुक्यातील येळवी गावाजवळ घडला आहे.
गाडीतील दोन्ही एअर बॅगा उघडल्या होत्या. गाडीने ज्या झाडाला धडक दिली ते झाड बुडातून मोडले यावरून गाडी किती वेगाने झाडाला धडकली याचा अंदाज येवू शकतो.
सुखदेव बिरा खरात (वय-३६), दगडू शंकर करांडे (वय ३५ ) अशी अपघातात जागीच ठार झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जत तालुक्यातील येळवीजवळ रस्त्याकडेला चारचाकी गाडी पलटी होवून झालेल्या अपघातात शेजारील सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील हबिसेवाडी येथील दोन जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
सांगोला तालुक्यातील हबिसेवाडी येथील सुखदेव बिरा खरात (वय-३६), दगडू शंकर करांडे (वय ३५ ) व बापू धोंडिबा शिंदे हे त्यांच्या (वय-४० ) हे तिघे त्यांच्या मित्राची इर्टीका (एमएच १० बीएम-८४२८) गाडी घेवून गेले होते. जतहुन गावी हबिसेवाडी येथे निघाले असता येळवी हद्दीतील कुरणाजवळ भरघाव वेगाने निघालेल्या गाडीच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. भरघाव वेगात असलेली गाडी रस्त्याकडेला असलेल्या साइडपट्टीवरून खाली गेली. खाली असलेल्या झाडाला जोराची धडक देवून गाडी पलटी झाली.
एअर बॅगा कुचकामी
गाडीतील दोन्ही एअर बॅगा उघडल्या होत्या. गाडीने ज्या झाडाला धडक दिली ते झाड बुडातून मोडले यावरून गाडी किती वेगाने झाडाला धडकली याचा अंदाज येवू शकतो.
या घटनेत सुखदेव बिरा खरात, दगडू शंकर करांडे या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर बापू धोंडिबा शिंदे हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा