
सांगोला/ नाना हालंगडे
सांगोला तालुक्यात रविवारी परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. अनेक ठिकाणी जुन्या माळवद घराची पडझड झालेली आहे. अशातच रविवारी रात्री 11 वाजलेपासून डिकसळ व परिसरातील गावांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. याच पावसाने येतील सुमन गजानन कुलकर्णी याचे माळवद कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाले.
सांगोला तालुक्यात दुष्काळजण्य परिस्थिती निर्माण झाली असून,सर्वच स्तरातून दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी होत आहे. मात्र, गेली चार दिवसापासून तालुक्यात या परतीच्या पाऊसाने जोर धरला आहे. याच पाऊसाचे हे पूर्वा नक्षत्र असून,याचे वाहन मोर आहे. श्रावणातील हा पाऊस अनेकांना दिलासा देणारा ठरित आहे.
30 ऑगस्ट पासून तालुक्यात हा पाऊस पडत आहे. रविवारी रात्रीच्या पाऊसाने मात्र हाहाकार माजविला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे हा पाऊसही दमदार असाच पाडला. डिकसळ येथील अनेक बळीराजाची पिकेही भुई सपाट झाली.
येतील सुमन गजानन कुलकर्णी यांचे राहते घर आज सकाळी 7 वाजता कोसळले. यामध्ये यांच्या मिरची कांडंप यंत्राचे व वॉशिंग मिशिनचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने त्यावेळी हेच माळवाद रात्रभर गळत असल्याने यांच्या कुटुंबियातील सर्वच जण समोरील पत्रशेडमध्ये होते. यामध्ये यांच्या घराचे 1 लाख 60 हजार रुपयांच्या आसपास नुकसान झाले आहे.
सांगोला तालुक्यात पावसाळी हंगामातील सातव्या नक्षत्राचा हा परतीचा पाऊस मागील चार दिवसापासून सुरू झालेला आहे. त्यामुळे बळीराजा सध्या तरी जाम खुस आहे. याच सुमन कुलकर्णी यांच्या घराबरोबर त्यांचे बंधू सुनील कृष्णाजी कुलकर्णी यांचेही माळवद कोसळले आहे. रात्रभर वीज ही गुल होती.दुपारचे 12 वाजले तरी हा पाऊस सुरूच होता. अनेक बळीराजाची रानातील उभी पिके भुईसपाट झालेली पहावयास मिळाली
कालपासून सुरू असलेला हा दमदार पाऊस मेघगर्जनेसह विजांच्या कडकडटासह झालेला आहे.
कोणतीही जीवितहानी नाही
ही घटना डिकसळ येथे घडली असून,यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र दीड लाखाहून अधिक रुपयाचे नुकसान झाले आहे.याच सुमन कुलकर्णी यांचे तीन जणांचे कुटुंब आहे.
याच पूर्वा नक्षत्रातील हा पाऊस सोमवारी दिवसभर सुरूच होता.याचे वाहन मोर असून हे नक्षत्र 13 सप्टेंबर पर्यंत आहे.या परतीच्या पावसाने बळीराजा सुखावला असून,अजूनही मोठ्या पाऊसाची अपेक्षा आहे.