ताजे अपडेट

सोलापूर विद्यापीठातील 42 संशोधकांना जागतिक मानांकन!

Spread the love

ही संशोधन क्रमवारी गुगल स्कॉलरमधील संशोधकांच्या अद्यावत माहिती वरून तयार केली आहे. त्यामध्ये संशोधकांचे नाव, विद्यापीठाचे नाव, देशाचे नाव तसेच एच इंडेक्स, आय टेन इंडेक्स व सायटेशनचा समावेश आहे. या माहितीवरून संशोधकांची जागतिक, राष्ट्रीय व विद्यापीठातील क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील 42 संशोधक व प्राध्यापकांची या जागतिक क्रमवारीत समावेश झाल्याने प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी त्यांचे अभिनंदन करत आनंद व्यक्त केला आहे.

सोलापूर, दि.4- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील 42 संशोधक व शिक्षकांना जागतिक ए. डी. सायंटिफिक इंडेक्स या संशोधन यादीत मानांकन प्राप्त झाल्याची माहिती प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी दिली.

अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठातील प्रा. मुरत आल्पर आणि प्रा. सिहान डॉजर या दोघांनी संयुक्तपणे आल्पर डॉजर सायंटिफिक इंडेक्स तयार केला आहे. त्यात जगातील 218 देशातील 22350 विद्यापीठातून व 256 विविध शाखांमधून जागतिक संशोधकांची क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये डॉ. गौतम कांबळे, डॉ. विकास घुटे, डॉ. रघुनाथ भोसले, डॉ. विनायक धुळप डॉ. राजीव मेंते, डॉ. अंजना लावंड, डॉ. विकास कडू, डॉ. मुकुंद माळी, डॉ. बाळकृष्ण लोखंडे, डॉ. सदानंद शृंगारे, डॉ. श्रीराम राऊत, डॉ. ज्योती माशाळे, डॉ. अशोक शिंदे, डॉ. उजमा बांगी, डॉ. मकरंद कुलकर्णी, डॉ. दिगंबर झोंबाडे, डॉ. श्रीपाद सुरवसे, उमेश बाराचे, योगेश राजेंद्र, डॉ. विपुल प्रक्षाळे,

महेश अमलवार, दर्शन रुईकर, परशुराम कांबळे, टी. एच. मुजावर, व्ही. डी. बचुवार, मेघना कसबे, अमोल वीर, अमृता जगताप, मधुसूदन बचुटे, श्रीपाद मंतेन, दत्तात्रय सावंत, शिरीष मुळे, रवी मस्के, अमोल काळे, दादासाहेब गोडसे, किरण फाळके, भागवत कौलवार, आनंद चव्हाण, तेजस काडगावकर, सुगंधराज कुलकर्णी, अमोल गजधाने या 42 संशोधक व प्राध्यापकांना जागतिक मानांकन प्राप्त झाले आहे. त्यांनी केलेल्या संशोधन कार्याची दखल घेऊन जागतिक संशोधन क्रमवारीत त्यांना हे यश प्राप्त झाले आहे.

ही संशोधन क्रमवारी गुगल स्कॉलरमधील संशोधकांच्या अद्यावत माहिती वरून तयार केली आहे. त्यामध्ये संशोधकांचे नाव, विद्यापीठाचे नाव, देशाचे नाव तसेच एच इंडेक्स, आय टेन इंडेक्स व सायटेशनचा समावेश आहे. या माहितीवरून संशोधकांची जागतिक, राष्ट्रीय व विद्यापीठातील क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील 42 संशोधक व प्राध्यापकांची या जागतिक क्रमवारीत समावेश झाल्याने प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी त्यांचे अभिनंदन करत आनंद व्यक्त केला आहे. यामुळे सोलापूर विद्यापीठाचे नाव जागतिक स्तरावर पोहोचल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे. प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे व कुलसचिव योगिनी घारे यांनीही या संशोधकांचे अभिनंदन केले आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका