ताजे अपडेट

दरड कोसळून अख्खं गाव ढिगाऱ्याखाली; 100 हून अधिक दगावल्याची भीती

Spread the love

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, वायूदलाशीही मी संवाद साधला. पण बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात येऊ शकत नाही. पाऊस आणि हवामानही खराब आहे. त्यामुळे बचाव पथकाकडून शक्य तितते प्रयत्न करून बचावकार्य सुरू आहे. सध्या तरी आमचे प्राधान्य बचावकार्य वेगाने करण्याला आहे.

रायगड : विशेष प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळगडाच्या पायथ्याशी एका आदिवासी पाड्यावर मोठी दरड कोसळली आहे. यामध्ये १२० हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून आतापर्यंत पाच ते सहा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

एकूण २७ जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलं आहे. यामध्ये दोन ते तीन लहान मुलांचाही समावेश आहे. अनेक रेस्क्यू टीम या ठिकाणी कार्यरत आहेत. रेस्क्यू ऑपरेशन युद्धपातळीवर सुरू असून अडकलेल्या इतर लोकांना बाहेर काढण्यात येत आहे.

इरसाल गडाच्या पायथ्याशी असलेल्या चौक गावापासून ६ किमी डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात आदिवासी वाडी आहे. येथे आदिवासी ठाकूर समाजाची घरे आहेत. या घरांवर दरड कोसळली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या वाडीतील ९० टक्के घरे ढिगाऱ्याखाली गेली असून मोठी जीवितहानी होण्याची भीती आहे.

भूस्खलन होत असून अंधार आणि पाऊसही असल्याने बचावकार्यात प्रचंड अडथळे येत असल्याने बचावकार्य काही वेळासाठी थांबवण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा हे बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. शिवदुर्ग, निसर्ग मित्र, वेध सह्याद्री या टीम्स पोलीस प्रशासनाच्या मदतीने मदतकार्यात सक्रिय आहेत. दुर्घटना झाल्यानंतर काही लोक घाबरून जंगलात पळाले आहेत. ते परतल्यानंतरच वाडीतील नक्की किती जण या दरडीखाली अडकलेले असू शकतात.

कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन घटनास्थळावर दाखल झाले आहेत. पहाटेच मंत्री दादाजी भुसे यांनीही या ठिकाणी येऊन पाहणी केली आहे. मात्र सोसाट्याचा वारा व पाऊस यामुळे त्यांना वरपर्यंत जाता आलं नाही. पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी
घटनेची माहिती मिळताच सकाळी सातच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी दाखल झाले. शिंदे यांनी इर्शाळवाडीतील परिस्थितीचा आढावा घेतला. तसंच संबंधितांना बचावकार्याबाबत सूचनाही केल्या.

राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आपत्कालीन यंत्रणा सतर्क आहेत. आवश्यकता भासेल तिथे लोकांना हलवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. नागरिकांची जीवितहानी होऊ नये, यासाठी आमची यंत्रणा काम करत आहे.

ज्या ज्या ठिकाणी पूराचा धोका आहे, तिथे NDRF तैनात करण्यात आलेलं आहे”, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “इर्शाळवाडी गावात जवळपास 40-45 घरे आहेत. त्यापैकी 15 ते 17 घरे ढिगाऱ्याखाली सापडले आहेत. आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. NDRF, SDRF आणि TDRF यांच्यासह स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे.

इर्शाळवाडी हे गाव उंचावर असल्याने त्याठिकाणी कोणतीही वाहनव्यवस्था, यंत्रसामुग्री पोहोचू शकत नाही. अशा स्थितीत मनुष्यबळाच्या माध्यमातूनच बचावकार्य करण्यात येत आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशीही माझी चर्चा झाली. त्यांनी या घटनेची माहिती घेतली. कोणतीही मदत आवश्यक असल्यास सांगा, असं त्यांनी सांगितलं.

वायूदलाशीही मी संवाद साधला. पण बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात येऊ शकत नाही. पाऊस आणि हवामानही खराब आहे. त्यामुळे बचाव पथकाकडून शक्य तितते प्रयत्न करून बचावकार्य सुरू आहे. सध्या तरी आमचे प्राधान्य बचावकार्य वेगाने करण्याला आहे.

प्राथमिक माहितीनुसार एकूण 48 कुटुंब येथे आहेत. सुमारे 75 जणांना बाहेर काढण्यात यश आले असून 5 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. जखमींवर तातडीने उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मृतांच्या वारसांना सर्वतोपरी मदत राज्य सरकारतर्फे केली जाईल तसेच जखमींचा उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल. आम्ही सारे परिस्थितीवर आणि मदत-बचावकार्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहोत, असंही फडणवीस यांनी म्हटलं.

उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयातील आपत्कालिन नियंत्रण कक्षात पोहचले असून तिथून रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खालापूरनजिक इर्शाळगड परिसरात गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील नागरिकांच्या बचाव आणि मदतकार्याचं संनियंत्रण करीत आहेत.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका