Emergency Alert : तुमच्याही मोबाईलवर आले का धोक्याचा इशारा देणारं नोटिफिकेशन?
वाचा काय आहे प्रकरण
Think Tank News Network
Government Emergency Alert Notification: देशभरातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील बहुसंख्य स्मार्टफोनवर सकाळी १०.२० च्या सुमारास एक इमर्जन्सी अलर्ट आला. म्हणजेच कॉल आला. या इमर्जन्सी अलर्ट कॉलमुळे एकच गोंधळ उडाला. जो तो एकमेकांना याबाबत विचारू लागला. मात्र, चिंता करण्याची गरज नाही.
वाचा काय आहे प्रकरण..
तुमच्याही मोबाईलवर असा अलर्ट आला असेल, तर काळजी करू नका. या कॉलचा कोणताही धोका आलेला नसून, ही केवळ एक चाचणी होती.
केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाने हा अलर्ट जारी केला होता. या माध्यमातून आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये, किंवा मोठ्या संकटावेळी देशातील सर्व नागरिकांना एकाच वेळी सूचना देण्याच्या यंत्रणेची चाचणी घेण्यात आली. यामुळे भविष्यात अशी परिस्थिती निर्माण झाल्यास सर्व नागरिकांना वेळेत अलर्ट मिळणार आहे.
सकाळी १०.२० वाजता इंग्रजीमध्ये सर्वांना एक इमर्जन्सी अलर्ट मिळाला. त्यानंतर काही वेळाने, १०.३१ वाजता मराठीमध्ये देखील पुन्हा एकदा असा अलर्ट मिळाला. सध्याचा अलर्ट हा केवळ चाचणी म्हणून होता, त्यामुळे गोंधळून जाण्याचं किंवा काळजीचं कोणतंही कारण नाही.
यापूर्वी एप्रिल महिन्यात ब्रिटनमध्येही अशाच प्रकारची चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीवेळी ‘कीप काल्म अँड कॅरी ऑन’ असा संदेश यूकेमधील सर्व नागरिकांच्या मोबाईलवर पाठवण्यात आला होता.
ट्रायकडून मेसेज
The Drive tests were conducted to assess the network quality provided by cellular mobile telephone service providers for voice and data services.
अर्थात
व्हॉइस आणि डेटा सेवांसाठी सेल्युलर मोबाइल टेलिफोन सेवा प्रदात्यांद्वारे प्रदान केलेल्या नेटवर्क गुणवत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी ड्राइव्ह चाचण्या घेण्यात आल्या.