थिंक टँक स्पेशल

शहाजीबापूंची किरीट सोमय्यांसाठी परमेश्वराकडे प्रार्थना

Spread the love

थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
भाजप नेते किरीट सोमय्या हे व्हायरल झालेल्या अश्लील व्हिडिओमुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. राज्यभर त्यांच्याविरोधात निदर्शने केली जात आहेत. असे असले तरी “काय झाडी.. काय डोंगार… काय हाटील..” फेम आमदार शहाजीबापू पाटील हे किरीट सोमय्या यांच्या मदतीला धावले आहेत.

“किरीट सोमय्यांचा संबंधित व्हिडीओ खोटा आणि बनावट निघावा, अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो”, असं शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शहाजीबापू पाटील हे त्यांच्या स्पष्ट बोलण्यामुळे सुप्रसिध्द आहेत. “काय झाडी.. काय डोंगार… काय हाटील..” हा त्यांचा डायलॉग अवघ्या महाराष्ट्राचे डोक्यावर घेतला आहे. राज्यात एखादी घटना घडली की बापू नेमके काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहते.

शहाजीबापू पाटलांची देवाकडे प्रार्थना
भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा एक कथित आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोकशाही मराठी या वृत्तवाहिनीने याबाबतच वृत्त दिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. किरीट सोमय्या यांच्या कथित व्हिडीओ लीकप्रकरणावरून विरोधी पक्षाकडून जोरदार टीका केली जात आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी आठ तासांचे व्हिडीओ फुटेज विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे जमा केले आहेत. या आरोपानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

बापूंनी केली प्रार्थना
आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात दुसऱ्या दिवशी याच प्रकरणाची चर्चा होती. पत्रकार सर्व आमदार, मंत्राना गाठून त्यांच्या प्रतिक्रिया विचारत होते. एवढ्यात आमदार शहाजीबापू पाटील तेथे आले.

किरीट सोमय्या यांच्या कथित व्हिडीओबाबत आमदार शहाजीबापू पाटील यांना बोलते करण्यात आले. या कथित व्हायरल व्हिडीओप्रकरणी विरोधकांकडून टीका होत असताना शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी किरीट सोमय्यांसाठी थेट परमेश्वराकडे प्रार्थना केली आहे.

किरीट सोमय्यांच्या व्हायरल व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना शहाजीबापू पाटील म्हणाले, “सरपंचापासून अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत कोणताही लोकप्रतिनिधी असला तरी त्या लोकप्रतिनिधीने नैतिकतेनं वागणं, ही राजकारणातील जबाबदारी आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांची ही व्हिडीओ क्लिप खोटी आणि बनावट निघावी, अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो.”

चौकशीचे आदेश
व्हिडीओची सत्यता तपासावी आणि चौकशी करावी, अशी मागणी सोमय्या यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. याबाबतच पत्रही त्यांनी ट्विटरवरून शेअर केलं. किरीट सोमय्या म्हणाले, “माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असा अत्याचार झालेला नाही. मी देवेंद्र फडणवीस यांना अशा आरोपांच्या व्हिडीओची सत्यता तपासावी आणि चौकशी करावी अशी विनंती केली आहे.”

अनिल परब यांचाकडे सुई
किरीट सोमय्या यांच्या कथित व्हिडिओ प्रकरणी आमदार राणा यांनी स्फोटक विधान केले आहे. या प्रकरणात शिवसेना नेते अनिल परब यांचा हात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका