ताजे अपडेटथिंक टँक स्पेशलराजकारण
Trending

आ. रवींद्र धंगेकरांच्या सत्कारासाठी सकल लोणारी समाज एकत्र

पक्षीय मतभेद टाळून कार्यक्रम यशस्वी करण्याचा निर्धार

Spread the love

लोणारी समाज बांधव विविध राजकीय पक्षांबरोबर संलग्न रित्या काम करत आहेत. परंतु बैठकीमध्ये सर्वानुमते असे ठरवण्यात आले आहे की, पक्षीय मतभेद बाजूला ठेवून सकल लोणारी समाज बांधवांनी एक दिलाने आणि एक मुखाने सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सामील व्हावे.

थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
सांगोला तालुक्यातील लोणारी समाज बांधवांच्या वतीने पुणे कसबा विधानसभा मतदारसंघाचे नूतन आमदार रवींद्रभाऊ धंगेकर यांच्या जंगी सत्काराचे आयोजन सांगोला येथे करण्यात येत आहे. आ. रवींद्र धंगेकरांच्या सत्कारासाठी सकल लोणारी समाज एकत्र आला असून पक्षीय मतभेद बाजूला ठेवून कार्यक्रम यशस्वी करण्याचा निर्धार नुकत्याच झालेल्या बैठकीत करण्यात आला.

सदर बैठकीमध्ये निमंत्रक म्हणून ज्येष्ठ नेते श्री. बाबा करांडे यांची एकमताने निवड करण्यात आली.

वाढदिवसाचे औचित्य साधून लोणारी समाजातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या श्री. धंगेकर प्रेमी समाज बांधव यांच्या उपस्थितीत गणेश मंगल कार्यालयात बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

यावेळी बैठकीमध्ये आ. रवींद्र धंगेकर कसबा- पुणे विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये स्व-कर्तुत्वाने व महाविकास विकास आघाडीच्या मदतीने जे घवघवीत यश संपादन केले व सकल लोणारी समाजाला त्यांच्या माध्यमातून जो मान आणि सन्मान मिळवून दिला त्याबद्दल श्री धंगेकर यांचा सांगोला येथे जंगी सत्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी विचार विनिमय करून संबंधित नेते मंडळींची एकत्रित तारीख व वेळ मिळवण्याचे अधिकार इंजिनिअर उद्योगपती श्री अशोक नरळे- फलटणे व नगरसेवक नवनाथ रानगट यांना सर्वानुमते देण्यात आलेले आहेत.

नियोजन बैठकीस उपस्थित समाज बांधव.

लोणारी समाज बांधव विविध राजकीय पक्षांबरोबर संलग्न रित्या काम करत आहेत. परंतु बैठकीमध्ये सर्वानुमते असे ठरवण्यात आले आहे की, पक्षीय मतभेद बाजूला ठेवून सकल लोणारी समाज बांधवांनी एक दिलाने आणि एक मुखाने सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सामील व्हावे.

सांगोला नगरीमध्ये लोणारी समाजाच्या वतीने उत्स्फूर्तपणे स्वागत व सत्कार करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. सदर सत्कार समारंभामध्ये महाविकास आघाडीच्या प्रमुख नेते मंडळींना सन्मानपूर्वक लोणारी समाजाच्या वतीने निमंत्रित करण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने काँग्रेस पक्षाचे नाना पटोले, राष्ट्रवादीचे अजित पवार, शेतकरी कामगार पक्षाचे भाई जयंत पाटील व आदित्य उद्धव ठाकरे यांना निमंत्रित करण्यात येणार आहे.

कार्यक्रम नियोजन बैठकीस उपस्थित समाज बांधव.

उपस्थित सदर बैठकीमध्ये एक मताने निमंत्रक म्हणून ज्येष्ठ नेते श्री. बाबा करांडे यांना अधिकार देण्यात आले. सध्या
अधिवेशन चालू असल्याने २७ तारखेपर्यंत नेतेमंडळींची तारीख मिळणार नाही, असे श्री अशोक नरळे यांच्या वतीने सांगण्यात आले.

या बैठकीत हा सत्कार कार्यक्रम जंगी स्वरूपात आणि एकदिलाने करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका