ताजे अपडेट

आंबेडकरी चळवळीचा अंगार मनोजभाई संसारे यांचे निधन

Manoj sansare passed away

Spread the love

मनोज संसारे हे आंबेडकरी चळवळीचे लढवय्ये कार्यकर्ते होते. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्यात सक्रिय सहभाग नोंदवला होता. मोठ्या प्रमाणात झालेल्या आंदोलनात त्यांचा मोठा सहभाग होता. त्यांनी आपल्या आयुष्यात आंबेडकरी विचारांवर आधारित राजकारण करण्याचा प्रयत्न केला.

मुंबई : विशेष प्रतिनिधी
आंबेडकरी चळवळीचे लढवय्ये नेते, स्वाभिमानी युथ
रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष मनोजभाई संसारे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीवर शोककळा पसरली आहे. आंबेडकरी चळवळीतील एक लढवय्या धुरंदर तरुण नेता अकाली गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे. (Manoj sansare passed away )

मनोजभाईनी आपल्या आयुष्यात चळवळ जिवंत ठेवण्यासाठी अथक प्रयत्न केले. मनोजभाई संसारे यांची तब्येत मागील काही महिन्यांपासून अत्यंत खराब होतील त्यांना उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते अनेक दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र आज शुक्रवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

मनोजभाई संसारे यांनी स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली होती. महागायक आनंद शिंदे हेही यामध्ये त्यांच्यासोबत होते.

वंचित बहुजन आघाडीकडून फारकत घेतल्यानंतर एमआयएमने स्वबळाचं राजकारण करतानाच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत दलित मतदारांना आकर्षित करण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. त्याचाच एक भाग म्हणून एमआयएमने स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि नगरसेवक मनोज संसारे यांना धारावीतून उमेदवारी जाहीर केली होती.

एमआयएमकडून उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी संसारे यांनी काँग्रेसकडून वडाळ्यातून उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यासाठी त्यांनी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांची भेटही घेतली होती. मात्र गायकवाड यांनी संसारे यांना तिकीट नाकारल्याने त्यांनी धारावीतून लढणाऱ्या गायकवाड यांची कन्या वर्षा गायकवाड यांना शह देण्यासाठीच धारावीची निवड केली होती.

नामांतर लढ्यात अग्रभागी
मनोज संसारे हे आंबेडकरी चळवळीचे लढवय्ये कार्यकर्ते होते. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्यात सक्रिय सहभाग नोंदवला होता. मोठ्या प्रमाणात झालेल्या आंदोलनात त्यांचा मोठा सहभाग होता. त्यांनी आपल्या आयुष्यात आंबेडकरी विचारांवर आधारित राजकारण करण्याचा प्रयत्न केला.

दरवर्षी सहा डिसेंबर रोजी चैत्यभूमी येथे ते आंबेडकरी चळवळीतील सर्व कलाकारांना एकत्र आणून एकाच स्टेजवर कार्यक्रम सादर करत असत. ते स्वतःही अनेक भीमगीते गात असत. मुंबईमध्ये आंबेडकरी चळवळीतील ताकदवान नेता म्हणून मनोज संसारे यांची ओळख होती. त्यांच्या निधनामुळे आंबेडकरी समाजावर शोककळा पसरली आहे.

फक्त बाबासाहेबच आपला नेता
मनोज संसारे यांनी दलित पँथरमध्येही भरीव कामगिरी केली होती. मुंबई प्रांतात त्यांचा दरारा होता. “इथे तुमचा कोणी नेता नाही. आपला फक्त एकच नेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर” असे छातीठोकपणे सांगणारे पॅंथर मनोज भाई संसारे होते.

आंबेडकरी चळवळीतील लढवय्या पॅथर, आक्रमक, प्रभावी वक्ता आणि युथ रिपब्लिकनचा तरूण नेता स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा संस्थापक अध्यक्ष म्हणून भाई मनोज संसारे यांच्या आठवणी कायम राहतील. सायंकाळी बाबू जगजीवनराम रूग्णालय मु़ंबई सेंट्रल येथे दु:खद निघन झाले. वडाळा कोरबा मिठागर या ठिकाणी शनिवारी दुपारी १२ वाजेपर्यत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

गावखेड्यात केले प्रबोधन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अनुसरून मुंबई आणि महाराष्ट्रातील गावपातळीवर आंबेडकर समूहामध्ये ‘स्वाभिमान’ निर्माण करणारे झुंजार पँथर, ‘प्रत्येकाने बना स्वाभिमानी’ हा नारा बुलंद करणारे नेते, शहीद पँथर भाई संगारे यांचा लढवय्या वारसा पुढे नेणारे, मुंबई शहरात वचक, दरारा आणि धाक असलेले भाई मनोज संसारे यांचे निधन झाल्याने आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली आहे.

मागील दीड वर्षांपासून कोमात
आंबेडकरी चळवळीतील लढवय्या पँथर, आक्रमक, प्रभावी वक्ता आणि युथ रिपब्लिकनचा तरूण नेता, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष भाई मनोज संसारे यांचे आज सायंकाळी दु:खद निघन झाले. मागील दीड वर्षांपासून ते कोमा मध्ये होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, मुलगी आणि पत्नी असा परिवार आहे.

वडाळा कोरबा मिठागर या ठिकाणी दुपारी १२ वाजेपर्यत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

त्यांनी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली होती. ते स्वतः दोन वेळा अपक्ष उमेदवार म्हणून मुंबई महापालिकेत नगरसेवक पदी निवडून आले होते. तसेच त्यांनी अपक्ष नगरसेवकांचे पालिकेत गटनेते पद ही भूषविले होते.

भाई मनोज संसारे यांचा लहान भाऊ राजेश यांचे आकस्मात निधन झाले आणि या घटनेचा मोठा धक्का त्यांना बसला. ते धक्क्यातून स्वतःला सावरू शकले नाही. ते कोमात गेले होते. यासोबतच त्यांच्यावर पक्षघाताचे ही उपचार सुरु होते. गेले दीड वर्ष त्यांच्यावर उपचार सुरु होते, अशी माहिती त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अनुसरून मुंबई आणि महाराष्ट्रातील गावपातळीवर आंबेडकर समूहामध्ये ‘स्वाभिमान’ निर्माण करणारे झुंजार पँथर, ‘प्रत्येकाने बना स्वाभिमानी’ हा नारा बुलंद करणारे नेते तसेच शहीद पँथर भाई संगारे यांचा लढवय्या वारसा पुढे नेणारे, अशी त्यांची ओळख होती.

बाबासाहेब लेके हल्लाबोल, ये जय भिम लेके हल्लाबोल, हा नारा समाजात देताना येथे आपला कोणी नेता नाही, आपला फक्त एकच नेता आणि आपले साहेब एकच ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर’ , हे छाती ठोकपणे सांगताना दलित चळवळीतील सर्व पक्षाचे नेतृत्व नाकारत स्वतः च्या स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची वाटचाल सुरु ठेवली होती. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची कधीही न भरुन निघणारी हानी झाली आहे.

भाई, तुम्हाला शेवटचा क्रांतिकारी जयभीम!

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका