ताजे अपडेट

लेखक हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला

Spread the love

अहमदनगर : विशेष प्रतिनिधी
मराठी लेखक हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. तीन अज्ञात व्यक्तींनी त्यावर हल्ला केला आहे. यासंबधीची तक्रार हेरंब कुलकर्णी यांनी अहमदनगर पोलिस ठाण्यात नोंदवली आहे.

हेरंब कुलकर्णी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते आणि त्यांचे सहकारी गाडीवर जात असतानाच तीन अनोळखी व्यक्तींनी गाडीवरती त्यांचा पाठलाग केला. ते गाडीच्या समोर आले, त्यांनी गाडी थांबवली. त्यानंतर गाडीवरील दोन व्यक्ती जवळ गेले आणि त्यांनी काहीच न बोलता मारहाण करण्यास सुरूवात केली. अनोळखी व्यक्तींनी हातात रॉड घेऊन मारहाण केली. त्यानंतर काही वेळात ते तेथून निघून गेले. त्यानंतर हेरंब कुलकर्णी यांच्यासोबत असणा-या सहका-याने हल्लेखोरांना अडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनाही मारहाण करण्यात आली आहे.

दरम्यान यासंबधी आधिक माहिती हेरंब कुलकर्णी यांच्या पत्नी प्रतिमा कुलकर्णी यांनी दिली आहे. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, माझे पती हेरंब कुलकर्णी यांच्यावर शनिवारी दुपारी १२.१८ मिनिटांनी शाळेतून परत जाताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. आजारी असल्याने शाळेतून घरी सुनिल कुलकर्णी या शिक्षक मित्राच्या गाडीवर येताना अहमदनगर येथे रासने नगर जवळ जोशी क्लासेसजवळ तीन तरुणांनी गाडी अडवून लोखंडी रॉडने मारहाण केली.

डोक्याला ४ टाके पडले आहेत. डोक्यावर चा दुसरा फटका सुनिल कुलकर्णी यांनी हाताने अडवला त्यामुळे ते बचावले.अन्यथा डोक्यावर जबर मार बसला असता. ते रस्त्यावर पडले. त्यानंतर त्यांनी सिव्हील हॉस्पिटल ला उपचार घेतले व तोफखाना पोलिस चौकीत गुन्हा दाखल केला. पण ४८ तासात पोलिसांनी कोणालाही अटक केली नाही की अजूनही सीसीटीव्हीचा फॉलोअप घेतला नाही, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

कोण आहेत हेरंब कुलकर्णी? हेरंब कुलकर्णी हे एक लेखक आहेत. ते वैचारिक आणि विशेषतः शिक्षणविषयक लेखन करतात. ते वात्रटिकाही करतात. हेरंब कुलकर्णी हे इ.स. 2006 च्या वर्षभरात साधना साप्ताहिकाच्या संपादक मंडळात देखील होते. दारूबंदीसाठी चाललेल्या अनेक आंदोलनांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता. या लढ्याला अभ्यासातून धोरणात्मक पाया देण्याचे काम ते करत आहेत.

हेरंब कुलकर्णी यांच्या पत्नीने केली पोस्ट या संदर्भात हेरंब कुलकर्णी यांच्या अकाउंटवर त्यांच्या पत्नीने पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘माझे पती हेरंब कुलकर्णी यांच्यावर शनिवारी दुपारी 12.18 मिनिटांनी शाळेतून परत जाताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. आजारी असल्याने शाळेतून घरी सुनील कुलकर्णी या शिक्षक मित्राच्या गाडीवर येताना अहमदनगर येथे रासने नगर जवळ जोशी क्लासेसजवळ तीन तरुणांनी गाडी अडवून लोखंडी रॉडने मारहाण केली. गाडी अडवून लोखंडी रॉडने दोन्ही पायावर दोन्ही हातावर पाठीवर आणि डोक्यात रॉडने मारहाण केली. डोक्याला 4 टाके पडले आहेत. डोक्यावर चा दुसरा फटका सुनिल कुलकर्णी यांनी हाताने अडवला त्यामुळे ते बचावले. अन्यथा डोक्यावर जबर मार बसला असता. ते रस्त्यावर पडले. त्यानंतर त्यांनी सिव्हील हॉस्पिटल ला उपचार घेतले व तोफखाना पोलीस चौकीत गुन्हा दाखल केला. पण 48 तासात पोलिसांनी कोणालाही अटक केली नाही की अजूनही CCTV फॉलोअप घेतला नाही. त्यामुळे आज ही घटना समाजाच्या समोर मी मांडत आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका