थिंक टँक स्पेशल

‘हमास’ची खुमखुमी! इस्रायलसह जगाला हादरा

Spread the love

हमास या अतिरेकी संघटनेच्या लष्करी शाखेचा नेता मोहम्मद देईफ याची सगळीकडे चर्चा होत आहे. हा देईफ नेमका कोण आहे? हमास आणि देईफचा काय संबंध आहे? अमेरिकेने त्याला दहशतवादी म्हणून का घोषित केलेले आहे? तसेच इस्रायलने त्याला अनेकवेळा मारण्याचा प्रयत्न का केलेला आहे? 


गाझामध्ये हमासची सत्ता कशी आली?
1948 मध्ये इस्रायलची निर्मिती झाल्यानंतर अरब देशांमध्ये नाराजी वाढली. जॉर्डन, इजिप्त, सीरिया, सर्व अरब देश पॅलेस्टिनी प्राधिकरणात भागधारक होते. 1964 मध्ये इस्रायलचा मुकाबला करण्यासाठी पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन (PLO) ची स्थापना करण्यात आली. यासर अराफात हे 1980 आणि 1990 च्या दशकात पीएलओचे सर्वात लोकप्रिय नेते होते. त्यांच्या पक्षाचे नाव फतह पार्टी होते, ज्याने 1996 मध्ये गाझा आणि वेस्ट बँक येथे झालेल्या पहिल्या निवडणुका जिंकल्या. (Hamas claimed its assault was aimed at ending Israel’s 16-year blockade of Gaza and brutal treatment of Palestinians in the West Bank. Israeli Prime Minister Benjamin Netanyahu said his nation’s retaliation against the militant group has only just begun)

गाझा आणि वेस्ट बँकचा परिसर ‘पॅलेस्टाईन नॅशनल अथॉरिटी’ म्हणून ओळखला जातो, जेथे पॅलेस्टिनी सरकार चालवण्यास जबाबदार असतात. ‘पॅलेस्टाईन नॅशनल अथॉरिटी’ला संयुक्त राष्ट्रानेही मान्यता दिली आहे. 2004 मध्ये अराफात यांच्या मृत्यूनंतर ‘पॅलेस्टाईन नॅशनल अथॉरिटी’ आणि फतह पार्टीचे नियंत्रण महमूद अब्बासकडे गेले. दरम्यान, हमासने आपली लष्करी शाखा मजबूत करणे सुरूच ठेवले आणि लोकप्रियताही मिळवली.

गाझा पट्टीत हमासचे सरकार

2005 मध्ये दुसऱ्यांदा निवडणुका झाल्या तेव्हा ‘पॅलेस्टाईन नॅशनल अथॉरिटी’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत फताह पक्षाने विजय मिळवला. मात्र गाझा पट्टीत हमासचा विजय झाला. तथापि, फताह पक्षाचे सरकार गाझामध्येही चालणार होते, कारण त्यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका जिंकल्या होत्या. पण 2006 मध्ये गाझा येथे सत्तापालट करून स्वतःचे सरकार स्थापन केले. 2007 पासून गाझा पूर्णपणे ताब्यात घेतला. त्यामुळे गाझा पट्टीत हमासचे सरकार आहे तर वेस्ट बँकवर फताह पक्षाचे सरकार आहे.

इस्रायलवरील का हल्ला झाला?
वास्तविक, या वादाचे कारण अल-अक्सा मशीद कंपाऊंड आहे. हमासचे लष्करी कमांडर मोहम्मद डेफ यांनी ‘ऑपरेशन अल-अक्सा स्टॉर्म’ची घोषणा केली आहे. हे एक नवीन ऑपरेशन आहे, ज्याचा उद्देश संवेदनशील मानल्या जाणार्‍या अल-अक्सा कंपाऊंडला मुक्त करणे आहे. अल-अक्सा मशीद जेरुसलेम शहरात आहे. अलीकडच्या काळात ज्यू लोक त्यांचे पवित्र सण साजरे करण्यासाठी येथे आले आहेत. टेंपल माउंट याच कंपाउंडमध्ये आहे, जिथे यहूदी प्रार्थना करतात.

हमासचे इस्रायलविरुद्धचे हे पहिले पाऊल असल्याचे सांगत मोहम्मद देफ यांनी म्हटले आहे की, आम्ही शत्रूला अल-अक्सा मशिदीवर आक्रमकता न दाखवण्याचा इशारा देतो. असे झाले तर शत्रूवर कारवाई केली जाईल. हमासने वेस्ट बँकमध्ये राहणाऱ्या पॅलेस्टिनींना कोणतीही भीती न बाळगता इस्रायलवर हल्ला करण्यास सांगितले आहे. त्यांनी लोकांना भडकावून रस्त्यावर उतरून हल्ला करण्यास सांगितले आहे. (Hamas, militant Palestinian nationalist and Islamist movement dedicated to the establishment of an independent Islamic state in historical Palestine.)

असोशिएटेड प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार या हल्ल्यानंतर मोहम्मद देईफ याने एक संदेश दिला आहे. “गेल्या १६ वर्षांपासून गाझा या प्रदेशाची नाकेबंदी करण्यात आलेली आहे. या नाकेबंदीच्या निषेधार्थ तसेच नुकत्याच इस्रायली आणि पॅलेस्टिनींमध्ये घडलेल्या घटनांमुळे निर्माण झालेल्या तणावाला प्रत्युत्तर म्हणून ‘अल अक्सा स्टोर्म’ ही मोहीम राबवण्यात आली,” असे देईफ म्हणाला.

इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या सल्लागारांनी इस्रायलवरील पॅलेस्टिनी हल्ल्याचे समर्थन केल्याचं सांगितलं जात आहे. जोवर पॅलेस्टाइन आणि जेरुसलेम स्वतंत्र होत नाही तोवर आम्ही या संघर्षाला पाठिंबा देत आहे, असं इराणने म्हटलं आहे.

संघटनेची मुळं ब्रदरहूडमध्ये

पॅलेस्टाईन मु्स्लीम ब्रदरहूड ही संघटना 1946 साली जेरुसलममध्ये सुरु झाली होती. या संघटनेचा ज्यू राष्ट्राला विरोध होता. अरब राष्ट्रांचा पण स्वतंत्र ज्यू राष्ट्राला विरोध होता. त्यातून झालेल्या युद्धात इस्त्राईल अस्तित्वात आले. या मुस्लीम ब्रदरहूड संघटनेतून पुढे हमासची बीजं पेरली गेली.

कधी झाली या संघटनेची स्थापना

इस्त्राईल-अरब यांच्यात 1967 मध्ये युद्ध झाले. त्यात इस्त्राईलने युद्ध जिंकले. हा भूभाग ज्यू लोकांच्या अधिपत्याखाली आला. त्यानाराजीने हमास ही संघटना 1980 मध्ये स्थापन झाली. वेस्ट बँग आणि गाझा पट्टीतून ज्यू लोकांना हकलण्यासाठी हमास संघटना आकार घेऊ लागली. इस्त्राईल विरोधाला येथून धार आली. या संघटनेने दहशतवादी कारवाया सुरु केल्या. ज्यू लोकांना टार्गेट करायला सुरुवात झाली. दोन्ही भागात लष्करी प्रशिक्षणाला सुरुवात झाली. भूभागावरुन सुरु झालेली लढाईनंतर धर्मावर आडली.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका