ताजे अपडेटमनोरंजनराजकारण

बापूंचा नाद करणाऱ्यांची फाटली

बापूंसमोरच टिकटॉक स्टारचा गुलिगत धोका

Spread the love

सूरज चव्हाण असे या तरुणाचे नाव आहे. तो “गुलीगत धोका”, “बुक्कीत टेंगुळ” या डायलॉगमुळे तो राज्यात प्रसिद्ध आहे. त्याच्या या बोलण्यावर फिदा होऊन त्याच्या चाहत्यांनी त्याला “गुलीगत” हे टोपण नाव बहाल केले. सूरज चव्हाण हा मूळचा बारामती येथील आहे. त्याने टिकटॉकवर एक व्हिडिओ शेअर केला होता.

थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
“काय झाडी.. काय डोंगार… काय हाटील..” फेम आमदार शहाजीबापू पाटील यांची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच आहे. सांगोला येथील त्यांच्या संपर्क कार्यालयात भेटायला येणाऱ्यांची रीघ लागलेली असते. मुसंडी चित्रपटातील कलाकारांच्या टीमने नुकतीच आमदार शहाजीबापू पाटील यांची सांगोल्यात भेट घेतली. यावेळी टिकटॉक स्टार, तथा या चित्रपटातील कलाकार, “गुलीगत धोका.. बुक्कीत टेंगुळ” फेम सूरज चव्हाण याने “बाटलीत बाटली.. काचची बाटली..बापूंचा नाद करणाऱ्यांची फाटली” असे म्हणत बापूंसमोरच गुलिगत डायलॉग हाणला. हा खतरनाक डायलॉग ऐकून बापूही चकित झाले. (Kay zadi Kay dongaar Kay hatil fem MLA Shahajibapu Patil)

मुसंडी चित्रपटामधील कलाकारांनी “काय झाडी.. काय डोंगार… काय हाटील..” फेम आमदार शहाजीबापू पाटील यांची भेट घेतली. यावेळी गायिका तेजस्विनी रसाळ यांनी गोड आवाजात गवळण गायली. यावेळी सोबत इतर कलाकार व मान्यवर उपस्थित होते.

कोण आहे गुलीगत?
सूरज चव्हाण असे या तरुणाचे नाव आहे. तो “गुलीगत धोका”, “बुक्कीत टेंगुळ” या डायलॉगमुळे तो राज्यात प्रसिद्ध आहे. त्याच्या या बोलण्यावर फिदा होऊन त्याच्या चाहत्यांनी त्याला “गुलीगत” हे टोपण नाव बहाल केले. (Guligat Dhoka fem Suraj Chavan)

सूरज चव्हाण हा मूळचा बारामती येथील आहे. त्याने टिकटॉकवर एक व्हिडिओ शेअर केला होता. आणि तो रातोरात स्टार झाला. त्याचे कॉमेडी व्हिडिओ लोकांना खूप आवडले. त्याने केवळ सोशल मीडियावर पैसे कमावून घर बांधलं आहे. त्याला फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्याला मुसंडी चित्रपटात भूमिका देण्यात आली आहे.

छोटा पुढारी जोमात
महाराष्ट्राचा लाडका छोटा पुढारी घनःश्याम दरोडे यानेही या चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे. तोही सध्या विविध माध्यमांतून या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी धडपडत आहे.

९ जून रोजी “मुसंडी” मारणार
एमपीएससी आणि यूपीएससी यासारख्या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून वर्षानुवर्षे अभ्यास करणाऱ्या तरुणांच्या जीवनावर आधारित मुसंडी हा नवा चित्रपट ९ जून रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
स्पर्धा परीक्षा’ देऊन सरकारी नोकरीत जाणं,हाच आयुष्याला कलाटणी देण्यासाठीचा मंत्र असं वाटणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे.त्यातही ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा ओघ लक्षणीय आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणं आणि ती यशस्वीरीत्या पास करणं हा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा असतो. काहींना यश मिळते तर काहींना अपयश. वारंवार अपयश आल्यानं आपलं आयुष्य संपवण्यापर्यंतचे टोकाचे पाऊलही काही जण उचलतात. या स्पर्धेमुळं उभे राहणारे अनेक सामाजिक प्रश्‍नही मोठे आहेत. यावर भाष्य करणारा सोनाई फिल्म क्रिएशन प्रस्तुत, गोवर्धन दोलताडे लिखित-निर्मित आणि शिवाजी दोलताडे दिग्दर्शित ‘मुसंडी’ हा चित्रपट बनला आहे.

रोहन पाटील आणि गायत्री जाधव ही जोडी ‘मुसंडी’ चित्रपटात प्रमुख भूमिकेत असून या दोघांसोबत सुरेश विश्वकर्मा,शुभांगी लाटकर,तान्हाजी गळगुंडे,शिवाजी दोलताडे,सुरज चव्हाण,अरबाज शेख,प्रणव रावराणे,अक्षय टाक, घनश्याम दरवडे (छोटा पुढारी),सनमीता धापटे, वैष्णवी शिंदे,माणिक काळे,सुजीत मगर,मयुर झिंजे,ऋतुजा वावरे,विकास वरे,राधाकृष्ण कराळे,राम गायकवाड,अजित पवार,उत्कर्ष देशमुख,सार्थक वाईकर,आर्यन पवार,निमिशा सानप,रुचिता देशमुख,प्रियंका पवार,ऐश्वर्या फटांगरे,श्रद्धा गायकवाड,सोनाली गायकवाड,आकांक्षा कापे,प्राजक्ता गायकवाड, मानसी डरंगे,भाग्यश्री पवार यांच्या भूमिका आहेत.

एमपीएससी आणि यूपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्याचा अमुक एक ‘पॅटर्न’ नसतो. तीव्र इच्छाशक्ती, ध्येय गाठण्यासाठी अथक मेहनत, अपयशामुळे खचून न जाता पुन्हा जिद्दीने उभं राहून कष्ट करण्याची तयारी हे सगळे गुण असतील तर यशाची ‘मुसंडी’ मारता येऊ शकते हे दाखवणारा हा चित्रपट प्रेक्षकांसाठी रंजनासोबत अंजनाचे ही काम करेल हे नक्की.

‘मुसंडी’ आत्मविश्वासाची जाणीव करून देईल : दोलताडे
कोणतेही ध्येय गाठण्यासाठी कष्ट हे घ्यावेच लागतात. यासाठी योग्य मार्ग निवडला आणि मग तो मार्ग काढण्यासाठी मेहनत घेणे यातच यशाचे रहस्य लपलेलं असतं.स्पर्धेमध्ये अपयश आल्याने खचून न जाता नव्या उमेदीने कामाला लागण्याची जिद्दच तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोचवेल, हा संदेश पोहचवणारा ‘मुसंडी’ हा चित्रपट प्रत्येकाला आपल्यातल्या आत्मविश्वासाची जाणीव करून देईल,असा विश्वास दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी व्यक्त केला.

या चित्रपटाची टीम सांगोला येथे “काय झाडी.. काय डोंगार… काय हाटील..” फेम आमदार शहाजीबापू पाटील यांच्या भेटीला आली होती. बापूंनी या टीमला शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा

गौतमीला पाहून घेरडीकरांच्या डोळ्याचे पारणे फिटले

सांगोल्यात 40 हजार हेक्टरवर खरीप हंगाम साधणार

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका