भारतीय खाद्य निगम पुरवतंय देशभरात उत्कृष्ट धान्य
सोलापुरात सायलो गोडाऊन झाल्यास आणखी फायदा होणार

सोलापूर : थिंक टँक न्यूज नेटवर्क
सोलापूर शहर जिल्ह्याची तेरा हजार मॅट्रिक टन दरमहा धान्याची गरज असून ती भारतीय खाद्य निगम विभागाकडून पूर्ण केली जात आहे. मागील वर्षीच्या काळात शेतकऱ्यांकडून तूर, चना हे कडधान्य खरेदी करण्यात भारतीय खाद्य निगम विभागाचा मोठा वाटा असल्याचं विभागीय व्यवस्थापक मनीषा मीना यांनी सांगितले.
1965 साली स्थापन झालेले भारतीय खाद्य निगम देशभरात पाच झोनल कार्यालय आणि महाराष्ट्रात 91 गोडाऊन च्या माध्यमातून 91 लाख मॅट्रिक टन धान्य साठवून देशवासीयांना उत्कृष्ट धान्याचा पुरवठा करत आहे.
सोलापुरात एफसीआय कार्यालय होडगी रोड येथे भेट देऊन विभागीय व्यवस्थापक मनीषा मीना त्यांनी गोदामाची पाहणी केली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या , महाराष्ट्र राज्यात एफसीआय आठ विभागीय कार्यालय आहेत. मालवाहतुकीसाठी रेल्वे वाहतुकीचा एफसीआयला मोठा उपयोग होतो. तर रेल्वेला देखील एफसीआयच्या माध्यमातून मोठं उत्पन्न मिळत आहे.
मागील काही वर्षात धान्याच्या गळतीमध्ये कमालीची घट करण्यात भारतीय खाद्य निगम विभागाला यश आले आहे. सोलापूर येथे देखील सायलो गोडाऊन निर्मितीचा प्रस्ताव प्रस्तावित असून तो पूर्ण झाल्यास याचा मोठा फायदा भारतीय खाद्य निगम ला होणार असल्याचे देखील विभागीय व्यवस्थापक मनीषा मीना यांनी सांगितले.
यावेळी भारतीय खाद्य निगम सोलापूर डेपो व्यवस्थापक नुपेश रामटेके, गुण नियंत्रण व्यवस्थापक जन्मजय सिंग, असिस्टंट मॅनेजर अनिल सूर्यवाड आणि भारतीय खाद्य निगम सोलापूर डेपो चे कर्मचारी उपस्थित होते.