डॉ. सारीपुत्र तुपेरे यांना राज्यस्तरीय काव्य गौरव पुरस्कार जाहीर

सोलापूर : थिंक टँक न्यूज नेटवर्क
संगमेश्वर कॉलेजमधील प्रा. डॉ. सारीपुत्र तुपेरे यांच्या ‘तुझ्या बोटाच्या दिशेने चालत आहे ‘ या कवितासंग्रहाला मानव विकास बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि विवेकानंद सार्वजनिक वाचनालय डोणगाव ता.मेहकर जि.बुलढाणा यांच्या वतीने देण्यात येणारा ‘राज्यस्तरीय काव्य गौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
दिनांक २४ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता डोणगाव येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे.
या पुरस्काराचे स्वरूप स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल व एक हजार रूपये असे आहे.
डॉ. तुपेरे यांचा हा पहिलाच कवितासंग्रह असून तो सोलापूर मधील थिंक टॅंक पब्लिकेशन्सच्या वतीने ६ डिसेंबर २०२२ रोजी प्रकाशित झाला आहे. यातील कविता आंबेडकरी विचारांचा आविष्कार करणा-या आहेत. या अगोदर डॉ. तुपेरे यांचे बारा संशोधनपर व वैचारिक ग्रंथ प्रकाशित आहेत. त्यास राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांच्या या पहिल्या कवितासंग्रहास मिळालेला हा पहिलाच पुरस्कार असून त्याबद्दल विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
या पुरस्कार निवड समितीत प्रा. रविंद्र साळवे, प्रा. प्रशांत ढोले, प्रा. डॉ. सुनील पवार यांचा समावेश होता. दिनांक २४ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता डोणगाव येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे.
यावेळी “एक दिवस कवितेसाठी” हा कवी संमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती या पुरस्काराचे संयोजक कवी सुनील दौलत खोडके (डोणगाव) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.