भाजप नगरसेवक खून प्रकरण, चार सराईत आरोपींच्या मुसक्या आवळल्या
थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
जत येथे मागील तीन दिवसांपूर्वी झालेल्या माजी नगरसेवक विजय ताड खून प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. या खून प्रकरणी पोलिसांनी चौघा जणांना ताब्यात घेतले आहे.
बबलू उर्फ संदीप शंकर चव्हाण, वय २७ रा समर्थ कॉलनी, जत, ता जत. जि सांगली, निकेश उर्फ दाद्या दिनकर मदने वय २४ रा. मौजे डिग्रज ता. मिरज जि. सांगली, आकाश सुधाकर व्हनखंडे वय २४ रा. के एम हायस्कुल जवळ सातारा फाटा, जत ता. जत जि.सांगली, किरण विठ्ठल चव्हाण वय २७ रा. आर आर कॉलेज जवळ, जत ता. जत जि. सांगली,उमेश सावंत रा.जत यांनी खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.
अधिक माहिती अशी की,
दिनांक १७.०३.२०२३ रोजी दुपारी १.४५ वा.चे सुमारास यातील मयत विजय शिवाजी ताड वय ४२ रा. ताड मळा, जत ता. जत जि. सांगली हे त्यांच्या इनोव्हा गाडी क्र. एम. एच. १० सी.एन.०००२ या गाडीने त्यांच्या मुलांना शाळेतून घरी आणण्यासाठी जात असताना बबलू उर्फ संदीप शंकर चव्हाण व त्याचे साथीदार यांनी मोटरसायकल वरुन येवुन अज्ञात कारणावरुन ताड व्यांच्यावर पिस्तुलाने गोळीबार करुन अल्फोन्सो शाळेजवळ मोकळया मैदानात त्याचे डोके दगडाने ठेचून त्यांचा खून केला होता.
पोलीस अधीक्षक डॉ.बसवराज तेली, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांना विजय शिवाजी ताड यांच्या खुनाचा गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या होत्या. सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे स्था. गु.अ. शाखा यांनी गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, सपोनि संदीप शिंदे, पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर अशी वेगवेगळी तीन पथके तयार करून गुन्हा उघडकीस आणणेबाबत तयार केले होते.
त्याप्रमाणे वरील सर्व पथकांनी गुन्हा घडले ठिकाणी भेट देऊन गुन्हयाचा तपास चालू केला. या गुन्हयाच्या अनुषंगाने सपोनि प्रशांत निशानदार यांनी गोपनीय बातमीदाराकडुन व पोना संदीप नलावडे, प्रकाश पाटील यांनी तांत्रिक माहिती वरुन सदरचा गुन्हा हा बबलु उर्फ संदीप शंकर चव्हाण व त्याचे साथीदार यांनी केला असल्याबाबत माहिती मिळाली.
या गुन्हयातील संशयित इसम हे गोकाक, कर्नाटक राज्य या ठिकाणी असल्याबाबत माहिती मिळाल्याने सपोनि प्रशांत निशानदार व त्यांचे पथक गोकाक, कर्नाटक राज्य या ठिकाणी दाखल होऊन आरोपीचा शोध सुरु केला. गोपनीय बातमीदाराकडुन सदरचे आरोपी हे गोकाक एस टी स्टैंड परीसरात असल्याचे समजल्याने वरील पथकाने सापळा लावून पंचासमक्ष त्या चौघांना गोकाक एस टी स्टैंड परीसरात ताब्यात घेऊन त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी आपली नावे बबलू उर्फ संदीप शंकर चव्हाण वय २७ रा समर्थ कॉलनी, जत. ता जत, जि सांगली ,निकेश उर्फ दाया दिनकर मदने वय २४ रा. मौजे डिग्रज ता. मिरज, जि. सांगली,आकाश सुधाकर व्हनखंडे वय २४ रा. के एम हायस्कुल जवळ सातारा फाटा, जत ता. जत, जि. सांगली,किरण विठ्ठल चव्हाण वय २७ रा. आर आर कॉलेज जवळ, जत ता. जत, जि. सांगली अशी सागितली.
जत येथील अल्फोन्सो शाळेजवळ मोकळया मैदानात मयत विजय शिवाजी ताड यांचे खुनाच्या गुन्हयाचे अनुषंगाने कौशल्यपूर्ण तपास केला असता, बबलू उर्फ संदीप चव्हाण याने सांगितले की, मयत नामे विजय शिवाजी ताड यांचा खुन त्याने व निकेश उर्फ दाद्या मदने, आकाश व्हनखंडे, किरण चव्हाण असे मिळुन उमेश सावंत रा. जत याचे सांगणेवरून केला असल्याचे कबुल केले.
पोलीस निरीक्षक सतिश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी सदर गुन्हयाचे तपास कामी चौघांना अटक केले असुन पुढील गुन्हयाचा तपास सुरु आहे.