बापूसाहेब ठोकळे यांचा तहसीलदारांच्या हस्ते सत्कार

सांगोला : प्रतिनिधी
बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोल्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार संजय खडतरे यांच्या हस्ते केक कापून सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी नगराध्यक्ष अनिल खडतरे, स्वाभिमानी होलार समाज संघटनेचे अध्यक्ष शिवाजी जावीर, रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष खंडू सातपुते, रघुनाथ आयवळे, दीपक आयवळे, राष्ट्रवादीच्या नेत्या सुजाता कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे यांचा वाढदिवस विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त कोणताही वायफळ खर्च टाळून शालेय साहित्य भेट देण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यांच्या या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वाढदिवसानिमित्त संकलित झालेल्या शालेय साहित्याचे वाटप विविध ठिकाणच्या शाळांमध्ये जाऊन वितरित करण्यात आले.
बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोल्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार संजय खडतरे यांच्या हस्ते केक कापून सत्कार करण्यात आला. फेटा, बुके देवून केक कापून हा वाढदिवस साजरा करण्यात आला.
तहसीलदार संजय खडतरे यांनी बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी बापूसाहेब ठोकळे यांनी आयुष्यभर वंचित बहुजन समाजातील प्रश्नांवर कार्य सुरूच ठेवण्याचे अभिवचन दिले.