
- गुन्हा दाबण्यासाठी 5 लाखांची लाच; फौजदार जेरबंद
- सोलापूर जिल्ह्यात उडाली खळबळ
थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या तक्रारी अर्जावर कोणतीच कारवाई न करता पीकअप वाहन सोडवण्यासाठी ५ लाख रुपयांची लाच मागितली. यातील दोन लाख रुपये स्वीकारण्याची तडजोड केली असतानाच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाचखोर पोलीस अधिकाऱ्यास पकडले आहे. या कारवाईमुळे सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे लाचखोर अधिकारी हा सेवानिवृत्त होण्यास अवघे काही महिने उरले आहेत.
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय गोरे (विजापूर नाका पोलीस स्टेशन) असे कारवाई करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार विरुद्ध विजापूर नाका पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या तक्रारी अर्जामध्ये तक्रारदार यांना सहाय्य करुन कोणताच गुन्हा दाखल करणार नाही आणि तक्रारदाराची पिकअप वाहन सोङण्याकरीता यातील मुख्य आरोपी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय गोरे यांनी तक्रारदाराकङे ५ लाख रु.मागणी केली होती.
त्यापैकी पहिला हप्ता म्हणून ३ लाख रु.घेण्यास सहमती दर्शविली होती. ही रक्कम वरिष्ठ पोलिस निरीक्षक हनपुङे -पाटील यांना द्यावी लागते, असे लाचखोर सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाने तक्रारदाराला सांगितले होते. तक्रारदाराला दोन वेळा रक्कम घेऊन बोलावले. माञ लाचखोर सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाने रक्कम स्विकारली नाही. तरीही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून त्यात लाचखोर सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय गोरे वय ५७ नेमणूक विजापूर नाका पोलिस ठाणे यांना ताब्यात घेतले.
या कारवाईमुळे अन्य हप्तेखोर वसुलदारांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. शहर पोलिस दलातील वसुलदारांमध्ये भितीचे वातावरण पहायला मिळत आहे.
ही कारवाई लाप्रवि.पुणे पोलिस अधिक्षक अमोल तांबे ,अप्पर पोलिस अधिक्षक ङाॕ.शितल जानवे -खराङे यांच्या आदेशान्वये सोलापूर पोलिस उपअधिक्षक गणेश कुंभार यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक कोळी व महाङीक यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकङील कर्मचारी सोनवणे,घाङगे,जाधव,मुल्ला वाहनचालक गायकवाड यांनी यशस्वीपणे पार पाङली…