ताजे अपडेट

सीमा हैदर RPI मध्ये प्रवेश करणार? आठवलेंनी स्पष्टच सांगितलं

Spread the love

नवी दिल्ली : Athawale on Seema Haider | भारतीय तरुणाच्या प्रेमाखातर भारतात दाखल झालेली सीमा हैदर ही पाकिस्तानी महिला सध्या ट्रेडिंगमध्ये आहे. ती लवकरच भारतीय राजकारणात दाखल होणार असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये झळकल्या. या सीमा हैदरला केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिल्याचंही बोललं गेलं. पण या दाव्यात किती तथ्य आहे, हे खुद्द आठवले यांनीच स्पष्ट केलं आहे. (Will Seema Haider really enter RPI Ramdas Athawale clears his and Party stand)

सीमा गुलाम हैदर ही एक पाकिस्तानी विवाहित महिला आहे जिने तिच्या भारतीय जोडीदाराशी लग्न केल्याचा आरोप करून बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केला होता. तिचे प्रेमप्रकरण एका ऑनलाइन मल्टीप्लेअर गेमवरून सुरू झाले. ती सचिन मीनाच्या प्रेमात पडली. सुरुवातीला स्थानिक अधिकाऱ्यांनी या जोडप्याला बेकायदेशीर इमिग्रेशन आणि योग्य कागदपत्रांशिवाय भारतात वास्तव्य केल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेतले. मात्र, नंतर उत्तर प्रदेशातील न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. या जोडप्याने त्यांचे प्रेम जाहीरपणे व्यक्त केले आणि त्यांना लग्न करण्याची आणि भारतात एकत्र राहण्याची परवानगी देण्याचे आवाहन भारतीय अधिकाऱ्यांना केले.

आठवले म्हणाले, आमच्या पक्षाचा आणि सीमा हैदरचा काहीही संबंध नाही. ती पाकिस्तानातून भारतात दाखल झाली आहे. त्यामुळं तिला आमच्या पक्षात प्रवेश देण्याचा प्रश्नच येत नाही. जर आम्हाला तिला कुठलं तिकीट द्यायचंच असेल तर भारतातून पाकिस्तानात जाण्याचं तिकीट तिला देऊ. (Latest Marathi News)

ती पाकिस्तानची गुप्तहेर असून आयएसआय या गुप्तचर संस्थेशी संबंधित असल्याचाही आरोप आहे . या प्रकरणाचा तपास दहशतवादविरोधी पथकाला ( एटीएस) सोपवण्यात आला आहे. या जोडप्याला आणि मुलाच्या वडिलांना अटक करण्यात आली होती आणि भारतीय दंड संहितेच्या विदेशी कायदा आणि कलम 120B (गुन्हेगारी कट) अंतर्गत आरोपांचा सामना करावा लागला होता.

RPIमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चाआठवले पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते किशोर मासूम यांनी सीमा हैदरला आपल्या पक्षात सामील करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी सीमाची तुलना थेट काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याशी केली होती. “इटलीहून आलेल्या सोनिया गांधी भारतात राजकारण करू शकतात, पंतप्रधानपदाच्या दावेदार होऊ शकतात तर पाकिस्तानची सीमा हैदर राजकारणात का येऊ शकत नाही?”, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.

तिची जामिनावर सुटका करण्यात आली आणि तिचे नाव बदलून आणि हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर तिने एका भारतीय वृत्त माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत नमूद केल्याप्रमाणे ती भारताला तिचे घर मानते .

महिला विंगच्या अध्यपदी संधी”सीमा हैदर खरोखर निर्दोष असतील, त्या गुप्तहेर असल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नाहीत आणि त्यांना भारतीय नागरिकत्व देण्यात आलं तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या उत्तर प्रदेश महिला विंगच्या अध्यक्षपदी त्यांची निवड केली जाऊ शकते” असंही ते म्हणाले होते. सीमा हैदर एक उत्तम वक्त्या आहेत त्यांनी राजकारणात नशीब आजमवायला हवं” असंही किशोर मासूम म्हणाले होते.

 

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका