गुन्हेगारीथिंक टँक स्पेशल

देवाच्या रथाचे दगडी चाक निखळून दोघेजण ठार

अक्कलकोट तालुक्यातील थरारक घटना

Spread the love

या धार्मिक विधीवेळी परमेश्वर महाराज की जय…! ची घोषणा देत व रथावर खारीक प्रासादिक वस्तूंची उधळण केली जात होती. यंदा सूर्यास्ताच्या दरम्यान हा रथ ओढत असताना अचानकपणे ही दुर्दैवी घटना घडल्याने मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेत दोन भक्त गंभीर जखमी झाले. उपचारापूर्वी त्यांचे निधन झाले. या घटनेनंतर वागदरी येथील परमेश्वर यात्रा उत्सवातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे कळते.

थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
देवाच्या रथाचे दगडी चाक निखळल्याने ते अंगावर पडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना अक्कलकोट शहरापासून जवळच असलेल्या वागदरी येथील ग्रामदैवत परमेश्वर यात्रेत घडली. या घटनेत आणखी काहीजण जखमी झाले आहेत.

याबाबत प्राप्त मिळालेली अधिक माहिती अशी की, वागदरी येथील ग्रामदैवत परमेश्वर यात्रा मोठ्या उत्साहात सुरू होती. या यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात सीमावर्ती भागातून भाविक यात्रेकरिता जमले होते. यात्रेतील मुख्य धार्मिक कार्य असलेला रथ परमेश्वर मंदिर ते बसस्थानक भागापर्यंत असंख्य भाविक ओढतात. सुमारे या रथाला 12 फुट रुंदीची गोलाकार दगडी चाके आहेत.

सध्या अनेक ठिकाणी यात्रांचे कार्यक्रम सुरू आहेत. देवाचा रथ ओढण्याची जुनी परंपरा आहे. यामध्ये पुरेशी सुरक्षितता घेतली जात नसल्याचे या घटनेवरून दिसून येते.

या धार्मिक विधीवेळी परमेश्वर महाराज की जय…! ची घोषणा देत व रथावर खारीक प्रासादिक वस्तूंची उधळण केली जात होती. यंदा सूर्यास्ताच्या दरम्यान हा रथ ओढत असताना अचानकपणे ही दुर्दैवी घटना घडल्याने मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेत दोन भक्त गंभीर जखमी झाले. उपचारापूर्वी त्यांचे निधन झाले. या घटनेनंतर वागदरी येथील परमेश्वर यात्रा उत्सवातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे कळते.

यात्रा उत्सव काळात ठेर (रथ) ओढणे या धार्मिक कार्यक्रमामध्ये अचानकपणे रथाच्या चाकाचा पार तिसटल्याने दुर्घटना होवून दोघे भाविक गंभीर जखमी होवून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सुर्यास्ताच्या दरम्यान घडल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे.

सध्या अनेक ठिकाणी यात्रांचे कार्यक्रम सुरू आहेत. देवाचा रथ ओढण्याची जुनी परंपरा आहे. यामध्ये पुरेशी सुरक्षितता घेतली जात नसल्याचे या घटनेवरून दिसून येते.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका