थिंक टँक स्पेशलविज्ञान/तंत्रज्ञान

शेततळे अस्तरीकरणास ७५ हजारांपर्यंत अनुदान

सामूहिक शेततळ्यासाठी १०० टक्के अनुदान; शासनाची मिळाली मान्यता

Spread the love

थिंक टँक / नाना हालंगडे
राज्यात पाणीटंचाईच्या काळात मोलाची भूमिका बजावणाऱ्या शेततळ्यांच्या अस्तरीकरणासाठी यंदा ७५ हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून वैयक्तिक शेततळ्याच्या अस्तरीकरणाला अनुदान दिले जाईल.

सांगोलेकरांनो सावधान, लम्पी त्वचा आजार फैलावतोय

अस्तरीकरणामुळे शेतातील तळ्यात पाण्याचा सुरक्षित साठा उपलब्ध होतो. साठवलेले पाणी झिरपून जाऊ नये, तसेच टंचाईच्या काळात फळबागा वाचविण्यासाठी या पाण्याचा वापर होण्यासाठी अस्तरीकरणाला ५० टक्क्यांपर्यंत अनुदान देण्याचा प्रस्ताव होता. त्यानुसार २८ हजारांपासून ते ७५ हजार रुपयांपर्यंत तळ्याच्या आकारानुसार अस्तरीकरणाला अनुदान मिळेल.

*१ ]* १५ x१५ x३ मीटरच्या अस्तरीकरणासाठी २८,२७५ रुपये_
*२ ]* २० x१५ x३ मीटरसाठी ३१,५९८ रुपये,_
*३ ]* २० x२० x३ मीटरसाठी ४१,२१८ रुपये,_
*४ ]* २५ x२० x३ मीटरसाठी ४९,६७१ रुपये,_
*५ ]* २५ ×२५ x ३ मीटरसाठी ५८,७०० रुपये,_
*६ ]* ३० x२५ x३ मीटरसाठी ६७,७२८ रुपये,_
*७ ]* ३० x३० x३ मीटरच्या अस्तरीकरणाला ७५ हजार रुपयांचे अनुदान मिळेल._

*१ ]* सामूहिक शेततळ्यासाठी मात्र १०० टक्के अनुदान मिळेल. ३४ x ३४ x ४.७० मीटर आकारमान असलेल्या सामूहिक शेततळ्यावर जर दोन ते ५ हेक्टरपर्यंत किंवा त्यापेक्षा जादा फलोत्पादन क्षेत्र असल्यास त्यासाठी ३ लाख ३९ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळेल._
*२ ]* मात्र फलोत्पादन क्षेत्र १ ते २ हेक्टरच्या दरम्यान असल्यास २४ x२४ × ४ मीटर आकारमानाच्या शेततळ्यासाठी पावणेदोन लाख रुपये अनुदान मिळेल._

या योजनांचा लाभ घेण्यासाठी mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर शेतकरी थेट ऑनलाइन अर्ज करू शकतात. योजनांबाबत माहिती हवी असल्यास कोणत्याही कृषी सहायक, पर्यवेक्षक किंवा कृषी कार्यालयाशी संपर्क करता येईल, असे कृषी आयुक्तालयातून सांगण्यात आले.

स्वखर्चाने किंवा शासकीय योजनेतून अशा दोन्ही बाबींमधून शेततळे खोदाई करणारे शेतकरी अस्तरीकरणाच्या अनुदानासाठी पात्र असतील. तळ्याच्या आकारानुसार अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यात वर्ग होईल.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका