ऊस वाहतुकीच्या पशुधनाला लसीकरण केल्यास संकट टळेल
साखर आयुक्तांना पशुसंवर्धन आयुक्तांचे पत्र

थिंक टँक / नाना हालंगडे
राज्यातील लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव हळूहळू वाढत आहे. या पार्श्वभूमीवर साखर कारखान्यांकडे येणा-या पशुधनाचे लसीकरण करून घ्यावे, असे पत्र पशुसंवर्धन आयुक्तांनी साखर आयुक्तांना दिले आहे.
पत्रात म्हटले आहे की, राज्यात सध्या २७ जिल्हयांमधील १५० तालुक्यांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव आढळून आलेला आहे व त्याचा प्रसार वेगाने होत असल्याचे निर्देशनास आल्याने उपरोक्त संदर्भीय अधिसुचनेद्वारे संपुर्ण महाराष्ट्र हे ‘ नियंत्रित क्षेत्र म्हणून जाहिर करण्यात आलेले असुन लम्पी चर्मरागाचे नियंत्रण व प्रतिबंधासाठी गुरे म्हशीची बाजार भरवणे , प्राण्याच्या शर्यती लावणे , प्राण्यांची जत्रा भरवणे प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करणे यासाठी बंदी घालण्यात आलेली आहे . तसेच या पशुधनाच्या वाहतुकीवरही बंदी घालण्यात आलेली आहे.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे संसर्ग क्षेत्राच्या ५ किमी परिघातील गोवंशीय पशुधनास गोट पॉक्स लसीद्वारे प्रतिबंधात्मक लसीकरण प्राधान्याने करण्यात येत होते . उपरोक्त संदर्भ क्र .४ च्या शासन निर्णयाद्वारे बाधित क्षेत्रीतील लसीकरणास प्राधान्य देऊन त्यासोबत त्यासोबत बाधित क्षेत्राबाहेरील गोवंशीय पशुधनाचे लसीकरण करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.
सांगोला तालुक्यासाठी गुड न्यूज, लम्पीच्या ५० हजार लसी मिळणार
या पार्श्वभुमीवर येत्या साखर हंगामासाठी राज्यातील साखर कारखान्याकडे राज्याच्या विविध भागातून ऊस वाहतुकीसाठी येणा – या पशुधनास प्राधान्याने लसीकरण झाल्यास पशुच्या स्थलातरामुळे होणा – या रोग प्रार्दुभावास प्रभावीपणे नियंत्रित करणे शक्य होईल हि बाब विचारात घेऊन स्थलातरित होणा – या पशुधनास ऊस हंगाम सुरु होण्यापुर्वीच किमान १४ ते २१ दिवस प्रतिबंधात्मक लसीकरण होईल व प्रतिबंधात्मक लसीकरण झालेलेच पशुधन कारखान्याकडे दाखल होईल हे सुनिश्चित करणेबाबत सर्व साखर कारखान्यांना आपल्या स्तरावरुन निर्देशित करावे हि विनंती.
पशुधनाच्या स्थलातरापुर्वी पशुधनास आवश्यक ते लसीकरण करुन घेण्यासाठी संबंधित जिल्हयांच्या जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयाशी अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क करण्याबाबत आपल्या स्तरावरुन सुचित करण्यात यावे.