ताजे अपडेट
Trending

लाच मागितली म्हणून चक्क दोन लाखांच्या नोटा उधळल्या

पंचायत समिती समोरील धक्कादायक प्रकार

Spread the love

शासकीय योजनेतून शेतकऱ्यांना विहिरी घ्यायच्या होत्या, मात्र बी.डी.ओ व इतर अधिकारी त्यासाठी लाचेची मागणी करित असल्याचे कळताच संतप्त झालेल्या तरुण सरपंचाने पंचायत समितीसमोर नोटांचा पाऊस पाडला. यासाठी त्याने शक्कल लढवली. तरुण सरपंचाने शेतकऱ्याकडून प्रत्येकी १० हजार रुपये गोळा करुन त्याने ते पैसे पंचायत समितीसमोर उधळले. हा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होतोय.

थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
सरकारी कामासाठी लाच मागणे हा प्रकार आता सर्वसामान्य झाला आहे. दररोज लाच घेताना रंगेहाथ पकडण्याची कितीतरी प्रकरणे पुढे येत असली तरी लाचखोर मात्र लाज लज्जा शरम नसल्यासारखे वागतात. मात्र लाच मागितली म्हणून सरपंचाने चक्क दोन लाख रुपयांच्या नोटा उधळल्याचा खळबळजनक प्रकार नुकताच उघडकिस आला आहे. पंचायत समितीसमोर घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.

विहिरीच्या कामासाठी लाच मागितली म्हणून संतापलेल्या सरपंचाने अनोखे आंदोलन केले आहे. लाच मागितली म्हणून या सरपंचाने चक्क दोन लाख रुपये पंचायत समितीच्या कार्यालयासमोर उडवले आहेत. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. भ्रष्ट अधिकारी विहिरीच्या कामासाठी लाच मागत असल्याचा आरोप करत या सरपंचाने दोन लाख रुपयांच्या नोटा हवेत उडवल्या आहेत.

शासकीय योजनेतून शेतकऱ्यांना विहिरी घ्यायच्या होत्या, मात्र बी.डी.ओ व इतर अधिकारी त्यासाठी लाचेची मागणी करित असल्याचे कळताच संतप्त झालेल्या तरुण सरपंचाने पंचायत समितीसमोर नोटांचा पाऊस पाडला. यासाठी त्याने शक्कल लढवली. तरुण सरपंचाने शेतकऱ्याकडून प्रत्येकी १० हजार रुपये गोळा करुन त्याने ते पैसे पंचायत समितीसमोर उधळले. हा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होतोय.

फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा या गावातील कोरडवाहू शेतकऱ्यांना शासकीय योजनेतून विहिरी घ्यायच्या होत्या. मात्र त्यांना विहिरी मंजूर करण्यासाठी बी.डी.ओ व इतर अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडे लाच मागितली, असा आरोप सरपंच मंगेश साबळे यांनी केला. साबळे यांनी शेतकऱ्यांकडून १०-१० हजार गोळा केले अन् थेट फुलंब्रीचं पंचायत समिती ऑफिस गाठलं.

जमा झालेले दोन लाख रुपये घेऊन, बंडलांचे हार करून त्यांनी ते गळ्यात घातले. सुमारे अर्धा तास सरपंचाचं आंदोलन सुरु होतं. बघ्यांची गर्दी वाढत होती. तेव्हा सरपंचाने बंडलामधल्या नोटा उधळल्या आणि पैशांचा पाऊस पाडला. तिथल्या संपूर्ण परिसरात नोटांचा खच पडला होता. तरुण सरपंचाचं आंदोलन पाहून उपस्थित लोकही चक्रावून गेले. थोडा वेळ त्यांनाही नेमकं काय चाललंय, कळेनासं झालं. मात्र नंतर त्यांना नेमकं प्रकरण समजलं.

लोकप्रतिनिधी आपल्या मर्जीतील लोकांना विहिरी मंजूर करतात, असा आरोप अधिकाऱ्यांचीही टक्केवारी ठरलेली आहे, जर या प्रकरणी संबंधितांवर कारवाई झाली नाही तर लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयासमोर आंदोलन करेन, असा इशाराही यावेळी तरुण सरपंचाने दिला.

गेवराई पैघा या गावचे सरपंच मंगेश साबळे यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली. सरकारने शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन दिलं, मात्र साधी विहीर मंजूर करण्यासाठी अधिकारी हजारोंची लाच मागत आहेत. शेतकऱ्यांनी इतके पैसे कुठून द्यावे, जर त्यांच्याकडे एवढे पैसे असते तर शासनाच्या योजनांसाठी त्यांनी अर्ज कशाला असता? असा सवाल विचारतच फुलंब्रीच्या पंचायत समिती कार्यालयाबाहेर साबळेंनी नोटांची उधळण केली.

“मी पैसा वाटलेला नाही. मी कुठल्या तोंडाने शेतकऱ्यांकडे कामासाठी पैसे मागवू. तुम्ही जर कोणाचे ऐकून फक्त पैसेवाल्यांच्या विहीरींचे काम करणार असाल तर गरिबांचे काम कोण करणार?,”– मंगेश साबळे, सरपंच

रक्ताचे पाणी करुन शेतकरी विहीर करतो. त्यानंतर विहिरीला पाणी लागले की नाही कळत नाही. पाणी जरी लागले तरी तो माल पिकतो की नाही याचा भरवसा नाही. म्हणून सन्मानिय बीडीओ मॅडम यांना शेतकऱ्यांच्या घामाने कमावलेला पैसा आम्ही देत आहोत. जर एवढ्या पैशानेही तुमचे पोट भरत नसेल आणि आमच्या विहिरी मंजूर होत नसतील तर सन्मानीय विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या दालनासमोर शेतकऱ्यांना घेऊन जातो आणि कपडे काढून तिथे बसतो तसेच आणखी पैसे देतो,” असा आक्रोश मंगेश साबळे यांनी व्यक्त केला.

“मी पैसा वाटलेला नाही. मी कुठल्या तोंडाने शेतकऱ्यांकडे कामासाठी पैसे मागवू. तुम्ही जर कोणाचे ऐकून फक्त पैसेवाल्यांच्या विहीरींचे काम करणार असाल तर गरिबांचे काम कोण करणार?,” असे मंगेश साबळे, सरपंच म्हणाले.

पाहा व्हिडिओ

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका