आरोग्यताजे अपडेटथिंक टँक स्पेशल

कोरोनाहून भयंकर आजार येणार

जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

Spread the love

“जगानं नव्या आजारासाठी तयार राहावे. जगानं पुढच्या महासाथीसाठी तयार राहायला हवं. कोरोनाचाही नवीन व अधिक धोकादायक व्हेरिएंट येऊन त्यातून आजार आणि मृत्यू वाढण्याची भीती कायम आहे. अशाच प्रकारची आणखीन एक, किंबहुना अधिक जीवघेणी महासाथ येण्याची शक्यताही आपण नाकारू शकत नाही. यानंतर पुन्हा जागतिक आजार येणार असून त्यासाठी जगानं तयार राहायला हवं”.

थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
आता कुठे कोरोनाचं संकट ओसरलं असतानाच कोरोनाहून भयंकर आजारासाठी जगानं तयार राहण्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO चे प्रमुख डॉ. टेड्रॉस अधानोम गेब्रियेसस यांनी दिला आहे. इंडिया टुडेनं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे. या इशाऱ्याने जगभरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेनेच मागील काही दिवसांपूर्वी कोरोना हा सर्वसामान्य आजार असून त्याची सवय लावून घ्यावी असे आवाहन केले आहे. आणि आता याहून भयंकर साथीचा आजार येणार असल्याचा इशारा देवून जगाची झोप उडविली आहे.

जिनिव्हामध्ये आयोजित करण्यात आलेल्या हेल्थ असेम्ब्लीसमोर ते बोलत होते.

गेल्या तीन वर्षांमध्ये कोरोनानं जगभरात घातलेलं थैमान आपण सर्वांनीच पाहिलं. लाखो लोकांचा मृत्यू झाला, तर अजूनही लाखो लोक उपचार घेत आहेत. जिनिव्हामध्ये आयोजित करण्यात आलेल्या हेल्थ असेम्ब्लीसमोर ते बोलत होते. (In Geneva, he would have addressed the Health Assembly.) यावेळी त्यांनी कोरोनाचाही नवा व्हेरिएंट येण्याची भीती व्यक्त केली.

दरम्यान, फ्रान्सचे नोबेल पुरस्कार विजेते डॉ. ल्यूक मॉन्टेग्निअर यांनी नुकताच एक खबळजनक दावा केला आहे. कोरोना व्हायरस हा मानवनिर्मित असल्याचा दावा त्यांनी केला आहे. फ्रान्सचे नोबेल पुरस्कार विजेते ल्यूक मॉन्टेग्निअर यांनी कोरोना व्हायरस हा मानवनिर्मित असल्याचा दावा खबळजनक दावा केला आहे.

कोरोनामुळे २ कोटी मृत्यू?
जगभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची आकडेवारी ७० लाख असल्याचं सांगितलं जातं. मात्र, डॉ. टेड्रॉस यांनी हा आकडा प्रत्यक्षात अनेक पटींनी जास्त असल्याचं म्हटलं आहे. “गेल्या तीन वर्षांत कोरोनानं जगामध्ये उलथापालथ घडवून आणली. किमान ७० लाख लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. पण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की, याचा खरा आकडा याहून कित्येक पटींनी जास्त आहे. किमान २ कोटी इतका हा आकडा आहे”, असं टेड्रॉस म्हणाले. (It is estimated that 70 lakh people have died as a result of Corona worldwide.) त्यांच्या या अंदाजामुळे नवी माहिती जगासमोर आली आहे.

नव्या आजारासाठी तयार राहा
डॉ. टेड्रॉस पुढे म्हणाले कि, “जगानं नव्या आजारासाठी तयार राहावे. जगानं पुढच्या महासाथीसाठी तयार राहायला हवं. कोरोनाचाही नवीन व अधिक धोकादायक व्हेरिएंट येऊन त्यातून आजार आणि मृत्यू वाढण्याची भीती कायम आहे. अशाच प्रकारची आणखीन एक, किंबहुना अधिक जीवघेणी महासाथ येण्याची शक्यताही आपण नाकारू शकत नाही. यानंतर पुन्हा जागतिक आजार येणार असून त्यासाठी जगानं तयार राहायला हवं”. (Due to the introduction of new and more dangerous Corona variants, there is a fear of increased disease and death.)

ते पुढे म्हणाले की,
“जर आपण या सर्व परिस्थितीत बदल केले नाहीत, तर कोण करेल? जर आपण आत्ता हे बदल केले नाहीत, तर मग कधी करणार? जेव्हा पुढची महासाथ येईल, तेव्हा आपण तिचा सामना सक्षमपणे करण्यासाठी, एकत्रितपणे करण्यासाठी तयार राहायला हवं”, असंही टेड्रॉस यांनी या परिषदेत नमूद केलं.

कोरोना व्हायरस हा मानवनिर्मित
दरम्यान, फ्रान्सचे नोबेल पुरस्कार विजेते डॉ. ल्यूक मॉन्टेग्निअर यांनी नुकताच एक खबळजनक दावा केला आहे. कोरोना व्हायरस हा मानवनिर्मित असल्याचा दावा त्यांनी केला आहे. फ्रान्सचे नोबेल पुरस्कार विजेते ल्यूक मॉन्टेग्निअर यांनी कोरोना व्हायरस हा मानवनिर्मित असल्याचा दावा खबळजनक दावा केला आहे. त्यांनी केलेला दावा नक्कीच हैराण करणारा आहे. परंतु त्यांनी सांगितलेल्या गोष्टी लक्षात घेतल्या तर संपूर्ण कल्पना येऊ शकते. (Nobel laureate Dr. Luc Montagnier has claimed that the Corona virus is man-made.)

कोविड-१९मध्ये एचआयव्हीचे एलिमेंट सापडले आहेत. तसंच त्यात मलेरियाचेही काही एलिमेंट सापडले असल्याचे ल्यूक मॉन्टेग्निअर यांनी सांगितलं. यावरून हा व्हायरस मानवनिर्मित असल्याचं सिद्ध होतं. तसंच या व्हायरसचा जन्म प्रयोगशाळेत करण्यात आला असून तो मानवनिर्मित व्हायरस आहे, असंही त्यांनी सांगितलं. फ्रान्समधील सीन्यूझ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला आहे.

एड्सच्या प्रसार करणाऱ्या व्हायरसवर लस तयार करण्याच्या निमित्तानं हा घातक व्हायरस तयार करण्यात आल्याचं ल्यूक मॉन्टेग्निअर यांनी मुलाखतीदरम्यान सांगितलं. यामुळेच कोरोना व्हायरसच्या जिनोममध्ये एचआयव्हीचे काही एलिमेंट्स सापडले आहेत. याव्यतिरिक्त त्यात मलेरियाचेही काही एलिमेंट्स असण्याची शक्यता असल्याचं ते म्हणाले.

हेही वाचा

उर्फी जावेद बनणार ‘खतरों के खिलाडी’

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका