सांगोला/ नाना हालंगडे
बुधवारी ऐन उन्हाळ्यात सांगोला तालुक्यात पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे बळीराजाची चांगलीच धावपळ उडाली आहे.
बुधवारी रात्री साडे नऊ वाजणेच्या सुमारास हलक्या पाऊसाच्या सरीसह विजांचा कडकडाट पहावयास मिळाला. तर सोबतच सोसाट्याच्या वाराही वाहत होता. काहीकाळ वातावरण एकदम बदलून गेले. असा हा पाऊस ऐन मार्च महिन्यात कोसळण्याची पहिलीच घटना असल्याने बळीराजाची चांगलीच धांदल उडाली होती.
गतवर्षीच्या पावसाने चांगलीच दैना उडविली होती. डिसेंबर 22 पर्यंत अवकाळी पाऊसाने बळीराजा हैराण झाला होता. आता तर उन्हाळा चालू व्हायला अन् पाऊसाला सुरुवात व्हायला सुरुवात झाली आहे.
बुधवारी रात्री 9 वाजून 30 मिनिटांनी चक्क पावसाळा पहावयास मिळाला. मागील चार ते पाच दिवसापासून मोठ्या प्रमाणात उकाडा तर काही वेळा ढगाळ वातावरणाने जनजीवन विस्कळीत केले आहे. असे असले तरी,रात्रीची थंडीही परिणामकारक ठरीत आहे.
याच अवकाळी पाऊसामुळे फळबागांचे मोठे नुकसान झालेले पहावयास मिळणार आहे. आंबाच्या बागासह, द्राक्षे, पेरू, विलायची जांभळे याचे मोठे नुकसान होणार आहे. खरे तर सायंकाळीं सात वाजलेपासून विजांचा कडकडाट,तसेच चमकने भीतीदायक असेच होते.
शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी
सोलापूर जिल्ह्यात पुढील पाच दिवस आकाश अंशतः ढगाळ राहील. तसेच पावसासोबत वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने परिपक्व अवस्थेतील रब्बी पिकांची काढणी व मळणी करावी. काढणी केलेल्या शेत मालाची मळणी करणे शक्य नसल्यास पीक सुरक्षित ठिकाणी साठवणूक करून ताडपत्रीचा साहाय्याने झाकून ठेवावे. भाजीपाला व फळपिकाची काढणी लवकर करून घ्यावी, असे आवाहन डॉ. तानाजी वळकुंदे, प्रमुख वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ यांनी केले आहे.