शेकापमध्ये सत्तेचे विकेंद्रीकरण : माजी सरपंच संतोष करांडे
सांगोला/ नाना हालंगडे
सत्तासुंदरीची लालसा नसलेले देशमुख कुटुंबीय गेली 50 वर्षापासून सांगोला तालुक्यात चांगल्या प्रकारे राजकारण करीत असून सर्वच जातीधर्मातील घटकांना न्याय दिला जातो. ही परंपरा भाई गणपतराव देशमुख यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबीयांनी जपलेली आहे. त्यामुळे सत्तेचे विकेंद्रीकरण हे शेकापमध्ये होत असल्याचे डिकसळ माजी सरपंच संतोषनाना करांडे यांनी थिंक टँकशी बोलताना सांगितले.
माजी सरपंच संतोषनाना करांडे म्हणाले की, शेकाप म्हणजे कष्टकरी,दीन दुबळ्या,शेतकरी, गरिबांचा पक्ष असाच काहीसा 50 ते 55 वर्षाचा इतिहास. स्व. आबासाहेबांच्या निधनानंतरही बाईसाहेब, दोन्ही डॉक्टर बंधू आणि त्यांचे चिरंजीव चंद्रकांत देशमुख हे उत्तम प्रकारे राजकारण व समाजकारण सांगोला तालुक्यात चालवीत आहेत. पण काही विघ्नसंतोषी लोक विनाकारण पक्षात दुफळी माजवित आहेत. अशाना पक्षाने खूप काही दिले, मोठे केले तरीही सध्या हीच मंडळींनी संभ्रम अवस्था निर्माण करीत आहेत.
ज्यांनी विकेंद्रीकरनाची भाषा वापरली त्यांनी तर याची जाण ठेवली पाहिजे. जो तो आपले, समाजाचे भले करण्यासाठी वेगवेगळे संदेश पसरवीत आहे. पण हे साफ चुकीचे आहे. पक्षात राहूनच दुफळी माजविनारे, विनाकारण आबासाहेबांच्या निधनानंतर गलका करीत आहेत. त्यांनाही पक्षाने खूप काही दिले आहे. याची तर जान या मंडळींनी ठेवली पाहिजे. नाय तर काळ आणि वेळ त्यांना कदापिही माफ करणार नाही.
पुढे बोलताना करांडे म्हणाले की, सांगोला तालुक्याचा सर्वागीण विकास शेकापनेच केला आहे, हे केंद्रीय मंत्री दिल्लीतून सांगतात. शेतीच्या पाण्याची महत्त्वकांक्षी योजना स्व.आबासाहेबांमुळेच मार्गी लागल्या आहेत. त्यामुळे आबासाहेबांचे खूप मोठे काम सांगोल्यात झालेले आहे. हे कदापिही विसरता येणार नाही. आताही मागील तीन महिन्यापासून झालेल्या सांगोला सूतगिरणी, खरेदी-विक्री संघ, आद्योगिक वसाहत व कृषिउत्पन्न बाजार समिती आदीमध्ये समाजातील सर्वच घटकांना न्याय देण्यात आलेला आहे. त्यामुळे कोणीही पक्षाला बाधा येईल,असे कोणतेच मेसेज पसरवू नयेत.
सध्या पक्षात जे काही सुरू आहे ते 2024 च्या निवडणुकीत जनता दाखवून देणारच आहे. त्यामुळे आपण सर्वांनी, एकदिलाने काम करूया. यासाठी तुम्हीही तत्पर राहा. खरे सत्तेचे विकेंद्रीकरण शेकापच करू शकतो हेही तितकेच खरे आहे. पक्षाचा इतिहास बरेच काही सांगून जात आहे.
पक्षाने खूप काही दिले
शेकापने सर्वसामान्य, दीनदलित, कष्टकरी जनतेला खूप काही दिले आहे.सत्तेचे विकेंद्रीकरणही सतत केले जात आहे. हे मागील तीन महिन्यापासून झालेल्या चार निवडणुकीत दाखवून दिले आहे.
हेही वाचा