थिंक टँक स्पेशलराजकारण

सांगोल्यात आजोबाची चोरी

बाजार समिती निवडणूक रणसंग्राम

Spread the love

सांगोला/ नाना हालंगडे
महाराष्ट्राच्या राजकारणात गेली दहा महिने बाप चोरला, आजोबा चोरला अशी चर्चा चालू असून तशाच प्रकारची सांगोला येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सचिन देशमुख यांनी शेकापसोबत बंडखोरी करून स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख परिवर्तन महाविकास आघाडीची स्थापना करून गणपतराव देशमुख यांचा फोटो लावून मतदान करा अशी मागणी करीत असल्याने येथेही बाप व आजोबा चोरीला गेल्याची चर्चा कार्यकर्त्यात रंगली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून सांगोला तालुका ढवळून निघत आहे. आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, चंद्रकांत देशमुख, डॉ. बाबासाहेब देशमुख, प्राध्यापक पी.सी. झपके, चेतनसिंह केदार असे शेकाप राष्ट्रवादी शिवसेना शिंदे गट काँग्रेस भाजपा हे बलाढ्यपक्ष व बलाढ्य नेते एकत्र आले तरी यांनाही प्रचार करतेवेळी वरच्या बाजूस स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचा फोटो लावून मताचा जोगवा मागण्याची वेळ आली आहे.

ही सर्व मंडळी तालुक्याच्या विकासासाठी एवढा निधी आणला, विकास केला, तालुक्याचे विकासाचे शिल्पकार म्हणून घेत असताना स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या फोटोची गरज काय आहे? ज्या अर्थी देशमुख यांचा फोटो लावून मताचा जोगवा मागू लागले. त्या अर्थी त्यांनी तालुक्याच्या विकासासाठी फार मोठे कार्य केले आहे त्यांचा फोटो लावून मते मागितल्याशिवाय मते मिळणार नाही हे बलाढ्य नेत्यांना खात्री पटली आहे नुसत्या वल्गना चालत नाहीत.

एडवोकेट सचिन देशमुख यांनी स्वर्गीय गणपतराव देशमुख परिवर्तन महाविकास आघाडी करून देशमुख यांचा फोटो लावून मतदानाचे आवाहन केले आहे. जिल्ह्यातील नेत्यांना व तालुक्यातील कार्यकर्ते व मतदारांना वाटत असेल की सचिन देशमुख व गणपतराव देशमुख यांचे जवळचे नाते संबंध आहे. परंतु तसे काही नाही कोळा या जिल्हा परिषद गटातील माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब देशमुख यांचे ते पुतणे होत. सचिन देशमुख हे जिल्हा परिषद सदस्य झाल्याने व जिल्हा परिषदेच्या सभागृहात काही महत्वाचे प्रश्न मांडून चर्चा घडविल्याने व सोडवल्याने ते राजकीय चर्चेत आले एवढीच त्यांच्या जमेची बाजू आहे.

गेली वर्षभर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व माजी मंत्री आदित्य ठाकरे हे बाप चोरला आजोबा चोरला असे सातत्याने प्रसार व प्रचार करीत आहेत तशीच परिस्थिती सध्या तालुक्यात शेकापच्या नेत्यावर अशी म्हणण्याची वेळ आली आहे परंतु ते पुरोगामी विचारसरणीचे असल्याने गणपतराव देशमुख व चंद्रकांत देशमुख डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचे नातेसंबंध सर्व मतदारांना माहीत असल्याने व गणपतराव देशमुख यांचे कार्य तळागाळापर्यंत असल्याने तशी त्यांना म्हणण्याची वेळ येणार नाही कारण मतदार हा सुज्ञ आहे.

परिवर्तन पॅनलमध्ये राष्ट्रवादीचे नेते बाबुराव गायकवाड हे गणपतराव देशमुख यांच्या हयातीत त्यांच्याबरोबर होते सूतगिरणीच्या पासून शरद पवार आमचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून सूतगिरणीचे संचालक होते सहा महिन्यापूर्वी झालेल्या सूतगिरणीच्या बिनविरोध निवडणुकीत पुण्याला संचालक म्हणून संधी देण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अर्ज भरतेवेळी राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांच्या पॅनलमधून अर्ज भरला होता माघार घेण्याच्या अखेर दिवशी अर्ज माघार घेतला नाही व ते परिवर्तन पॅनेलची सलगी करून चिन्ह वाटपा प्रसंगी कप बशी चिन्ह घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत खरच त्यांनी बंडखोरी केली आहे का अशी चर्चा होत असून त्याचबरोबर काही जागा युती करून काही जागा लढवून घेणे व त्यातून सत्ता परिवर्तन घडविणे अशी तरी गेम नाही ना अशी चर्चा जोरात चालू आहे.

गेली दोन दिवस प्रचाराचा नारळ फोडणे चालू आहे कुस्त्यांच्या फडात कुस्ती खेळण्यासाठी जोड्या लावणे काम चालू असते तसेच चालू असून लंगोटा अद्याप लावला नाही परंतु लावल्यानंतरच पैलवान फडात उतरल्यानंतरच ते कोणते डाव काढून स्पर्धकाला खेळवतो याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे

शेकाप मध्येही सर्व अलबेला नाही बहुतांश कार्यकर्त्यांना निवडणूक स्वबळावरच लढवाव्यात असा आग्रह होता परंतु स्वर्गीय गणपतराव देशमुख यांनी सहकारात राजकारणाचे जोडे बाहेर ठेवावेत असा सल्ला ते सातत्याने देत आले होते त्यांनी दिलेला विचार चंद्रकांत देशमुख व डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे वाटचाल करीत असल्याचे दिसत आहेे.

सूतगिरणी खरेदी विक्री संघ सोसायटी पतसंस्था निवडणुकीत तोच विचार घेऊन वाटचाल करून बिनविरोध निवडणुका केल्या परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत त्यांना यश आले नाही शेकाप राष्ट्रवादी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी केल्याने व निवडणूक अधिकारी खमक्या नसल्याने निवडणुका लागल्या आहेत अति सुज्ञ मतदार असल्याने ते निवडणुकीत कोणाला घरी बसवतात हे लवकरच दिसून येईल. Sangola Agricultural Produce Market Committee Election.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका