ताजे अपडेटथिंक टँक स्पेशल

दोन हजारांची पुन्हा नोटबंदी!

आरबीआयने केली घोषणा

Spread the love

नोटा बदलून देण्याची सुविधा देण्याकरिता बँकांना पुरेसा वेळ दिला जाणार आहे. त्यानुसार मे 2023 च्या अखेरपर्यंत या सुविधा सर्वत्र उपलब्ध होण्याची शक्यता आहे. सध्या तरी रिझर्व्ह बँकेने 30 सप्टेंबर 2023 पर्यंत या नोटा बदलून घ्याव्यात अशी सूचना केलेली आहे.

दिल्ली : थिंक टँक न्यूज नेटवर्क
दोन हजारांच्या नोटांची छपाई बंद करण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे. त्यामुळे आता 30 सप्टेंबरनंतर दोन हजारांच्या नोटा चलनातून बंद होणार आहेत. 30 सप्टेंबरपर्यंत दोन हजारांच्या नोटा बँकेत जमा करण्याची मुदत देण्यात आली आहे. (RBI withdraws ₹2000 note from circulation, to remain legal tender)

आरबीआयने बाजारातून 2000 रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, 30 सप्टेंबर 2023 पर्यंत या दोन हजारांच्या नोटा वापरता येणार आहेत, अशी माहिती आरबीआयने दिली आहे.

त्यामुळे 30 सप्टेंबरपर्यंत दोन हजारांच्या नोटा वैध राहणार आहेत. 2018-19 मध्येच दोन हजारांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती, असंही सांगण्यात येत होतं.

नोटा कधीपासून कधीपर्यंत बदलता येणार?

दरम्यान, दोन हजार रुपयांच्या नोटा बँकांमध्ये बदलण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. 23 मे पासून ही प्रक्रिया सुरू होणार असून 30 सप्टेंबरपर्यंत नोटा बदलता येणार आहेत. यासाठी बँकेत एक वेगळी खिडकी सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती आरबीआयने दिली आहे.

दोन हजारांच्या नोटा मागे का?
2000 रुपयांच्या नोटा या रिझर्व्ह बँकेने नोव्हेंबर 2016 मध्ये चलनात आणल्या होत्या. RBI कायदा 1934 अंतर्गत कलम 24(1) अन्वये या नोटा चलनात आल्या.

त्यावेळी भारत सरकारने रुपये 500 आणि 1000 मूल्याच्या नोटा चलनातून बाद केल्याने त्याची भरपाई काढण्यासाठी रिझर्व्ह बँकेने ही सोय केली होती.

तात्पुरत्या वापरानंतर या नोटा 2018-19 साली छापणं रिझर्व्ह बँकेने बंद केलं. मार्च 2017 सालीच या नोटांचा वापर येत्या चार-वर्षांपुरताच करण्यात येईल, असे संकेत रिझर्व्ह बँकेने दिले होते.

बँकेने नकार दिला तर तुम्ही संबंधित बँकेच्या तक्रार विभागात तक्रार करू शकता. जर तक्रार दाखल करुन 30 दिवसांमध्ये बँकेने उत्तर किंवा तोडगा काढला नाही तर तुम्ही रिझर्व्ह बँकेच्या इंटिग्रेटेड ओम्बुड्स्मन योजना (आरबी-आयओएस)2021 नुसार तक्रार करू शकता. ती रिझर्व्ह बँकेच्या cm.rbi.org.in या पोर्टल वर करता येईल.

तेव्हापासूनच बाजारात या नोटा दिसणं कमी झालं होतं. दरम्यान, नोटाबंदीनंतर इतर मूल्यांच्या अनेक नोटा बाजारात दाखल झाल्या.अखेरीस, रिझर्व्ह बँकेच्या क्लिन नोट पॉलिसीअंतर्गत 2000 रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

क्लिन नोट पॉलिसी काय आहे?
रिझर्व्ह बँकेकडून क्लिन नोट पॉलिसी हे धोरण स्वीकारण्यात आलेलं आहे. यानुसार लोकांच्या वापरासाठी बाजारात चांगल्या दर्जाच्या नोटांचा पुरवठा होईल, याची दक्षता रिझर्व्ह बँकेकडून घेतली जाते.

दोन हजारांच्या नोटा बाजारात यापुढेही वापरता येऊ शकतात. 2000 रुपयांच्या नोटा यापुढेही लीगल टेंडर राहतील, असं रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केलं आहे.

म्हणजे, तुमच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा असल्यास यापुढेही त्या नक्की वापरता येतील. या नोटेचा वापर करून तुम्ही तुमचे व्यवहार अजूनही पूर्वीप्रमाणे करू शकता.

पण रिझर्व्ह बँकेने त्यासाठी 30 सप्टेंबर 2023 पर्यंतची मुदत दिलेली आहे. या मुदतीपर्यंत या नोटा बँकेत जमा करून त्या बदल्यात इतर मूल्यांच्या नोटा घ्याव्यात, असा सल्ला रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आला आहे.

KYC (Know your Customer) च्या नियमांप्रमाणे कोणत्याही मर्यादेशिवाय तुम्हाला तुमचे पैसे बँक खात्यात जमा करता येतील.

KYC नसल्यास त्यासाठी रिझर्व्ह बँकेने घालून दिलेले नियम सर्वांनाच लागू असतील.

यादरम्यान, नोटा बदलून घेणाऱ्या व्यक्तीला एका वेळी जास्तीत जास्त 20 हजार रुपये इतर नोटांच्या स्वरुपात बदलून घेता येतील.

नोटा बदलून देण्याची सुविधा देण्याकरिता बँकांना पुरेसा वेळ दिला जाणार आहे. त्यानुसार मे 2023 च्या अखेरपर्यंत या सुविधा सर्वत्र उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

आणि वर उल्लेख केल्याप्रमाणे सध्या तरी रिझर्व्ह बँकेने 30 सप्टेंबर 2023 पर्यंत या नोटा बदलून घ्याव्यात अशी सूचना केलेली आहे.

खाते असलेल्या बँकेतूनच बदलून मिळतील?
वरील प्रश्नांच्या उत्तरांमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही बँकेतून नोटा बदलून मिळू शकतात. मात्र बँकेत खातं नसलेल्या व्यक्तीकरिता नोटा बदलून घेण्यासाठी 20 हजार रुपयांची मर्यादा असेल.

तुमच्या बँक खात्यात पैसे भरण्याचा सोपा पर्याय तुम्ही वापरू शकतात. तुमच्या बँक खात्यात ही रक्कम भरण्यासाठी तुम्हाला कोणत्याच प्रकारच्या मर्यादा नाहीत.2000 ची नोट जमा करण्यासाठी, बदलण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांना कमी त्रास होईल याची काळजी घेण्याची सूचना बँकांना केली आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका