सोलापूर : थिंक टँक न्यूज नेटवर्क
सोलापूर विद्यापीठ कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या अध्यक्षपदी रवी शिंदे यांची निवड करण्यात आली. कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष मनीष सुरवसे यांच्या सहीने श्री. शिंदे यांना निवड पत्र देण्यात आले आहे.
यावेळी सोलापूर विद्यापीठ कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे नूतन कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नूतन अध्यक्ष रवी शिंदे, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष मनीष सुरवसे, जिल्हा परिषद कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अरुण क्षीरसागर, ॲड.सूर्यकांत कांबळे, डॉ. सचिन चौधरी, शिरीष बंडगर, रवींद्र हिप्परगी, संतोष कोळी,किरण कराळे, गजानन काशीद, ॲड. प्रमोद दिवेकर, वसंत सपताळे, अनिल समारंभ, हावळे, शेषराव हणमंते, विकास धाकडे, मारुती कोळी, श्रीमती मंगल कटके, विशाल चाकूरकर, रोहित सोनवणे, शिवाजी पुरणवाड, विकास रोकडे, रमेश गिरे, अरविंद जेटीथोर, कल्याण श्रावस्ती, अनिल धिमधिमे, एम.एम. हैनाळकर, महेश इंगवले, विजयकुमार इंतेवाड, विजय लोंढे, लक्ष्मण गायकवाड, राजेंद्र शिंदे, किशोर कांबळे आदी उपस्थित होते.
सोलापूर विद्यापीठ कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या अध्यक्षपदी रवी शिंदे यांची निवड झाल्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश अध्यक्ष तथा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य राजाभाऊ सरवदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.