गुन्हेगारीथिंक टँक स्पेशल

पाकिस्तानात महिलांच्या मृतदेहांवर बलात्कार?

एएनआयच्या बातमीने जगात खळबळ

Spread the love

विशेष सूचना : पाकिस्तानात यापूर्वी घडलेला हा विषय खूप जुना आहे. मात्र, जगात विश्वासार्ह असलेल्या ANI वृत्तसंस्थेने हा विषय पुन्हा उकरून काढला आहे… चुकीचा फोटो देवून संभ्रम निर्माण केला आहे. ALT fact checking वेबसाईटने हे सर्व खोटे असल्याचे उघड केले आहे.आम्ही या बातमीत सर्व मुद्दे मांडले आहेत… मुख्य प्रवाहातील माध्यमांकडून प्रसिद्ध करण्यात आलेली ही बातमी खोटी आहे अशीच या बातमीची मांडणी आहे.. यातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. – संपादक


थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
कामवासनेने आंधळे झालेले लोक काय करू शकतात? चक्क महिलांच्या मृतदेहावर बलात्कार? तळपायाची आग मस्तकाला पोहोचवणारी बातमी एएनआय या जगप्रसिद्ध वृत्तसंस्थेने दिली आहे. आणि हे घडतंय कुठं तर पाकिस्तानात… पाकिस्तान हा आपला शत्रू राष्ट्र असला तरी जे होतंय ते खूपच वेदनादायी आहे.. वाचा नेमकी काय आहे भानगड…पाकिस्तानात यापूर्वी घडलेला हा विषय खूप जुना आहे. मात्र, जगात विश्वासार्ह असलेल्या ANI वृत्तसंस्थेने हा विषय पुन्हा उकरून काढला आहे… चुकीचा फोटो देवून संभ्रम निर्माण केला आहे. ALT fact checking वेबसाईटने हे सर्व खोटे असल्याचे उघड केले आहे.

 पाकिस्तानात महिलांच्या मृतदेहांवर बलात्कार होत असल्याने कबरींवर लोखंडी जाळी आणि कुलुप पाकिस्तानमध्ये पालक आपल्या घरातील मुली आणि महिलांच्या मृतदेहांवर बलात्कार होऊ नये म्हणून कबरीला कुलुप लावून ठेवत आहेत, असं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिलं आहे.

ANI चा खोडसाळपणा
ANI ही जगात विश्वासार्ह असलेली वृत्तसंस्था म्हणून ओळखली जाते. मात्र, खूप जुना असलेला हा विषय पुन्हा त्यांनी उकरून काढला आहे… चुकीचा फोटो देवून संभ्रम निर्माण केला आहे. ALT fact checking वेबसाईटने हे सर्व खोटे असल्याचे उघड केले आहे. लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, टिव्ही नाईन, न्यूज १८ नेटवर्क, मुंबई तक, तरुण भारत, पुढारी आदी असंख्य मुख्य प्रवाहातील माध्यमांकडूनही हे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. ANI ने दिलेली बातमी खोटी आहे.

मृतदेहांवर बलात्कार?
पाकिस्तानमध्ये पालक आपल्या घरात कोणी मुली किंवा महिला मरण पावल्यास या महिलांच्या मृतदेहांवर बलात्कार होऊ नये म्हणून कबरीला कुलुप लावून ठेवत आहेत, असं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिलं आहे. एएनआयने डेली टाईम्सच्या वृत्ताचा आधार घेत हे वृत्त दिलं आहे. (या वृत्ताची थिंक टँक डिजिटल मीडिया पुष्टी करत नाही.)

हॅरिस सुल्तान यांचे भाष्य
याबाबत सोशल मीडियावरही अनेक दावे केले जात आहेत. लेखक हॅरिस सुल्तान यांनी कट्टरपंथी इस्लामिक विचारांमुळे असे प्रकार होत असल्याचा आरोप केला आहे. हॅरिस सुल्तान यांनी आपल्या ट्वीटमध्ये पाकिस्तानमध्ये महिलांच्या मृतदेहाबरोबर बलात्कार होत असल्याचा दावा करताना म्हटलं, “पाकिस्तानने लैंगिक नैराश्य आलेल्या समाजाला जन्म दिला आहे जेथे महिलांच्या मृतदेहांवर बलात्कार होऊ नये म्हणून कबरींवर कुलुप लावावं लागत आहे. तुम्ही जेव्हा बुर्ख्याचा संबंध बलात्काराशी जोडता तेव्हा हाच बलात्कार कबरीपर्यंत येऊन पोहचतो.”

वासनेने अंध झालेल्या काही नराधमांनी पाकिस्तानात मृत महिलांच्या शरीरावर बलात्कार केल्याची घटना यापूर्वी घडली आहे. एरव्ही अशा घटना घडल्याचे फारसे उघडकीस येत नाही. मात्र असे प्रकार घडू शकतात हे या घटनेतून सिद्ध झाले आहे. नीच मानसिकतेच्या या प्रवृत्तींचा बीमोड करण्यासाठी समाजातून उठाव करण्याची गरज आहे. मृत महिलांचे दहन झाल्यावर राख पळवून नेण्याचेही प्रकार महाराष्ट्रात उघडकीस आले आहेत. याबाबत व्यापक समाजप्रबोधन होण्याची गरज आहे.

कबरींचं संरक्षण करणाऱ्याने ४८ महिला मृतदेहांवर केले होते बलात्कार?
२०११ मध्ये पाकिस्तानमधील एका कबरस्तानमध्ये कबरींचं संरक्षण करणाऱ्याने ४८ महिला मृतदेहांवर बलात्कार केल्याचं कबुल केलं होतं, असंही एएनआयने म्हटलं आहे.

महिलांच्या मृतदेहांवर बलात्कार होऊ नये म्हणून कबरीला कुलुप लावून ठेवत आहेत.

कधी ना कधी हिंसेची शिकार?
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानुसार, पाकिस्तानमध्ये ४० टक्के महिलांना त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी एकदा तरी कोणत्या तरी स्वरुपातील हिंसेला सामोरं जावं लागतं, असंही एएनआयने नमूद केलं आहे. (Rape on women’s bodies in Pakistan? The news of ANI created excitement in the world)

विशेष सूचना : पाकिस्तानात यापूर्वी घडलेला हा विषय खूप जुना आहे. मात्र, जगात विश्वासार्ह असलेल्या ANI वृत्तसंस्थेने हा विषय पुन्हा उकरून काढला आहे… चुकीचा फोटो देवून संभ्रम निर्माण केला आहे. ALT fact checking वेबसाईटने हे सर्व खोटे असल्याचे उघड केले आहे. आम्ही या बातमीत सर्व मुद्दे मांडले आहेत… मुख्य प्रवाहातील माध्यमांकडून प्रसिद्ध करण्यात आलेली ही बातमी खोटी आहे अशीच या बातमीची मांडणी आहे.. यातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. – संपादक

मात्र, तो फोटो जुना
एएनआयने पाकिस्तानमधील महिलांच्या मृतदेहांवर बलात्काराच्या वृत्तासाठी वापरलेल्या फोटोवर फॅक्ट चेकिंग वेबसाईट असलेल्या अल्ट न्यूजने आक्षेप घेतला आहे. एएनआयने कबरींना कुलुप लावण्यासाठी जो फोटो वापरला तो पाकिस्तानमधील नसून हैदराबादमधील असल्याचं अल्ट न्यूजने म्हटलं आहे. (Alt News is an Indian non-profit fact checking website founded and run by former software engineer Pratik Sinha and Mohammed Zubair.)

कबरीचा फोटो हैदराबादमधील
एएनआयने कबरींना कुलुप लावण्यासाठी जो फोटो वापरला तो पाकिस्तानमधील नसून हैदराबादमधील असल्याचं अल्ट न्यूजने म्हटलं आहे.

याबाबत अल्ट न्यूजने हैदराबादमधील रहिवाशांच्या मदतीने कुलुप लावलेल्या कबरीचा व्हायरल फोटो आणि हैदराबादमधील कबरीचा वास्तवातील फोटो असा तुलनात्मक अभ्यासही केला. यातून व्हायरल होत असलेला कबरीचा फोटो पाकिस्तानमधील नसून हैदराबादमधील असल्याचं स्पष्ट झालं आहे.

कबरीवर कुलुप का?
अल्ट न्यूजने म्हटले आहे की, हैदराबादमधील ज्या कबरस्तानमध्ये ही कबर आहे तेथे जागेअभावी अनेकदा कबरस्तान समितीच्या परवानगीशिवाय बेकायदेशीरपणे जुन्या कबरींवरच नव्याने मृतदेहाचा दफनविधी केला जातो. त्यामुळे हे प्रकार रोखण्यासाठी एका कबरीवर नातेवाईकांनी सुरक्षा म्हणून लोखंडी जाळी लावली होती. त्याचा बलात्काराशी कोणताही संबंध आढळला नाही.

ANI चे Tweet

 

मृतदेहाची विटंबना
वासनेने अंध झालेल्या काही नराधमांनी पाकिस्तानात मृत महिलांच्या शरीरावर बलात्कार केल्याची घटना यापूर्वी घडली आहे. एरव्ही अशा घटना घडल्याचे फारसे उघडकीस येत नाही. मात्र असे प्रकार घडू शकतात हे या घटनेतून सिद्ध झाले आहे. नीच मानसिकतेच्या या प्रवृत्तींचा बीमोड करण्यासाठी समाजातून उठाव करण्याची गरज आहे. मृत महिलांचे दहन झाल्यावर राख पळवून नेण्याचेही प्रकार महाराष्ट्रात उघडकीस आले आहेत. याबाबत व्यापक समाजप्रबोधन होण्याची गरज आहे.

‘द कर्स ऑफ गॉड, व्हाई आई लेफ्ट इस्लाम’ या पुस्तकाचे लेखक हॅरिस सुल्तान यांनी हे कृत्य घृणास्पद असून यामागे कट्टरपंथीय असल्याचं म्हटलंय .पालक आपल्या मृत मुलींच्या कबरीवर टाळं लावतात, कारण त्यांना भीती आहे त्यांच्या मुलीच्या मृतदेहाची विटंबना होऊ नये, असं हॅरिस सुल्तान यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

नेक्रोफिलिया हा एक ग्रीक शब्द आहे. नेक्रो म्हणजे मृतदेह आणि फीलिया म्हणजे प्रेम. नेक्रोफिलिया म्हणजे मृतदेहाबरोबर संबंध प्रस्थापित करुन आनंद मिळवणं.

2011 मध्ये पहिलं प्रकरण
नेक्रोफीलियाचं पहिलं प्रकरण 2011 मध्ये पाकिस्तानच्या निजामबादमध्ये समोर आलं होतं. कबरीस्ताचा सुरक्षारक्षक असलेल्या रिझवान नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी याप्रकरणी अटक केली होती. आरोपीने 49 महिलांच्या मृतदेहांवर बलात्कार केला होता. पाकिस्तानमधल्या कराची आणि इतर शहरातीही अशा घटना समोर आल्या आहेत. सिंध प्रातांतील एका गावात 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या मृतदेहाबरोबर विकृत प्रकार करण्यात आला. त्याआधी आरोपींनी एका महिलेचा मृतदेह कबरीतून बाहेर काढून घाणेरडं कृत्य केलं होतं.

40 टक्के महिला हिंसाग्रस्त
मानवाधिकार आयोगाने दिलेल्या एका अहवालानुसार पाकिस्तानात 40 टक्क्याहून अधिका महिला कधी ना कधी हिसेंच्या शिकार ठरल्यात. याप्रकरणी अद्याप पाकिस्तान सरकारची प्रतिक्रिया समोर आलेली नाही. पण बलात्काराच्या वाढत्या घटनांमुळे पाकिस्तानात महिलांच्या कबरीवर लोखंडाचं गेट लावलं जात असून त्याला टाळवलं लावण्यात येतंय. पण यानंतही असे घृणास्पद प्रकार थांबवण्याचं नाव घेत नाहीएत.

जमीयत उलाम ए इस्‍लाम पाकिस्‍तानचे मौलाना राशिद यांनी या घटनेची तीव्र शब्दात निंदा केली आहे. जीवंत असताना महिला वाईट नजरेपासून स्वत:ला कशाबशा वाचवत होत्या. पण प्रकरण आता त्यांच्या कबरीपर्यंत पोहोचलं आहे. हे भयंकर तर आहेच पण देशासाठी लाजीरवाणंही असल्याचं मौलाना राशिद यांनी म्हटलंय. आरोपींना कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी त्यांनी केलीय.

नेक्रोफिलिया म्हणजे काय?
नेक्रोफिलिया हा एक ग्रीक शब्द आहे. नेक्रो म्हणजे मृतदेह आणि फीलिया म्हणजे प्रेम. नेक्रोफिलिया म्हणजे मृतदेहाबरोबर संबंध प्रस्थापित करुन आनंद मिळवणं.necrophiliac meaning


विशेष सूचना : पाकिस्तानात यापूर्वी घडलेला हा विषय खूप जुना आहे. मात्र, जगात विश्वासार्ह असलेल्या ANI वृत्तसंस्थेने हा विषय पुन्हा उकरून काढला आहे… चुकीचा फोटो देवून संभ्रम निर्माण केला आहे. ALT fact checking वेबसाईटने हे सर्व खोटे असल्याचे उघड केले आहे. आम्ही या बातमीत सर्व मुद्दे मांडले आहेत… मुख्य प्रवाहातील माध्यमांकडून प्रसिद्ध करण्यात आलेली ही बातमी खोटी आहे अशीच या बातमीची मांडणी आहे.. यातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. – संपादक

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका