ताजे अपडेट
प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनतर्फे सांगोल्यात कम्युनिटी ट्रेनिंग सेंटर सुरू
तालुक्यातील बेरोजगारांना प्रशिक्षणाची संधी
कमलापूर, वाढेगाव, सावे, बामणी, देवळे, मेथवडे, संगेवाडी, अजनाळे, वाटंबरे, चिंचोली, कडलास, मेडसिंगी, एखतपुर, अकोला, वासूद या गावांमधील तरुणांना कोर्सला प्राधान्याने प्रवेश मिळेल.
प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनतर्फे सांगोला येथे तालुक्यातील १५ गावांसाठी कम्युनिटी ट्रेनिंग सेंटर येत्या १५ डिसेंबरपासून सुरू करण्यात येत आहे. या माध्यमातून तालुक्यातील बेरोजगारांना प्रशिक्षणाची संधी मिळेल अशी माहिती प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनचे तालुका समन्वयक बापूसाहेब ठोकळे यांनी दिली.
प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनतर्फे या उपक्रमांतर्गत अटॉमोटीव्ह फोर व्हिलर मेकॅनिक हा एक महिन्याचा कोर्स मोफत सुरू करण्यात येणार आहे. हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर एकूण १५ दिवसांचे ॲडव्हान्स प्रशिक्षण कोल्हापूर येथे देण्यात येणार आहे.
या गावातील तरुणांना मिळणार संधी
कमलापूर, वाढेगाव, सावे, बामणी, देवळे, मेथवडे, संगेवाडी, अजनाळे, वाटंबरे, चिंचोली, कडलास, मेडसिंगी, एखतपुर, अकोला, वासूद या गावांमधील तरुणांना कोर्सला प्राधान्याने प्रवेश मिळेल.
इच्छुक असलेल्या उमेदवारांनी संपर्क साधावा असे आवाहन बापूसाहेब ठोकळे (9421041433) यांनी केले आहे.