ताजे अपडेट

पश्चिम महाराष्ट्रात एकाच दिवसात २.२० कोटींच्या वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

महावितरणकडून मोहिमेत वीजचोरांना दणका

Spread the love

वितरण व वाणिज्यिक हानी कमी करण्यासाठी वीजचोरीविरुद्ध महावितरणची नियमित कारवाई सुरु आहे. ही कारवाई आणखी वेगाने व धडकपणे करण्यासाठी पुणे प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे यांनी पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये महिन्यातून एक दिवस वीजचोरीविरोधात विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहे. त्याप्रमाणे शनिवारी (दि. २) सकाळी ९ वाजता सर्वच जिल्ह्यांमध्ये या मोहीमेला सुरवात झाली व सायंकाळी उशिरापर्यंत घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी आदींचे १९ हजार ९०० वीजजोडण्यांची तपासणी करण्यात आली.

पुणे : थिंक टँक न्यूज नेटवर्क
पुणे प्रादेशिक विभागात एकाच दिवशी घेण्यात आलेल्या विशेष मोहिमेत १७२७ ठिकाणी अनधिकृत वीजवापर करणाऱ्यांना महावितरणकडून दणका देण्यात आला आहे. यात वीजतारेच्या हूकद्वारे किंवा मीटरमध्ये फेरफार केलेल्या १३९० वीजचोऱ्यांचा समावेश आहे. पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत एकाचवेळी दिवसभर झालेल्या या कारवाईमध्ये सुमारे १३ लाख ४९ हजार युनिट म्हणजे २ कोटी १९ लाख ७८ हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आली आहे.

दरम्यान वीजचोरी उघड केल्यानंतर संबंधितांविरुद्ध महावितरणकडून फौजदारी कारवाई करण्यात येत आहे. वीजचोरीच्या गुन्ह्यात तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे विजेची चोरी करण्याऐवजी रितसर अधिकृत वीजजोडणी घ्यावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

वितरण व वाणिज्यिक हानी कमी करण्यासाठी वीजचोरीविरुद्ध महावितरणची नियमित कारवाई सुरु आहे. ही कारवाई आणखी वेगाने व धडकपणे करण्यासाठी पुणे प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे यांनी पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये महिन्यातून एक दिवस वीजचोरीविरोधात विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहे. त्याप्रमाणे शनिवारी (दि. २) सकाळी ९ वाजता सर्वच जिल्ह्यांमध्ये या मोहीमेला सुरवात झाली व सायंकाळी उशिरापर्यंत घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी आदींचे १९ हजार ९०० वीजजोडण्यांची तपासणी करण्यात आली.

यामध्ये (कंसात वीजचोरीची रक्कम) पुणे जिल्हा- ८३८ (१ कोटी २८ लाख ५८ हजार), सातारा- १६६ (१४ लाख ७६ हजार), सोलापूर- ३१९ (२५ लाख ४९ हजार), कोल्हापूर- १५४ (२८ लाख ७९ हजार) व सांगली जिल्ह्यात २३० (२२ लाख १६ हजार) अशा एकूण १७२७ ठिकाणी २ कोटी १९ लाख ७८ हजार रुपयांचा अनधिकृतपणे वीजवापर उघडकीस आला.

वीजबिलांच्या थकबाकीमुळे खंडित आलेला वीजपुरवठा परस्पर जोडून घेत किंवा अन्य ठिकाणाहून वीजवापर करणाऱ्या ग्राहकांविरुद्ध सुद्धा या मोहिमेत फौजदारी कारवाई करण्यात येत आहे. वीजचोरी प्रकरणात ज्यांनी दंडात्मक रकमेसह चोरीच्या वीजवापराप्रमाणे संपूर्ण बिलाची रक्कम भरली नाही तर त्यांच्याविरुद्ध कलम १३५ नुसार फौजदारी कारवाई करण्यात येत आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका