थिंक टँक स्पेशल

हरी नरकेंचा मृत्यू संशयास्पद! उपचारात हलगर्जीपणा की षडयंत्र?

Spread the love

हरी नरके यांचे मित्र संजय सोनवणी यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ जारी करत हरी नरके यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या लीलावती हॉस्पिटलवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. महाराष्ट्र शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी असे त्यांनी म्हटले आहे. नरके यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही असे ते म्हणाले.

मुंबई : थिंक टँक न्यूज नेटवर्क
ज्येष्ठ विचारवंत, थोर अभ्यासक हरी नरके (Hari Narake Daith) यांच्या मृत्यूवर संशय व्यक्त केला जात आहे. त्यांचा मृत्यू हा मुंबईतील प्रतिष्ठित अशा लीलावती रूग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळं झालाय की त्यामागे षडयंत्र आहे याची चौकशी महाराष्ट्र सरकारनं करावी, अशी मागणीच हरी नरके यांचे मित्र, लेखक संजय सोनवणी (Sanjay Sonawani) यांनी केली आहे.

दरम्यान, शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी हरी नरके यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेताना व्यक्त केलेल्या श्रद्धांजलीपर भाषणात हरी नरके यांचा मृत्यू हे एक षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे.

२२ जून २०२३ मध्ये हरी नरके आणि सोनवणी यांच्यात व्हॉट्सएपच्या माध्यमातून तब्येतीविषयी चर्चा झाली होती. त्यात नरके यांनी लीलावती रूग्णालयाच्या डॉक्टर्सनी त्यांच्या तब्येतीकडे कशाप्रकारे अक्षम्य दुर्लक्ष केलं, हे स्पष्टपणे म्हटलं होतं. ही संपूर्ण व्हॉट्सएप चॅटचा संजय सोनवणी यांनी सोशल मीडियावर शेअर केलीय.

हरी नरके यांनी संजय सोनवणी यांनी पाठविलेला व्हॉट्सॲप मेसेज.
हरी नरके यांनी संजय सोनवणी यांनी पाठविलेला व्हॉट्सॲप मेसेज.

दोषी डॉक्टरांवर कारवाई करा : सोनवणी
“डॉक्टर प्राणदान करण्यासाठी असतात की प्राण घेण्यासाठी यावर गंभीर विचार झाला पाहिजे. डॉक्टरांनी lAB रिपोर्ट्सकडे दुर्लक्ष करून त्यांच्या आजाराचे चुकीचे निदान केले. जवळपास 10 महिने त्यांच्यावर चुकीचे औषधोपचार झाले. यामुळे मूळ आजार बळावून हरिभाऊ अकाली गेले. यामुळे पुरोगामी विचारपर्वाचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. हरिभाऊ राष्ट्रीय वैचारिक संपत्ती होते. त्यांचा मृत्यू सदोष मनुष्यवधाचा प्रकार आहे. दोषी डॉक्टर्सवर कायदेशीर कारवाई का होऊ नये?”, असे संजय सोनवणी यांनी म्हटले आहे.

हरी नरकेंनी संजय सोनवणी यांनी केलेला व्हॉट्सॲप मेसेज

(२२ जून २०२३चा whatsapp संदेश)

“प्रिय भाऊ, नमस्कार
गुजरात जामनगरला 3 आठवडे ट्रीटमेंट घेऊन
पुण्यात घरी पोचलो आहे. अंगात थोडा ताप आहे. खूप अशक्तपणा आहे. बीपी लो आहे.

आधी हातापायावर खूप सूज होती. शरीरात 20 किलो पाणी ज्यादाचे साठले होते. त्यामुळे किडनी व हार्टवर प्रेशर येऊन श्वास घ्यायला खूप त्रास होत होता.

ट्रीटमेंटमुळे 20 दिवसात 20 किलो पाणी ड्रेन झाले. त्यामुळे श्वास पूर्ण मोकळा झाला.

मात्र बीपी 60 90 असे लो असून विकनेस खूप आहे. लीलावती हॉस्पिटलच्या नामवंत डॉक्टरांच्या निष्काळजीपणे 10 महिने त्रास सहन करावा लागला. शिवाय हार्टफेल व किडनी फेलच्या धोक्याच्या 4 थ्या स्टेजवर आलो होतो.

जास्तीत जास्त 2 महिने लाईफ मिळाले असते.

हार्टफेल व किडनी फेलने मृत्यू निश्चित होता.

लीलावतीमधील नामवंत Cardeologist, pulminologist खूप लॅब रिपोर्ट मागवतात पण ते वाचत नाहीत. त्यामुळे हार्ट नॉर्मल आहे. किडनी नॉर्मल आहे. असे अँजिओग्राफी करून लेखी रिपोर्ट दिलेत त्यांनी. परिणामी फॉलोअपला पुण्याचे डॉ. अभिजित वैद्य, महेंद्र कावेडिया, औरंगाबादचे डॉ. आनंद निकाळजे सगळेच चकले.

लीलावतीवाले हार्टऐवजी मला नसलेल्या अस्थमावर उपचार करीत राहिले. पण धाप लागणे वाढतच गेले. धोका वाढतच गेला. regards.

[14:29, 22/06/2023] Hari Narke 2: हा लिलावतीचा लॅब रिपोर्ट सांगतो हार्ट फेलचा धोका आठपट आहे .. पण त्यांनी वाचलाच नाही.आणि ऑल ओके असा चुकीचा रिपोर्ट लिहून दिला. तो 10 महिन्यात 21पट झाला होता.
आता बरा होतोय.”

———–
दरम्यान, शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी हरी नरके यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेताना व्यक्त केलेल्या श्रद्धांजलीपर भाषणात हरी नरके यांचा मृत्यू हे एक षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे.

हरी नरके यांचे मित्र संजय सोनवणी यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ जारी करत हरी नरके यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या लीलावती हॉस्पिटलवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. महाराष्ट्र शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी असे त्यांनी म्हटले आहे. नरके यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही असे ते म्हणाले.

(संजय सोनवणी यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ जारी केला.. 🔗)

https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02CoHrAdMdAMyq37nXhdh5vYNgKL37WgbMfZRhHfhv3ZK7Thbj4BGzw4Vhq9LW39Spl&id=100004123179452&mibextid=9R9pXO

वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या शमीभा पाटील यांनी लिहिले आहे की, “हे बघा कत्तलखाने चालविणारे वैद्यकीय पेशेकरी… माणूस म्हणून थोडी तरी लाज शिल्लक ठेवली नाहीये आपण. संवेदना हरवत जातोय, मुकी जनावरे बरी आपल्यापेक्षा शेजारच्या प्राण्याची जखम चाटतात… पण हे टाळुवरचे लोणी खाणारे व मढ्यावर भाकरी शिजविणारे माणसं …

हरी नरके सरांसारखा एक प्रचंड ताकदीचा व वैचारिक परिवर्तनाची दिशा असलेला बुर्ज्वा हरवतो तेव्हाच,त्रासदायक होते.”


मान्यवरांनी व्यक्त केला शोक

शरद पवार
“मराठी लेखक, अभ्यासू संशोधक, वक्ते आणि मराठी ब्लॉगर प्रो. हरी रामचंद्र नरके यांचे दुःखद निधन झाले. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यापनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते. त्यांच्या निधनाने एक ज्वलंत अभ्यासू व्यक्तिमत्व आज आपण गमावले.

हरी नरके हे पुण्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर उपाध्यक्ष होते. मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलुगू या प्रमाणेच एक अभिजात भारतीय भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून प्रा. हरी नरके यांनी योगदान दिले.

हरी नरके यांच्या विविध नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेल्या लेखांचे विषय ज्वलंत उदाहरणे आहेत. जसे, ओबीसींमध्ये पेरली दुहीची बीजे, फॅसिस्ट शक्तीमुळे बहुजनांचे विभाजन, मराठा आरक्षण, महात्मा फुले, समाजशोध इत्यादी. त्याप्रमाणेच त्यांची पुस्तके, महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन, महात्मा फुले – शोधाच्या नव्या वाटा असे अनेक पुस्तके प्रकाशित झाली.”

बाळासाहेब थोरात (काँग्रेस नेते)
“ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत आणि माझे अत्यंत चांगले मित्र प्रा. हरी नरके यांचे आकस्मित जाणे वेदनादायी आहे.

बहुजन चळवळीबद्दल कमालीची आस्था असणारा हा लढवय्या विचारवंत होता. शोषित, पीडित आणि प्रामुख्याने बहुजन स्त्रियांच्या न्याय हक्कांसाठी त्यांनी आयुष्यभर आपली लेखणी झिजवली. महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाचे अनेक महत्वाचे पैलू त्यांनी समाजासमोर ठेवले.

माझा आणि प्रा. हरी नरके यांचा स्नेहबंध पुरोगामी चळवळीतूनच जुळला. आम्ही तासन्‌तास सोबत घालवले. बदललेले राजकारण, समाजकारण आणि एकूणच व्यवस्था यावर ते भरभरून गप्पा मारायचे. बाहेरून अत्यंत टोकदार वाटणारे प्रा. नरके मनाने मात्र प्रचंड हळवे होते. नाशिकच्या साहित्य संमेलनात आम्ही बऱ्याच अवधीनंतर एकत्र भेटलो, जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. पुरोगामी विचार टिकला पाहिजे आणि तो पुढे नेण्यासाठी तरुण पिढीला तयार केले पाहिजे ही त्यांची तळमळ त्या दिवशी बोलण्यातून जाणवली. मित्रवर्य प्रा. हरी नरके यांना भावपूर्ण श्रद्धांजली.”

विजय वडेट्टीवार (विरोधी पक्षनेते)
“भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
फुले साहित्याचे अभ्यासक, विचारवंत प्रा.हरी नरके यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. आपल्या सखोल अभ्यासातून ओबीसींच्या प्रश्नांना सरकारसमोर मांडण्याचे कार्य त्यांनी केले. ओबीसींच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना समता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी अनेकदा धारेवर धरले आणि ओबीसींना न्याय मिळवून दिला होता. आज त्यांच्या निधनाने फुले- आंबेडकरवादी विचारांचा लढवय्या विचारवंत आणि अनुयायी आपल्यातून हरवला आहे. या दुःखातून सावरण्यासाठी त्यांच्या कुटुंबाला व मित्र परिवाराला बळ मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.”

डॉ. भालचंद्र मुणगेकर
“फुले-आंबेडकर यांचे विचार आणि चळवळीचे जेष्ठ अभ्यासक व संशोधक डॉ. हरी नरके यांचे अवघ्या ७० व्या वर्षी म्हणजे अकाली निधन झाले. ही महाराष्ट्रातील प्रगतीशील चळवळीचे फार मोठे नुकसान झाले. गेली ३० वर्षे आम्ही मित्र व सहकारी होतो. त्यांना माझी विनम्र श्रद्धांजली.”

संजय आवटे (संपादक – लोकमत, पुणे)
“हरी,
Hari Narke
किती ही ‘हरी’ तुम्हाला, असं मी गंमतीनं म्हणायचो!
पण, इथंही घाई केलीत तुम्ही.

आज किती गरज होती तुमची!
नको ते लोक वाचाळ होत असताना आणि भिडेपोटी सारे गप्प असताना, तुम्हीच तर आवाज होतात या भवतालात!
अशा ऐन निर्णायक क्षणी जायला नको होतं, सन्मित्र.
आता तर लढाई सुरू झाली होती.

जगाचं नुकसान केलंच तुम्ही.
पण, माझं खूप नुकसान झालंय.
ते भरून निघणार नाही.

Sangita
Pramitee
आपण सोबत आहोत.”

ॲड. असिम सरोदे
“आज हरी नरके Hari Narke गेले. शेखर सोनाळकर, डॉ. अहंकारी आणि आज हरी नरके यांचे निधन. समाजाला आताच्या काळात गरज असणारे एक एक माणसं जात आहेत. विश्वास बसणार नाही अशा मृत्यूंना धक्कादायक म्हणतांना या माणसांनी केलेले रचनात्मक काम इतके उभारले की त्यांच्या जाण्यामुळे आता एक पोकळी निर्माण झाली आहे ही जाणीव आपल्याला दुःख वाटण्यामागे आहे. हरी नरके अविरतपणे महात्मा फुलेंना समाजात उपस्थित करत राहिले आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे उद्धारक कसे असतात हे मांडत राहिले.
विनम्र श्रद्धांजली !!”

कौस्तुभ दिवेगावकर (सनदी अधिकारी)
“मागच्या काही दिवसातच शेखर सोनाळकर, ना धो महानोर, काल डॉ. शशिकांत अहंकारी आणि आज प्रा. हरी नरके… महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात कार्यरत आणि महत्त्वाचे योगदान देणाऱ्या सर्वांचे जाणे हळहळ वाटायला लावणारे आहे. डॉ अहंकारी खूप आजारी होते. मागच्या काही दिवसात पुण्यात त्यांना भेटलो. नरके सरांशी अशात फोनवर एकदोनदा बोलणे झाले. तब्येत बरी होत आहे असे बाहेरून कळत होते. पण आज अशी बातमी आली. मोठी पोकळी निर्माण झाली आहे. भावपूर्ण आदरांजली.”

भैया पाटील (युवा लेखक)
“मला लेखक म्हणून जी मान्यता मिळाली ती हरी नरके सरांच्या लेखांचा प्रतिवाद केल्यामुळे पण माझ्या लेखामुळे हरी नरके सर दुखावले होते.. सोशल मीडियावर आमचा वादप्रतिवाद अनेक वर्ष सुरु होता. त्यांच्या सारखा अभ्यासू माणूस होणे नाही. व्यक्तिगत नरके सरांचे आणि माझे चांगले संबंध होते. आज लीलावती सारख्या हॉस्पिटल मधील डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे नरके सरांचे निधन झाले.नरके सरांचे निधन झाल्याने अतीव दुःख झाले आहे. अत्यंत हालाखीत नरके सरांनी जीवन काढले. समशान भूमीचा रक्षक म्हणून सुरुवात करत शिक्षण पूर्ण करून एक विचारवंत लेखक म्हणून त्यांनी मान्यता मिळवली.
नरके सरांना भावपूर्ण श्रद्धांजली.”

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका