थिंक टँक / नाना हालंगडे
शिंदे – फडणवीस सरकारने यंदा DJ डॉल्बी वाजवायला मुक्त परवानगी दिल्याने सर्वत्र मिरवणुकांमध्ये दणदणाट दिसून येत आहे. डॉल्बीच्या तालावर तरुणाई झिंगाट होत आहे. डॉल्बीवर नाचताना एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे.
या बातमीमुळे देण्यात आलेल्या लिंकमधील व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, एक तरुण डीजेच्या तालावर आनंदानं नाचत आहे. उपस्थितांपैकी एक जण या तरुणाचा नाचतानाचा व्हिडीओ चित्रित करत आहे. तरुण गाण्याच्या तालावर नाचत आहे. मात्र अचानक हा तरुण तोंडावर खाली कोसळतो आणि सर्वच जण चकित होतात. डीजेच्या तालावर नाचणाऱ्या या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.
डीजेच्या तालावर नाचताना मृत्यू
डीजेच्या तालावर नाचणाऱ्या एका युवकाचा खाली कोसळत मृत्यू झाल्याची घटना नांदेडमधील आहे. नांदेडच्या किनवट तालुक्यातील शिवणी गावातील या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
18 वर्षीय विश्वनाथ जाणगेवाड याचा लग्नाच्या वरातीत डीजेच्या तालावर नाचताना खाली कोसळून मृत्यू झाला आहे. घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ह्रदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू
या तरुणाचा ह्रदयविकाराचा झटका मृत्यू झाल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. या घटनेवर हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, तरुणाच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. या तरुणाच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.
अलीकडे तरुणांना हृदयविकाराचा धोका वाढता असल्याचं निष्पन्न झालं आहे. विशीमध्ये आणि तिशीमध्येही तरुणांना हृदयविकार होण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यासाठी त्यांची चुकीच्या पद्धतीची जीवनशैली कारणीभूत आहे.
धमण्यांमध्ये ब्लॉकेज
सध्याच्या व्यस्त आणि धावत्या जीवनशैलीमुळे गेल्या काही काळात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे. कमी वयाच्या लोकांनाही हृदयविकाराचा त्रास जाणवतो. असंतुलित आहार, व्यायाम तसेच शारीरिक हालचाली कमी होत असल्याने हृदयविकाराच्या तक्रारी वाढल्या आहेत.
पाहा व्हिडिओ
डीजेच्या तालावर नाचताना अचानक कोसळला तरुण… ह्रदयविकाराचा झटका आल्याने जागीच मृत्यू झाल्याची चर्चा…
हा व्हिडीओ नांदेडमधील असल्याचं म्हटलं जातंय… #Viral #Dance #Video #Nanded pic.twitter.com/MrgbiZXwUx— Snehal D. Pawanak (@miss_curly_20) February 26, 2023
चुकीच्या सवयींमुळे हृदयाला रक्तपुरवठा करण्याऱ्या धमण्यांमध्ये ब्लॉकेज तयार होतात आणि हृदयविकाराचा त्रास वाढत जातो. त्याकडे दुर्लक्ष केल्यास हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होऊ शकतो. तिशीमध्येही तरुणांना हृदयविकार जाणवू लागले आहेत.