तुला काय अक्कल आहे का? मॉक ड्रिल दरम्यान दहशतवादी बनलेल्या तरुणाला पालकाने दिला चोप
धुळे : थिंक टँक न्यूज नेटवर्क
एखाद्याचं असं हसं होतं की लोकांना हसावं की रडावं तेच कळत नाही. असाच एक प्रकार धुळे येथे झाला. पोलिस मॉक ड्रिलवेळी दहशतवाद्याची भूमिका निभावणाऱ्या तरुणाला चांगलाच चोप बसला. तुला काय अक्कल आहे का? हे बोल सुनावत एका व्यक्तीने त्याचे गाल लाल केले.
त्याचे झाले असे की, धुळे (Dhule News) शहरात दहशतवादी (Terrorist Attack) हल्ल्याच्या मॉक ड्रिल (mock drill) दरम्यान दहशतवादी म्हणून आलेल्या एका व्यक्तीला पालकांच्या रोषाचा सामना करावा लागल्याचा प्रकार समोर आला आहे. दहशतवादी हल्ला झाल्यावर कशी प्रतिक्रिया द्यायची याबद्दलचं प्रात्यक्षिक धुळे शहरातील स्वामीनारायण मंदिरामध्ये करण्यात आलं होतं. यावेळेस प्रात्यक्षिकामुळे मंदिरात उपस्थित असलेले नागरिक चांगलेच घाबरले होते. लहान मुलांनी रडण्यास आणि जोरजोरात ओरडण्यास सुरुवात केली. हे पाहून एका संतप्त पालकाने थेट दहशतवादी बनून आलेल्या व्यक्तीला चांगलाच चोप दिला. विशेष म्हणजे प्रात्यक्षिक सुरू असतानाच पालकाने त्या तरुणास चोप देण्यात आला.
पाहा व्हिडिओ
महाराष्ट्र के #Dhule धुले के #SwamiNarayanMandir में पुलिस को #Mockdrill करना पड़ा भारी..मंदिर में मौजूद बच्चों के डरने और चीखने से एक नाराज़ पिता ने डमी आतंकी बने पुलिसवाले को मारा थप्पड़.. वीडियों हुआ वायरल..घटना 6 अगस्त शाम की है..@indiatvnews@SpDhule pic.twitter.com/DB7LJXdxFS
— Atul singh (@atuljmd123) August 8, 2023
प्रात्यक्षिक सुरू असताना दहशतवाद्याला प्रत्यक्ष मारहाण होत असल्याचं पाहून सुरुवातीला पोलिसांच्याही काही लक्षात येईना. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत संतप्त पालकाला बाजूला केले आणि हे मॉक ड्रिल पूर्ण केले. पालकांच्या या संतप्त प्रतिक्रियेमुळे मात्र उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली. दुसरीकडे पोलिसांनी त्या पालकाची समजूत घालून त्याला बाजूला नेले. मात्र तोवर दहशतवादी बनलेल्या व्यक्तीचे मार खाल्याने कान चांगलेच लाल झाले होते.
यावेळी बोलताना सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी म्हणाले की, “आज आम्ही, स्वामीनारायण मंदिराशेजारी मॉक ड्रिल केले. या मॉक ड्रिलचा उद्देष हाच आहे की अशी परिस्थिती आली तर लोकांनी काय करायला हवं आणि पोलीस यंत्रणा त्यावर काय करते याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यामध्ये आम्हाला थोडे यश मिळाले आहे. आमची पोलीस यंत्रणा सतर्क आहे,” अशी माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांनी दिली.