थिंक टँक स्पेशलराजकारण

विरोधक निर्लज्ज आणि घोटाळेबाज

देवेंद्र फडणवीसांची सडकून टीका

Spread the love

विरोधकांनी जे केले ते लोकशाहीवादी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या नव्या संसदेचे उदघाटन करणार असतील तर मग पोटशूळ का? विरोधक हे खुर्चीचे व्यापारी आहेत. सत्ता आणि खुर्चीच्या लोभाने हे विरोधक एकत्र येतात. विरोधकांकडे नेता, नीती आणि नियत तिन्ही नाहीत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सोलापूर (आसबे न्यूज ब्युरो) : काँग्रेस आणि जे अन्य पक्ष संसदेच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची भाषा करीत आहेत, त्यांचा लोकशाहीवर अजिबात विश्वास नाही. संसद (Parliament of India) ही केवळ एक इमारत नाही, तर 140 कोटी देशवासियांच्या आस्थेचे मंदिर आहे, असे सांगतानाच यापूर्वीची अशी अनेक उदाहरणे सांगत त्यावेळी बहिष्कार का आठवला नाही, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Maharashtra Deputy chief minister Devendra Fadanvis) यांनी विरोधकांना केला.

हे सांगत असतानाच केवळ आणि केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Prime minister Narendra Modi) विरोध करण्यासाठी एकत्र येत असलेले विरोधक हे निर्लज्ज आणि घोटाळेबाज असल्याची सडकून टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर येथे केली. (Deputy Chief minister Devendra Fadanvis in Solapur)

सोलापूर येथे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा विराट मेळावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नवीन संसद ही नव्या भारताच्या शक्तीचे प्रतीक आहे. अवघ्या 3 ते 4 वर्षांत ही वास्तु तयार झाली आहे. नेहरुंनी कर्नाटक विधानसभेचे (Karnataka Vidhan Saudh) भूमिपूजन केले, तेव्हा बहिष्काराचा विषय का आला नाही, किंवा इंदिरा गांधींनी (Ex Prime minister of India Indira Gandhi) संसदेच्या अ‍ॅनेक्स इमारतीचे उदघाटन केले, इंदिरा गांधी यांनी महाराष्ट्र विधानभवनाचे उदघाटन केले, राजीव गांधी (Ex Prime minister of India Rajeev Gandhi) यांनी संसदेच्या वाचनालयाचे उदघाटन केले, बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार (Nitish Kumar Bihar) यांनी बिहार विधानसभेतील सेंट्रल हॉलचे उदघाटन केले, तेव्हा का बहिष्कार आठवला नाही? मणिपूरमधील नवीन विधानसभेचे उदघाटन तत्कालिन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (Ex Prime minister of India Dr. Manmohan Singh)
यांनी केले.

आसाम विधानसभेचे (Assam Legislative Assembly) भूमिपूजन तरुण गोगोई यांनी केले, पण राज्यपालांना साधे निमंत्रणही देण्यात आले नाही. 2018 मध्ये आंध्र विधानसभेचे (Andhrapradesh Legislative Assembly) भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, राज्यपालांना निमंत्रण देण्यात आले नाही.

2020 मध्ये कुठल्याही संवैधानिक पदावर नसताना सोनिया गांधी यांनी छत्तीसगड विधानसभेचे (Chattisgarh Legislative Assembly) भूमिपूजन केले, त्यात तर राहुल गांधी हेही प्रमुख पाहुणे होते, मग तेव्हा बहिष्कार का आठवला नाही?

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी विधानसभेच्या (Pashchim Bangal Legislative Assembly) प्लॅटिनम ज्युबली मेमोरियल बिल्डींगचे उदघाटन केले, तेव्हा बहिष्काराचे अस्त्र का उगारले नाही? दिल्ली विधानसभेच्या (Delhi Legislative Assembly) रिसर्च सेंटरचे उदघाटन केजरीवाल (Delhi Chief minister Arvind Kejriwal) यांनी केले. तेलंगणामध्ये विधानभवनाचे (Telangana Legislative Assembly) उदघाटन केसीआर (Telangana Chief minister KCR) यांनी केले, या सर्व प्रसंगांत विरोधकांना बहिष्कार का आठवला नाही, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

विरोधकांनी जे केले ते लोकशाहीवादी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या नव्या संसदेचे उदघाटन करणार असतील तर मग पोटशूळ का? विरोधक हे खुर्चीचे व्यापारी आहेत. सत्ता आणि खुर्चीच्या लोभाने हे विरोधक एकत्र येतात. विरोधकांकडे नेता, नीती आणि नियत तिन्ही नाहीत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका