अख्खा देश भाजपकडे, सोलापूर मात्र बीआरएसकडे
माजी खासदार पुत्रासह, नगरसेवक, शेकडो कार्यकर्त्यांचा आज पक्षप्रवेश
थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
देशातील विविध पक्षातील बडे नेतेमंडळी भाजपकडे आगेकूच करत असताना सोलापूरात मात्र याउलट घडत आहे. भाजपचे सोलापूरचे माजी खासदार स्व. लिंगराज वल्याळ यांचे सुपुत्र तथा माजी नगरसेवक नागेश वल्याळ, पद्मशाली समाजाचे दिग्गज नेते दशरथ गोप यांच्यासह असंख्य नगरसेवक तसेच शेकडो कार्यकर्ते थोड्याच वेळात तेलंगणा येथील केसीआर तथा के चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती (BRS) मध्ये प्रवेश करत आहेत. शंभरहून अधिक गाड्यांचा ताफा घेऊन पाचशेहून अधिक कार्यकर्ते, नेते तेलंगगणाकडे रवाना झाले आहेत. दुपारी तीन वाजता हे सर्वजण पक्षप्रवेश करणार आहेत.
भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या भवानी पेठ, विडी घरकुल भागातील शेकडो कार्यकर्ते BRS मध्ये जाणार असून यामुळे मोठा फटका लोकसभा निवडणुकीत बसणार आहे. यावर शिस्तप्रिय म्हणणाऱ्या भाजपने आत्मचिंतन करण्याची गरज असून सोलापूरात एकाधिकार मालकशाहीला कंटाळून पक्ष सोडण्याची सुरू असलेली मालिका थांबवण्याचे आवाहन पक्षश्रेष्ठींसमोर असणार आहे.
भाजपला सोलापूरात मोठे खिंडार
राज्यात नुकतीच मोठी राजकिय उलथापालथ झालेली असताना, महाविकास आघाडीमध्ये बिघाडी करण्यात भाजप यशस्वी झाली असली तरी मात्र, सोलापूरात भाजपला धक्क्यावर धक्के बसत आहेत. कार्यकर्त्यांची भाजप सोडण्याची मालिका थांबता थांबत नाही. सोलापुरातुन 100 गाड्यांचा ताफा हैदराबादच्या दिशेने रवाना झाला असून यामुळे राज्यात इनकमिंग होता असताना सोलापूरात मात्र आऊटगोइंग अशी स्थिती आहे.
भाजपचा बालेकिल्ला निष्प्रभ?
गेल्या दोन वर्षात सोलापूर भाजपमध्ये आऊटगोइंग जोरात सुरू असून, विशेषतः भाजपचा बालेकिल्ला मानला जाणारा सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते,नगरसेवक व पदाधिकारी यांच्यात अस्वस्थता आहे. माजी शहर अध्यक्ष अशोक निंबर्गी, माजी सरचिटणीस बिज्जू प्रधाने, माजी विरोधी पक्षनेता रमेश व्हटकर, माजी नगरसेवक बापू ढगे यांच्यासह अनेक शक्तिकेंद्र प्रमुख व कार्यकर्त्यांनी पक्षाचा त्याग केला असून,आज भाजपचे माजी खासदार व ज्यांनी पक्ष तळागाळात पोहोचवला त्या लिंगराज वल्याळ यांचे सुपुत्र नगरसेवक नागेश वल्याळ यांच्यासह 5 नगरसेवक BRS मध्ये आज प्रवेश करणार आहेत,
सोलापूरला बीआरएसचे आकर्षण
भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या भवानी पेठ, विडी घरकुल भागातील शेकडो कार्यकर्ते BRS मध्ये जाणार असून यामुळे मोठा फटका लोकसभा निवडणुकीत बसणार आहे. यावर शिस्तप्रिय म्हणणाऱ्या भाजपने आत्मचिंतन करण्याची गरज असून सोलापूरात एकाधिकार मालकशाहीला कंटाळून पक्ष सोडण्याची सुरू असलेली मालिका थांबवण्याचे आवाहन पक्षश्रेष्ठींसमोर असणार आहे.
हेही पाहा