गुन्हेगारीथिंक टँक स्पेशल
Trending

सांगोला रस्त्यावर गोळ्या घालून भाजप नगरसेवकाचा खून

Spread the love

तालुक्यामध्ये भाजपा नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोर एवढ्यावरच थांबले नाहीतर डोक्यात सुद्धा दगड घातला. विजय ताड असं भाजप नगरसेवकाचे नाव आहे. ताड यांची इनोव्हा गाडी अडवून अज्ञातांनी ताड यांच्यावर आधी गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर डोक्यात दगड घातला.

थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
एका धक्कादायक खुनाच्या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. भाजपच्या माजी नगरसेवकाची इनोव्हा गाडी अडवून अज्ञातांनी आधी गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर डोक्यात दगड घालून ठार केले. ही थरारक घटना सांगोला रस्त्यावर घडली आहे.

विजय ताड असे खून झालेल्या भाजप नगरसेवकाचे नाव आहे. ते जत (जि. सांगली) येथील भाजपचे माजी नगरसेवक आहेत.

नगरसेवक ताड हे आपल्या इनोव्हा गाडीतून सांगोला रोडवरील असणाऱ्या अल्फान्सो स्कूल या ठिकाणी आपल्या मुलांना शाळेतून आणण्यासाठी निघाले होते. अल्फान्सो स्कूलच्या जवळ पोहोचले असता ताड यांचा पाठलाग करणाऱ्या अज्ञात हल्लेखोरांनी ताडे यांची ईनोवा गाडी अडवली. अचानक त्यांच्या गाडीवर हल्ला करत ताड यांच्यावर थेट गोळ्या झाडल्या. ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. हल्लेखोर एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी ताड यांच्या डोक्यात दगड घातला. या घटनेत माजी नगरसेवक ताड यांचा जागीच मृत्यू झाला.

राज्यात खळबळ
या घटनेमुळे जत शहरासह जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. मात्र हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून आणि कोणी केला आहे हे मात्र समजू शकले नाही.

या घटनेची माहिती मिळताच जत पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली आहे. ताड समर्थकांनी या ठिकाणी मोठे गर्दी केली आहे, तर घटनेचे गांभीर्य ओळखून सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली देखील जतकडे रवाना झाले आहेत. खुनाचे कारण अद्याप समोर येऊ शकले नाही. पोलीस अधिक तपास करत आहे.

क्रूर कृत्य
जत तालुक्यामध्ये भाजपा नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोर एवढ्यावरच थांबले नाहीतर डोक्यात सुद्धा दगड घातला. विजय ताड असं भाजप नगरसेवकाचे नाव आहे. ताड यांची इनोव्हा गाडी अडवून अज्ञातांनी ताड यांच्यावर आधी गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर डोक्यात दगड घातला.

सांगोला रस्त्यावर झाला खून
जत मधल्या सांगोला रोडवरील अल्फोंसो स्कूलजवळ ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

लोकप्रिय नगरसेवक
विजय ताड हे जत नगरपालिकेचे भाजपचे लोकप्रिय नगरसेवक होते. जत तालुक्यातील शिवसेनेचे पहिले नेते स्व.शिवाजीराव ताड याचे ते पुत्र होते. शिवाजीराव ताड यांचाही जतमध्ये खूप प्रभाव होता. काही दिवसापूर्वी त्यांचे आकस्मित निधन झाले होते. ताड बंधूंचे जत शहरात खूप मोठे वर्चस्व आहे. विजय ताड यांचे घर जत ते अचकनहळ्ळी रोडला लागून आहे. प्रगतशील शेतीही त्याच ठिकाणी आहे.

प्रभावी नेते
भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतेमंडळींशी ताड यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. जत तालुक्यामध्ये शिवसेना पक्ष रुजवण्यात त्यांचे वडील शिवाजीराव ताड यांचा मोठा सहभाग होता. त्यांना राजकीय वारसा मिळाल्याने माजी नगरसेवक ताड यांना जत शहर व तालुक्यातून मोठे पाठबळ मिळत होते. जत शहरामध्ये भाजपच्या जडणघडणीत ताड यांचा मोठा सहभाग राहिला आहे. सर्वांना सामावून घेणारे हसतमुख व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांचे तरुणांचे मोठे संघटन होते.

जत येथे ते ज्या प्रभागाचे नगरसेवक होते त्या प्रभागात त्यांनी मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत. भाजपचा जत शहरातील लोकप्रिय चेहरा म्हणून ताड यांच्याकडे पाहिले जात होते. आज अचानक त्यांच्यावर अत्यंत निर्घृणपणे हल्ला करून खून करण्यात आल्याने जत तालुका हादरला आहे.

ही घटना काही मिनिटांपूर्वीच घडली आहे. पोलिसांकडून घटनास्थळी धाव घेण्यात आली असून पोलीस हे घटनास्थळाचा पंचनामा करत आहेत. हा कोणी हल्ला व खून कोणत्या कारणातून झाला याचा तपास पोलीस करत आहेत. भाजपच्या नेतेमंडळींनी ताड यांच्या खुनाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे.

ताड यांची क्रूर पद्धतीने हत्या झाल्याने त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. सांगोला रस्त्यावर मोठी गर्दी झाली असल्याचे आमच्या प्रतिनिधींनी कळविले आहे.

हेही वाचा

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका