थिंक टँक / नाना हालंगडे
हिंदू धर्मात सर्व सण-समारंभ मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. दसरा झाला की सगळ्यांचे लक्ष दिवाळीकडे असते. दिवाळी भारतीयांचा सर्वात आवडता सण समजला जातो. यंदा 24 ऑक्टोबर रोजी दिवाळी साजरी केली जाईल. या वर्षी नरक चतुदर्शी आणि दिवाळी म्हणजेच लक्ष्मीपूजन एकाच दिवशी असणार आहे. प्रत्येक वर्षी दिवाळीच्या दोन दिवस आधी धनत्रयोदशी साजरी केली जाते, तर दुसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी साजरी केली जाते आणि तिसऱ्या दिवशी दिवाळी मात्र यंदा नरक चतुदर्शी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी असणार आहे. त्यामुळे या दिवशी विशेष योग असणार आहेत.
लक्ष्मीपूजन ही भारतीय संस्कृतीतील आनंददायी, वैशिष्ट्यपूर्ण पूजा आहे. आश्विन महिन्यातील अमावास्येला संध्याकाळी ही पूजा प्रतिवर्षी केली जाते. दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजनाला अधिक महत्त्व दिले जाते. या दिवशी उटनाणे आंघोळ करतात. हिंदू धर्मातील प्रमुख साणांपैकी हा एक सण. हा दिवस लक्ष्मी पूजन व्यतिरिक्त एक आनंदाचा क्षण / उत्सव असतो.
अश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जेथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती आणि पतीव्रता स्त्रिया असतात, त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते, अशी आख्यायिका आहे. समृद्धी आणि ऐश्वर्य यांचे प्रतीक असलेल्या लक्ष्मीची पूजा या रात्री केली जाते.
श्री लक्ष्मीपूजनाच्या वेळी अक्षतांनी बनवलेले अष्टदल कमल किंवा स्वस्तिक यांवरच श्री लक्ष्मीची स्थापना केली जाते. त्यानंतर लक्ष्म्यादी देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्तेष्टांना वाटतात. याखेरीज चलनी नोटा, नाणी, सोन्याचे अलंकार यांचीही पूजा यावेळी केली जाते. व्यापारी वर्गात यापूजेच्या वेळी फटाके उडवून आनंद साजरा केला जातो.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीविष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले अशी कथा आहे. पौराणिक साहित्यात लक्ष्मी ही विष्णूची पत्नी मानली गेली आहे.
कार्तिक अमावस्या तिथी प्रारंभ : 24 ऑक्टोबर 2022, संध्याकाळी 5.27 ते
कार्तिक अमावस्या तिथी समाप्त : 25 ऑक्टोबर 2022, संध्याकाळी 4.18 पर्यंत
लक्ष्मी पूजन शुभ मुहूर्त
संध्याकाळी, 05:29 ते 07:18 पर्यंत
रात्री, 10:29 ते 12:05 पर्यंत
- लक्ष्मी पूजन कसे करावे?
- सर्वप्रथम पूजा करण्यापूर्वी संपूर्ण घर स्वच्छ करावे.
- घरातील पूजेच्या ठिकाणी एक चौरंग किंवा पाट ठेवून त्यावर लाल वस्त्र अंथरुन ठेवावे.
- त्यावर देवी लक्ष्मी आणि गणपतीची मूर्ति स्थापन करावी.
त्यांची विधीवत पूजा करावी. - मूर्तीला कुंकू, हळद, अक्षता, फुलं, मिठाई, धूप आणि दीप अर्पित करावे.
- देवी लक्ष्मीच्या मंत्राचा जप करावा. त्यानंतर त्यांची आरती करावी.
हेही वाचा
‘मपोसे’ ते आयपीएस अधिकारी : नूतन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांचा थक्क करणारा प्रवास