थिंक टँक स्पेशल
पैशांचा वापर होऊनही जनतेनं मतदानाच्या रुपाने मला आशीर्वाद दिला आहे. अजित पवार, नाना पटोले, आदित्य ठाकरे यांचा शुभेच्छांसाठी मला फोन आला आहे. मी गिरीश बापट यांची भेट घेणार आहे. ते अनुभवी नेते आहेत. भाजपाकडे हा शेवटचा आधार होता झिंगण्यासाठी. शेवटची शक्ती म्हणून त्यांनी हिंदुत्वाचं कार्ड काढलं होतं. पण मला माझ्या आई-वडिलांनी शिकवलेलं हिंदुत्व होतं. मी सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन जाणारा आहे, अशी प्रतिक्रिया रवींद्र धंगेकर यांनी विजयानंतर दिली आहे.
कसब्यात अभिजित बिचुकलेंनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांना ४ मतं मिळाली असून हिंदू महासभेचे आनंद दवे यांना १२ मतं मिळाली आहेत. कसबा विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणीच्या पहिल्या फेरीत ८६ मतदारांनी कोणत्याही उमेवाराला पसंती दर्शविली नाही. या मतदारांनी नोटा या पर्यायाला पसंती दिली आहे.
१८व्या फेरीअखेर काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांना ९ हजार २०० मतांची आघाडी मिळाली असून आता त्यांच्या विजयाची फक्त औपचारिक घोषणा बाकी राहिली आहे.
महिन्याभरापासून चर्चेत असलेल्या कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीचा आज मतमोजणीचा दिवस आहे. कसब्यातली सर्व २० फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली असून त्यामध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत. भाजपाच्या हेमंत रासनेंनी आपला पराभव मान्य केला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाच्या उमेदवार अश्विनी जगताप या सध्या आघाडीवर आहेत. विरोधकांनी वाटलेले पैसे लोकांनी घरात ठेवले आणि ह्रदयातला धंगेकर काढून मतदानाला आले, असे विधान रवींद्र धंगेकर यांनी केले होते.
नेत्यांच्या प्रतिक्रिया…
भाजपाला वाटत होतं की…
संजय राऊत भाजपाला वाटत होतं की तो त्याचा बालेकिल्ला आहे. एका विशिष्ट वर्गाची मतं ही त्यांची मोनोपॉली आहे असं त्यांना वाटत होतं. पण त्या पेठांमधली मतं मोठ्या संख्येनं महाविकास आघाडीला मिळाली आहे. आता त्यांचा प्रत्येक बालेकिल्ला याच पद्धतीने उद्ध्वस्त करू. २०२४च्या परिवर्तनाची ही नांदी आहे. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आहे. आतापर्यंत कसब्यात शिवसेनेच्या पाठिंब्यावर भाजपा जिंकत आली. आज महाराष्ट्राला, दिल्लीला फडणवीसांना कळलं असेल की खरी शिवसेना कुठे आहे. चिंचवडची जागाही आम्ही पहिल्या फेरीपासून जिंकू शकलो असतो. एकास एक लढत झाली असती तर. पण तिसरा उमेदवार उभा करून भाजपा आणि मिंधे गटानं मतांची फाटाफूट केली. पण पुढच्यावेळी आम्ही चिंचवडही जिंकू आणि महाराष्ट्राचीही जिंकू. ही सुरुवात आहे. – संजय राऊत
देवेंद्र फडणवीसांचा टोला!
नानाभाऊ, थोडं आत्मचिंतन तुम्ही करा, थोडं आम्ही करतो. कसब्याबाबत आम्ही आत्मचिंतन करतो, चिंचवडबद्दल तुम्ही आत्मचिंतन करा. पण तीन राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस कुठेच दिसत नाही. त्यामुळे तुमच्यावर अशी वेळ आली आहे की एखादा जरी विजय मिळाला तरी सभागृहात उभं राहून सांगावं लागतंय – देवेंद्र फडणवीस
भाजपाची उलटी गिनती सुरू
नाना पटोले कसबा निवडणूक निकालानंतर काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या विजयावर बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी “भाजपाची उलटी गिनती सुरू झाली आहे”, अशी प्रतिक्रिया दिली आहे. – प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
“जनतेचा आणि देवाचा आशीर्वाद मिळाला”
जनतेचा आणि देवाचा आशीर्वाद मिळाला आहे. गेल्या पराभवावेळी रवींद्र धंगेकरांनी म्हटलं होतं की ते नक्कीच निवडून येतील. माझ्या मनात अजिबात धाकधूक नव्हती. आम्ही घरोघरी जाऊन केलेल्या प्रचाराचं हे फळ आहे. मविआनं टाकलेला विश्वास सार्थ झाला आहे – रवींद्र धंगेकरांच्या पत्नी
भाजपाच्या नेतृत्वाचा अहंकार उतरला
भास्कर जाधव पन्नास साठ वर्ष ज्यांनी भाजपासाठी प्रचंड काम केलं, त्यांनी भाजपाच्या नेतृत्वाचा अहंकार उतरवलाय – भास्कर जाधव
कसब्यात हेमंत रासनेंनी मान्य केला पराभव!
कार्यकर्त्यांशी, त्या भागातल्या लोकप्रतिनिधींशी चर्चा करता येईल. मी घरोघरी जाऊ शकत नव्हतो, पण आमची यंत्रमा घरोघरी गेली होती. आमच्या अपेक्षेप्रमाणे हे घडलेलं नाही. नाराजीचा फार फरक पडला असं मला वाटत नाही. मी कुठेतरी कमी पडलो असं मला वाटतं. मला यावर थोडं चिंतन करावं लागेल. माझ्या दृष्टीने हा निकाल धक्कादायक आहे. मला विजयाची खात्री होती. – हेमंत रासने
अभिजित बिचुकलेंना दुसऱ्या फेरीत ४ मतं
कसब्यात अभिजित बिचुकलेंनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांना ४ मतं मिळाली असून हिंदू महासभेचे आनंद दवे यांना १२ मतं मिळाली आहेत.