ताजे अपडेटथिंक टँक स्पेशलराजकारणशेतीवाडी
Trending

भाई गणपतराव देशमुखांच्या पश्चात सूतगिरणीचे राजकारण तापले

बिनविरोधसाठी डॉक्टर बंधूंचा कस लागणार

Spread the love

भाई गणपतराव देशमुख यांच्या पश्चात पक्षाची धुरा त्यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख तसेच डॉ. अनिकेत देशमुख सांभाळत आहेत. बिनविरोध निवडणुकीची परंपरा सुरू ठेवण्यासाठी या दोन्ही बंधूंना मोठी कसरत करावी लागणार आहे. भाई गणपतराव देशमुख यांचे नातू म्हणून त्यांच्या शब्दाला विरोधक किंमत देतील का हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.

सांगोला/ नाना हालंगडे
शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत नेते माझी आमदार भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर प्रथमच सांगोला तालुका सहकारी सूतगिरणीचे निवडणूक लागली आहे. या निवडणुकीत माजी चेअरमनसह दिग्गज उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. नेमकं या निवडणुकीत राजकारण काय घडतंय याची तालुकावासियांना उत्सुकता लागली आहे.

शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या संचालक पदाच्या निवडणूकीमध्ये आतापर्यंत माजी चेअरमनसह दिग्गज उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. ही निवडणूक बिनविरोधसाठी प्रयत्न केले जात असले तरी निवडणूक होणार की बिनविरोध होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

     स्वर्गीय माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर सूतगिरणीची प्रथमच निवडणूक होत असल्याने याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या आग्रहाखातर आपल्या शिक्षिकी पेशाचा राजीनामा देऊन सूतगिरणीचे चेअरमन झालेले नानासाहेब यांनी या निवडणुकीतून आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने याची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. माजी चेअरमनसह इतर दिग्गजांनी अचानक निवडणुकीतून माघार घेतल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

सूत गिरणीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करतानाही दिसत आहेत. 27 ऑक्टोंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे.

स्थापनेपासूनच शेतकरी सहकारी सूत गिरणीची निवडणूक बिनविरोध होत आहे. मात्र, यंदाच्या निवडणुकीतून दिग्गजांनी माघार घेतल्याने सहकारी सूत गिरणीची निवडणूक बिनविरोध होणार की ? निवडणूक लागणार याबाबत चर्चा सुरू आहे.

 सूतगिरणीच्या 11 हजार 560 सभासदांपैकी कापूस उत्पादक शेतकरी 7 हजार 93, तर बिगर कापूस उत्पादक शेतकरी 4 हजार 467 असे एकूण 11 हजार 560 सभासद (मतदार) आहेत. तर संस्था प्रतिनिधी मतदार संख्या 81 आहे.

दिग्गज उमेदवारांची माघार  
सलग 15 वर्षे सूत गिरणीचे चेअरमन राहिलेले नानासाहेब लिगाडे, माजी संचालक बाबुराव गायकवाड, शहाजीराव नलवडे, गोविंद जाधव, शिवाजी मिसाळ, विशालदीप बाबर, अंकुश येडगे या दिग्गज उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. त्यांनी माघार घेण्याचे कारण अद्याप पुढे आले नाही.

विरोधकांच्या मदतीने बिनविरोध होणार?
या सूतगिरणीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दीपकआबा साळुंखे – पाटील यांचीही भूमिका महत्त्वाची राहणार आहे. शेतकरी कामगार पक्षातही संचालक व चेअरमन पदासाठी काहीजण इच्छुक असल्याने या निवडणुकीकडे विशेष लक्ष लागले आहे.

आबासाहेबांनी शेतीबरोबरच परिसराच्या औद्योगिक विकासाकडेही अत्यंत गांभीर्याने लक्ष दिले. सांगोल्यात १९८० साली ‘शेतकरी सहकारी सूतगिरणी उभारली. आज वार्षिक शंभर कोटी रु.हून अधिक उलाढाल करणारी ही सूतगिरणी भारतातच नव्हे तर जगातील सहकारातील एक आदर्श सूतगिरणी म्हणून ओळखली जाते.

चीन, बांगलादेश, इजिप्त, मलेशिया, इंडोनेशिया या देशात येथून सूत निर्यात केले जाते. महाराष्ट्रातील इतर ठिकाणच्या सहकारी सूतगिरण्यांची अवस्था विकलांग होत असताना आबासाहेबांनी स्थापलेली ही सूतगिरणी अतिशय उत्तम काम करत आहे. याचे कारण सहकारातील सर्व दोष टाळण्याला त्यांनी प्राधान्य दिले होते.

दोघा डॉक्टर बंधूंचा लागणार कस
भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर प्रथमच या सूतगिरणीची निवडणूक होत आहे. भाई गणपतराव देशमुख हे हयात असताना त्यांचा शब्द विरोधकही मानत होते. त्यामुळे आजपर्यंत ही निवडणूक बिनविरोध होत होती. भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर प्रथमच शेतकरी कामगार पक्ष या निवडणुकीला सामोरे जात आहे.

भाई गणपतराव देशमुख यांच्या पश्चात पक्षाची धुरा त्यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख तसेच डॉ. अनिकेत देशमुख सांभाळत आहेत. बिनविरोध निवडणुकीची परंपरा सुरू ठेवण्यासाठी या दोन्ही बंधूंना मोठी कसरत करावी लागणार आहे. भाई गणपतराव देशमुख यांचे नातू म्हणून त्यांच्या शब्दाला विरोधक किंमत देतील का हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.

‘बाबासाहेब’ तुम्हीच आहात ‘आबासाहेब’

दीपावली सणाचा अन्वयार्थ

 

शहाजीबापूंच्या महूद-सांगोला रस्त्यावर अवतरली गुवाहाटी

मल्लिकार्जुन खर्गेंमुळे आंबेडकरी चळवळीत उत्साह!

 

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका