बलिप्रतिपदा : साडेतीन मुहूर्तापैकी महत्त्वाचा मुहूर्त

पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर खरेदी ठरते लाभदायक, जाणून घ्या सणाचे महत्त्व

Spread the love

थिंक टँक न्यूज नेटवर्क : डॉ. नाना हालंगडे
हिंदू धर्मात दिवाळी हा सर्वोच्च आनंदाचा सण आहे. दिवाळी सणात यंदा बऱ्यापैकी उत्साह दिसतोय. साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त असलेला बलिप्रतिपदा, पाडवा सण आज साजरं केला जात आहे. या सणाचं नेमकं महत्त्व काय आहे? पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर खरेदी लाभदायक ठरते का? जाणून घ्या सणाचे महत्त्व.

पाडव्याला विशेष महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून हा सण ओळखला जातो. या दिवशी मोठी खरेदी करण्याची पद्धत आहे. या दिवशी घरातील एखादी मोठी वस्तू किंवा संपत्तीची खरेदी केली जाते. या दिवशी नातेवाईक किंवा मित्रमंडळी एकमेकांच्या घरी फराळाला आणि जेवायला जातात, यावेळी मिष्टान्न करण्याची पद्धत आहे.

आज दिवाळी पाडवा
लक्ष्मीपूजनानंतर आणि भाऊबीजेच्या आधी पाडवा येतो. यंदा ५ नोव्हेंबरला दिवाळी पाडवा आहे. दिवाळीचा सण नरक चतुर्दशीच्या अभ्यंगस्नानापासून सुरु होतो. पण पाडव्याला विशेष महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून हा सण ओळखला जातो. या दिवशी मोठी खरेदी करण्याची पद्धत आहे. या दिवशी घरातील एखादी मोठी वस्तू किंवा संपत्तीची खरेदी केली जाते. या दिवशी नातेवाईक किंवा मित्रमंडळी एकमेकांच्या घरी फराळाला आणि जेवायला जातात, यावेळी मिष्टान्न करण्याची पद्धत आहे. एकूणच पाडव्याचा सण मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा केला जातो. लक्ष्मीपूजनानंतर आणि भाऊबीजेच्या आधी पाडवा येतो.

व्यापारी वर्षास यादिवशी सुरुवात होते
या दिवशी दानशूर अशा बळीराजाची पूजा करण्याची परंपरा आहे. ज्याप्रमाणे चैत्र शुक्ल प्रतिपदेस शालिवाहन शक नवे संवत्सर सुरु होते, त्याप्रमाणे कार्तिक शुक्ल प्रतिपदेस विक्रम संवत्सर सुरु होते. व्यापारी वर्षास यादिवशी सुरुवात होत असल्याने वहीपूजन, दुकानाची पूजा करून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. या दिवशी पत्नीने पतीस ओवाळावे म्हणजे दोघांचेही आयुष्य वाढते. यादिवशी पतीने पत्नीला ओवाळणी म्हणून सोने, साडी किंवा एखादी मोठी भेटवस्तू देण्याची पद्धत आहे. नवविवाहित दांपत्यासाठी पहिला दिवाळसण अगदी खास असतो.

‘इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’
सोने खरेदीस प्राधान्य, सुवासिनींकडून पतीला औक्षण, व्यापाऱ्यांसाठी वर्षाचा प्रारंभ अशा अनेक बाजूंनी या दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले जाते. पाडव्याला पंचरंगी रांगोळीने बळीची प्रतिमा काढून तिचे पूजन करतात. ‘इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’, अशी प्रार्थना या दिवशी केली जाते.

धार्मिक अख्यायिका
बलिप्रतिपदेविषयी असलेल्या पौराणिक कथांनुसार पार्वतीने महादेवांना याच दिवशी द्युत खेळात हरवले म्हणून या दिवसाला द्युत प्रतिपदा असेही म्हटले जाते. असुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता. राक्षसकुळात जन्म घेऊनही चारित्र्यवान, विनयशील, प्रजाहितदक्ष राजा म्हणून बळीराजाची ओळख होती‌. दानशूर म्हणूनही हा राजा विख्यात होता. पण, पुढे त्याने वाढत्या शक्तीच्या प्रभावाने देवांचाही पराभव केला.


बळीराजाने एक यज्ञ केला. या यज्ञानंतर दान देण्याची प्रथा होती. भगवान विष्णूंनी वामनावतार धारण केला आणि बटूवेशात बळीराजा समोर उभे राहिले. या रुपात वामनाने तीन पावले भूमी मागितली. वचनाला जागून बळीराजाने हे दान देण्याची तयारी दाखविली तेव्हा वामन अवतारी विष्णूंनी प्रचंड रूप धारण करीत स्वर्ग आणि पृथ्वी व्यापले. तिसरे पाऊल ठेवण्यास जागा शिल्लक न राहिल्याने वचनपूर्तीसाठी बळीराजाने मस्तक पुढे केले.

तेव्हा बळीराजाच्या डोक्यावर पाऊल ठेवून वामनाने त्याला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले. बळीराजा गर्विष्ठ झाला तरीही सत्त्वशील, दानशूर या गुणांमुळे बळीराजाला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले आणि वरदान दिले की, कार्तिक प्रतिपदेला लोक तुझ्या दानशूरतेची, क्षमाशीलतेची पूजा करतील.
विक्रम संवत कालगणनेचा प्रारंभ या दिवशी होतो. उज्जैनीचा राजा विक्रमादित्य याने शकांचे आक्रमण परतवून लावले, त्यांचा पाडाव केला. त्या विजयाचे प्रतीक म्हणून विक्रमादित्याने विक्रमसंवत ही कालगणना सुरू केली. इ. स. पूर्व ५७ पासून ही कालगणना प्रचलित आहे. इ. स. पूर्व काळातील संस्कृतीच्या वैभवाचे, सर्वागीण सभ्यतेचे आणि एकछत्री राज्यव्यवस्थेचे हे एक उदाहरण आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका