राजकारण
Trending

नागालँडमध्ये रामदास आठवलेंच्या आरपीआयचे दोन उमेदवार विजयी

Spread the love

नागालँडमध्ये रामदास आठवलेंनी दोन जागा खेचून आणल्या ईशान्य भारतातील तीन राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. मेघालय, नागालँडमधील विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी ( २७ फेब्रुवारी ) मतदान पार पडलं. तर, त्रिपुरा राज्यात १६ फेब्रुवारी रोजी मतदान संपन्न झालं होतं. आज तिन्ही राज्यांची मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असून, निकाल हाती येणार आहे

थिंक टँक न्यूज नेटवर्क

इकडे कसबा विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसने विजय संपादन केला असतानाच तिकडे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आरपीआय पक्षाने घवघवीत यश संपादन केला आहे. नागालँड विधानसभा मतदारसंघातून आरपीआय पक्षाचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. इम्प्ती चोबा आणि लिमा चा असे या दोन उमेदवारांची नावे आहेत. Ramdas Athavale in Nagaland

महाराष्ट्रात कसबा पेठ आणि चिंचवडच्या पोटनिवडणूकांची चर्चा सुरू असताना इशान्येकडील राज्यामधील निवडणूकांचा निकाल हाती येणे सुरू झाले आहे. या निवडणूकीत पहिल्यांदाच रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ने बाजी मारली आहे. आठवले यांच्या आरपीआय पक्षाचे दोन उमेदवार नागालँडमध्ये विजयी झाले आहे. विधानसभा निवडणूकीत पहिल्यांदाच पक्षाच्या दोन महिला उमेदवारांनी महाराष्ट्राच्या बाहेर विजयाचा गुलाल उधळला आहे. सुरु असलेल्या मतमोजणीत नागालँडमध्ये भाजप-एनडीपीपी सध्या आघाडीवर असून यादरम्यान महाराष्ट्राच्या बाहेर देखील रामदास आठवले यांच्या आरपीआय पक्षाचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. ही आठवले यांच्यासाठी ही मोठी गोष्ट असल्याचे बोलले जात आहे.

या निकालांमुळे इतर राज्यातील निवडणूक निकालांवर देखील याचा परिणाम होण्याची शक्यता बोलली दात आहे. नागालँडलमध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षचे उमेदवार २ जागांवर निवडून आले आहेत. तर, एनडीपीपीचा उमेदवार १ जागेवर निवडून आला आहे. भाजपाचे उमेदवार २ जागेवर निवडून आले असून, १२ जागांवर आघाडीवर आहेत.

ईशान्य भारतातील महत्त्वाचे राज्य असलेल्या नागालँडमध्ये रामदास आठवलेंच्या आरपीआयचे दोन उमेदवार विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. Think Tank Live नागालँडमध्ये विधानसभेच्या ६० जागांसाठी झालेल्या निवडणुकांची मतमोजणी आज होत आहे. सुरुवातीच्या निकालांचे कल जाहीर झाले आहेत. नागालँडमध्ये भाजप-एनडीपीपी युतीला सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडी मिळताना दिसत आहे. त्याचवेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आरपीआय (आठवले गट) पक्षाने नागालँडमध्ये दोन जागांवर विजय मिळवला आहे.

https://t.co/i62wKIXNGd

नागालँड विधानसभा निवडणुकीत आरपीआय (ए) ने प्रथमच उमेदवार उभे केले होते. नागालँड विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. निवडणूक निकालाचे सुरुवातीचे कल बघता राज्यात भाजप-एनडीपीपी आघाडीनं सत्तेकडे आगेकूच केल्याचे दिसून येते. रामदास आठवले यांच्या आरपीआय (आठवले गट) या पक्षाने या निवडणुकीत दोन जागांवर विजय मिळवला आहे. Union Minister Ramdas Athawale’s Republican Party of India (Athawale) wins two seats दुपारपर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार, एनडीपीपीने दोन जागांवर विजय मिळवला आहे. तर २५ जागांवर आघाडीवर होता. भाजपनेही दोन जागा जिंकल्या, तर १२ जागांवर आघाडीवर होते. लोकजनशक्ती पक्षाने तीन जागांवर आघाडी घेतली होती.

आरपीआय पक्षालही मिळाल्या ‘इतक्या’ जागा

नागालँडलमध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्ष पार्टीचा उमेदवार २ जागांवर निवडून आले आहेत. तर, एनडीपीपीचा उमेदवार १ जागेवर निवडून आला आहे. भाजपाचे उमेदवार २ जागेवर निवडून आले असून, १२ जागांवर आघाडीवर आहेत.

नागालँडमध्ये रामदास आठवलेंनी दोन जागा खेचून आणल्या ईशान्य भारतातील तीन राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. मेघालय, नागालँडमधील विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी ( २७ फेब्रुवारी ) मतदान पार पडलं. तर, त्रिपुरा राज्यात १६ फेब्रुवारी रोजी मतदान संपन्न झालं होतं. आज तिन्ही राज्यांची मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असून, निकाल हाती येणार आहे. त्रिपुरात भाजपा, नागालँडमध्ये एनडीएचा सहकारी नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोगेसिव्ह पार्टी ( एनडीपीपी ) आणि मेघालयात नॅशनल पीपल्य पार्टी ( एनपीपी ) आपली सत्ता राखण्यात यशस्वी होणार का? याकडे सर्व देशाचं लक्ष लागलं आहे. Think Tank Live

नागालँड विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप २ , नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी ( NDPP ) युती आणि नागा पीपल्स फ्रंट यांच्या महत्त्वाची लढत असली तरी अनेक पक्षांनी यश मिळवले आहे . निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार , भाजप – एनडीपीपी युतीने 32 जागांवर आघाडी घेतली असून , 60 पैकी 2 जागा जिंकल्या आहेत . नागालँडमध्ये युती सरकार सत्तेत येण्याचे चित्र दिसत आहे . NDPP 1 जागा जिंकून 25 जागांवर आघाडीवर आहे , भाजपने 2 जागा जिंकल्या आहेत आणि 12 जागांवर आघाडीवर आहे आणि लोक जनशक्ती पार्टी ( रामविलास ) 3 जागांवर आघाडीवर आहे . Think Tank Live

भाजपा- एनडीपीला पुन्हा बहुमत ? २०२३ च्या नागालँड विधानसभा निवडणुकीत भाजपा – एनडीपीपी युतीची वाटचाल बहुमताकडे सुरु झाली आहे . नागालँडचे सध्याचे मुख्यमंत्री नेफिओ रिओ यांनी नॉर्थन अंगामी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत . यापूर्वी रिओ हे चारवेळा मुख्यमंत्री राहिले आहेत . ते आणखी एक टर्म मुख्यमंत्रीपदी राहण्याची शक्यता आहे .

नागालँड येथे प्रचारावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले होते की, “डॉ. बी. आर. आंबेडकर हे सर्व समाजाचे नेते आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नागालँडमधून आठ उमेदवारांसोबत निवडणूक लढवत आहे. हा पक्ष जात-धर्माचा विचार न करता सर्व समाज आणि समाजातील घटकांसाठी उभा आहे. आरपीआयची युती आहे. भारताच्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली केंद्रात आम्ही चांगले काम करत आहोत.”

नागालँडमध्ये एनडीपीपीने पार केला बहुमताचा आकडा

मेघालयात एनपीपी २६ जागांवर आघाडीवर नागालँडमध्ये भाजपा मित्रपक्ष असलेली एनडीपीपी पक्षाने बहुमताचा आकडा पार केला आहे. एनडीपीपी ३७ जागांवर आघाडीवर आहे. तर, मेघालयात एनपीपी २६ जागांवर पुढं आहे. काँग्रेस ५ आणि भाजपा ६ जागांवर मेघालयात समाधान मानावं लागत आहे. अद्यापही मेघालयात स्पष्ट बहुमत कोणाला मिळालं नाही.

त्रिपुरात भाजपाने पार केला बहुमताचा ‘आकडा’

त्रिपुरात भाजपा पुन्हा सत्तेत येणार असल्याचं दिसत आहे. भाजपाने बहुमताला लागणारा ३१ चा आकडा पार केला आहे. भाजपा ३१ जागांवर आघाडीवर आहे. तर, कम्युनिस्ट पार्टी ( मार्क्सवादी ) ११ आणि टिपरा मोथा पार्टी ११ जागांवर पुढं आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका