दिग्विजयी अंगराज कर्ण

ऋतुजा जाधव यांचा विशेष लेख

Spread the love

सूर्यपुत्र असूनही नेहमी अपमानित जीवन जगलेल्या कर्णाला न्याय कधी मिळणार? अर्जुनाची स्तुती करण्यात सगळ जग गुंतलं आहे, पण कर्णासारख्या महानुभावाला कोण लक्षात ठेवणार?

ज्येष्ठ कौंतेय असून सूतपुत्र म्हणून हिणवला गेला, धनुर्विद्येत सर्वात श्रेष्ठ निपुण असूनदेखील गुरु द्रोणांनी लाथाडला, मैत्री आणि स्वार्थापोटी बनवलेला दुर्योधन मित्र, अश्वत्थामा माझा सल्लागार, वृषालीचा सहचरणी, शोणचा आकाशातील उंच उडणारा गरुड, ‘कोणता तुझा कुल’ या प्रश्नाला नेहमी तोंड देणारा?, भर स्वयंवरात अर्जुनच माझा पती होणार हे निश्चित करून बसलेल्या द्रौपदीकडून सूतपुत्र म्हणून अवमानित केला जाणारा, परशुरामांनी ऐन युद्धप्रसंगी ‘तुझे ब्रम्हास्त्र तुला स्मरणार नाही’ असा मर्मभेदी शाप स्वीकारणारा, इंद्राला अर्जुनाचा पुत्रप्रेमापोटी दान म्हणून कवचकुंडल सोपवणारा, भीष्माचा पतन होईपर्यंत समारंगणात पायच न टाकणारा, चित्तथरारक उत्तुंग एकनिष्ठ मरण पावणारा पहिला पांडव ‘दिग्विजय अंगराज कर्ण’.

सूर्यपुत्र असूनही नेहमी अपमानित जीवन जगलेल्या कर्णाला न्याय कधी मिळणार? अर्जुनाची स्तुती करण्यात सगळ जग गुंतलं आहे, पण कर्णासारख्या महानुभावाला कोण लक्षात ठेवणार?

कर्णाचा इतिहास हा दुर्लक्षित करण्याजोगा नाही तर डोक्यावर उचलून घेण्यासारखा आहे. अगदी आईच्या उदरातून बाहेर येताच त्यांचा संघर्ष सुरू झाला. कुंतीमातेवर कलंक लागू नये म्हणून तिने त्यांना गंगेच्या पात्रात सोडले तो सूर्यपुत्र गंगेच्या पात्रात प्रवास करून एका सुताच्या घरात वाढला. आणि बघता बघता बालपण वाऱ्याच्या झोक्या सारखं निघून गेल.

हस्तिनापुरात धनुर्विद्येच्या शिक्षेपोटी आला पण तेथेदेखील गुरुवर्यांनी सूतपुत्र म्हणून दूर लोटलं. स्वतः सूर्यदेवाला गुरु मानून शिक्षणाचा सुरुवात प्रवास सुरू केला. आणि अश्वत्थामासारखा जिवलग मिळाला. धनुर्विद्येचा समरांगणात दुर्योधनाने राजा बनविलं आणि स्वार्थाची मैत्री सुरु झाली. स्वतःला कितीही सिद्ध करून दाखवायचं म्हटलं तरी अस्तित्वाचा प्रश्न समोर उभा असायचा. कर्णासारखा दानशूर या जगात पुन्हा होणे नाही. जन्मजात असलेली कवचकुंडलं शरीरापासून विलग करताना झालेल्या यातना निशब्द करत होत्या. सगळे राज्य जिंकून येणारा कर्णा लोकांच्या नजरेत तरी देखील वंचित होता. कर्णासारखा अखंड साधनें शुचिर्भूत, योजना कुशल, जाळत्या पराक्रमाचा दिग्विजयी सेनानायक दोन्ही पक्षात दुसरा कोणीच नव्हता.

पांडवांच्या पक्षात ये असं म्हणून जाणाऱ्या श्रीकृष्णाला देखील महासागरासारख्या त्याच्या निर्धाराला परतविण्यात सुदर्शन धारण करणारे हात ही अयशस्वी ठरले होते. कुलाच्या सत्य कथानकामुळे थोडाही तेजोभंग नाही पावला. तसं होणं शक्यच नव्हतं. जे भंग पावत ते तेजच नसतं हेच त्यांन सिद्ध केलं होतं. उलट आपण सूर्यपुत्र आहोत हे समजताच त्याची प्रतिक्रिया दिपवणारी होती. कुंती देवीला तर त्यांनी चार पुत्रांच अभय पुत्रकर्तव्यपोटी दिल होत. रथाचे चाक काढताना अर्जुनाने मारलेला बाण कंठात गेला आणि जीवनभर केलेले परिश्रम, सहन केलेले अपमान, एका क्षणात मातीत कोसळलं.

वेळ निघून गेली होती. सूर्यपुत्र अमर झाला. ‘अनिवार्य नियतीच गरगर फिरणे महान संयमानं सहन करीत जगायचं’ असतं हे कर्णाच सांगणं आहे. कृष्णाप्रमाणेच कर्ण पौरुष्य चैतन्याचा सामर्थ्य अविष्कार आहे. पांडवांच्या विजयाचे डांगोरे फिके पडणारा हा संदेश आहे. ‘मौनाचा विलक्षण रुपात या मौनाच्या जोरावर मृत्यूच्या महायुद्धात सुद्धा जीवनाचा धुंड विजय कर्णाने आणि अनुभवला’ म्हणून त्याचे नाव मृत्युंजय हेच जयतु कर्ण! जयतु कर्ण!!

– ऋतुजा जाधव (युवा लेखिका, पत्रकार)

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका