डॉ. सुशीलकुमार मागाडे यांचा बेस्ट टिचर पुरस्काराने सन्मान
सोलापूर : जवळा गावचे सुपूत्र व सध्या पुणे येथील MIT Academy of Engineering या स्वायत्त संस्थेत सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे प्रा. डॉ. सुशीलकुमार मागाडे यांना या संस्थेतर्फे ‘बेस्ट टिचर ऑफ द सिव्हिल डिपार्टमेंट’ या पुरस्काराने नुकतेच गौरवण्यात आले आहे. जवळा ग्रामस्थांसाठी ही अभिमानाची बाब आहे.
डॉ. सुशीलकुमार मागाडे यांनी सिव्हिल इंजिनियरिंग या विषयातून 2008 साली तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, वारणानगर येथून पदवीचे शिक्षण घेतले. 2012 साली त्यांनी WCE (Walchand College of Engineering) सांगली येथून Structural Engineering या विषयातून पदव्युत्तर पदवी संपादन केली.
- हेही वाचा : आकाश ठोसरने जिंकली सोलापूरकरांची मने
- विद्यापीठ युवा महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपद दयानंद महाविद्यालयाकडे
- काय सांगता? फक्त ५०० रुपयांत Jio चा नवा स्मार्टफोन!
- केंद्रीय विद्यापीठांत ६ हजारांहून अधिक प्राध्यापकांची भरती
- ज्ञानसूर्याचे दर्शन घडविणारे मामुट्टी
पदव्युत्तर पदवीनंतर त्यांना Development in Civil Engineering या विषयात संशोधन करण्यात रस वाटू लागला. याच ध्येय्यातून त्यांनी VNIT नागपूर येथून “Numerical Analysis of Pile Foundation” या विषयात पीएच.डी. संपादित केली. या संशोधनात विश्लेषणात्मक, संख्यात्मक तसेच प्रायोगिक तंत्रांवर काम केले.
डॉ. सुशीलकुमार मागाडे हे सध्या MIT Academy of Engineering येथे सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या सन्मानाबद्दल जवळा ग्रामस्थांकडून तसेच पुणे, सातारा येथील मित्र परिवाराकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
Congratulation to dear Dr. Sushil kumar Magade