घेरडीत शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
रायगड स्वच्छता व गड संवर्धन मोहीम तसेच रायगड ते घेरडी पायी ज्योत
थिंक टँक / नाना हालंगडे
सार्वजनिक शिवजयंती महोत्सव मंडळ घेरडी (ता. सांगोला) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्ताने. रायगडावरती स्वच्छता व गड संवर्धन मोहीम व रायगडावरून ज्योत प्रज्वलीत करून घेरडी कडे प्रस्थान करून रायगड ते घेरडी पायी ज्योत आणणे अशा अनोख्या पद्धतीने शिवजयंती उत्सव सोहळा साजरा करण्यासाठी युवक रायगडाच्या दिशेने गेले आहेत. तसेच रविवार दिनांक १९ फेब्रुवारी पासून ते मंगळवार दी. २१ फेब्रुवारी पर्यंत शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे.
सांगोला तालुक्यातील घेरडी येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने सार्वजनिक शिवजयंती महोत्सव मंडळ घेरडी यांचे वतीने विविध कार्यक्रम आयोजित केले आहे. यामध्ये दिनांक १६ फेब्रुवारी रोजी घेरडी येथील रायगडाकडे प्रस्थान करणार असून त्या ठिकाणी रायगड स्वच्छता व गड संवर्धन मोहीम राबवली जाणार आहे. त्यानंतर रायगडावरून ज्योत प्रज्वलित करून हे युवक घेऊन घेरडी येथे येणार आहे. याचे व्यवस्थान व नियोजन घेरडी येथील आजी व माजी सैनिक तसेच वल्लभ कोकाटे (मेजर), जयजित पोळ (मेजर), देवा माने (मेजर), रवी पवार (मेजर), सोनु सरगर (मेजर),बापू सांगोलकर (मेजर), संतोष घुटूकडे (मेजर), योगेश कुंभार (मेजर) महालिंग अठराबुद्धे (मेजर), विष्णु सांगोलकर (मेजर). तानाजी मेटकरी (मेजर) यांनी केले आहे.यासाठी अनिल (नाना) खटकाळे (तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस), श्रीनिवास (दादा) करे (ग्रा.पं.सदस्य) , रणजित पोळ (हॉटेल सत्यजित),अक्षय पोळ , दत्ता बनसोडे यांनी अर्थसाह्य केले आहे.
रविवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सांगोला येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व शिव वंदना करून घेरडी येथे छत्रपती शिवरायांच्या मान्यवरांच्या उपस्थितीत व डी वाय एस पी अनिल घेरडीकर व उपजिल्हाधिकारी समाधान घुटूकडे यांचे शुभहस्ते मूर्ती प्रतिष्ठापना करून वंदन करण्यात येणार आहे.
सोमवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी वक्तृत्व स्पर्धा ,चित्रकला स्पर्धा ,संगीत खुर्ची स्पर्धा याचे बक्षीस आकाश नवाळे ,विजय त्रिगुणे व जनार्दन अठराबुद्धे यांचे तर्फे बक्षीस दिले जाणार आहे. त्याचबरोबर आबा गावडे, गोरख यमगर, नाथा यमगर यांचे वतीने जीवनभक्त ओविकार मंडळ व जय मल्हार ओवीकार मंडळ यांचा ओवी जुगलबंदीचा कार्यक्रम होणार आहे. पोलीसपाटील रेखा तुकाराम औताडे, आप्पा सरगर, बाळासाहेब पोळ, यशवंत (पिंटू) पोळ यांची वतीने शाहीर सुभाष गोरे यांचा जागरण गोंधळ व पोवाडा हा कार्यक्रम होणार आहे .
तर मंगळवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी ग्रा. प. सदस्य जयंत डोंगरे सर यांचे वतीने स्वराज्य मर्दानी खेळ, विनोद नागणे यांचे हलगी वाद्य तर सुमन साडी सेंटरचे नवनाथ भोसले यांचे वतीने मिरवणूक लायटिंग व्यवस्था करण्यात आली आहे. सभापती अनिल मोटे, सरपंच सुरेखा पुकळे, उपसरपंच नितीन खुळपे, बयाजी लवटे,सोमा मोटे,विनायक कुलकर्णी, फारुक आतार, माजी उपसभापती तानाजी चंदनशिवे यांचे शुभहस्ते व उपस्थितीत बक्षीस वितरण व भव्य मिरणूक होणार आहे.
शामराव पोळ (पं.स.सदस्य),विलास भोसले (पोलिस निरीक्षक) ,तुकाराम औताडे (माजी सरपंच) ,बिरा पुकळे (माजी सरपंच) , कय्युम आतार (माजी सरपंच),अमीर आतार (माजी सरपंच), बटु पोळ आप्पा सरगर, भाऊसाहेब यमगर (सर), पप्पु काबळे , कर्मवीर औताडे , शशिकात कोळी , चंदू वाघमारे, प्रभुलिंग स्वामी यांचे मार्गर्शनाखाली मंडळाचे अध्यक्ष धनाजी दिवसे, उपाध्यक्ष आबा गावडे, कार्याध्यक्ष सुनील औताडे, खजिनदार ओंकार क्षीरसागर, आदित्य पोळ, सचिव तानाजी बुरुंगले, हणमंत ढोबळे यांचेसह अनिल पोळ ,संजय पोळ, नाथा यमगर, तानाजी वाघमोडे, धनंजय ननवरे, दत्ता गायकवाड ,तुषार सावंत ,सचिन पोळ (सर), भानुदास माने ,सुशांत निबाळकर, नामदेव ननवरे, विक्रम दिवसे (मेजर) , मयुर पोळ ,निखील सावत, अक्षय धुमाळ ,कन्हैया खुळपे ,सोमेश सुतार , रोहित लाळगे आदी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेत आहेत.