खवासपूरच्या सिद्धेश्वर जरे यांची मका राज्यात अव्वल
राज्यस्तरीय पीकस्पर्धा; ४ किलो त 177 क्विंटल उत्पन्न
सांगोला/ नाना हालंगडे
राज्यात कृषी विभागाच्या वतीने पीकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सांगोला तालुक्यातील खवासपूर येथील सिद्धेश्वर जरे यांच्या मका पिकाने राज्यात प्रथम क्रमांक मिळविलेला आहे. तर महुद आणि घेरडी येथील शेतकऱ्यांनी दुसरा आणि तिसरा क्रमांक पाठविलेला आहे. त्यांनी सर्वसाधारण गटातून हा क्रमांक मिळविला आहे.
सोयाबीन उत्पादनात सुरेश पाटील, तुरीत संजय सत्यकार तर भात उत्पादनात साहेबराव चिकणे प्रथम
राज्यस्तरीय खरीप पीकस्पर्धेत शेतकरी सुरेश शंकरराव पाटील यांनी सोयाबीन उत्पादनात, तर संजय विठ्ठलराव सत्यकार यांनी तूर उत्पादनात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच साहेबराव मण्याबा चिकणे यांनी भात, तर तानाती श्रीपती यादव यांनी ज्वारी उत्पादनात विक्रम करीत पहिला क्रमांक मिळवला.
शहाजी पाटील हे शिंदे गटाचे “जॉनी लिव्हर”
पीक उत्पादकता वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयोगशील शेतकऱ्यांकरिता राज्यस्तरीय खरीप पीकस्पर्धा २०२१ आयोजित करण्यात आली होती. विजेत्या शेतकऱ्यांमार्फत त्या भागातील अन्य शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावे, असा उद्देश या उपक्रमामागे आहे. कृषी आयुक्त धीरज कुमार यांच्या अध्यक्षतेखालील मुख्य पीक स्पर्धा समितीने शेतकऱ्यांची निवड केली आहे, स्पर्धेचा निकाल कृषी आयुक्तालयाच्या विस्तार व प्रशिक्षण विभागाचे संचालक विकास पाटील यांनी गुरुवारी (ता. १) जाहीर केला.
गणेश संपूर्ण आरती आणि बरंच काही
_*🎯स्पर्धेचा निकाल असा (कंसातील आकडा संबंधित शेतकऱ्याने एका हेक्टरमध्ये घेतलेल्या उत्पादनाचा आहे)*_
_*(१ ) भुईमूग सर्वसाधारण गट :*_
_*◆प्रथम क्रमांक :* नीलेश कमलाकर शिंदे, वाघवाडी, ता. वाळवा, सांगली (७२ क्विंटल २९० किलो),_
_*◆द्वितीय :* शंकर रामचंद्र कदम, इंदोली, ता. कराड, सातारा (४९ क्विंटल ३६० किलो),_
_*◆तृतीय :* अधिक मारुती माने, मानेगाव, ता. पाटण, सातारा (४४ क्विंटल ८३५ किलो)_
*_(२) नाचणी आदिवासी गट :_*
_*◆प्रथम :* काकड्या जानू लहांगे, उज्जेनी, ता. वाडा, पालघर (२२ क्विंटल ६२ किलो),_
_*◆द्वितीय :* अनंता अर्जुन धिंडा, सातरोडे, ता. वाडा, पालघर (१६ क्विंटल ७३ किलो),_
_*◆तृतीय :* मंगेश शिंग्या ठाकरे, मांगरुळ, ता. वाडा, पालघर (७ क्विंटल १८ किलो).
एक मंत्रीपद आणि विधान परिषदेची आमदारकी द्या; रामदास आठवलेंची मागणी
*_(३) नाचणी सर्वसाधारण गट :_*
_*◆प्रथम :* निंगोजी बारकू कुंदेकर, शेवाळे, ता. चंदगड, कोल्हापूर (७२क्विंटल ४२ किलो),_
_*◆द्वितीय :* सदानंद नरसू गावडे, नांदवडे, ता. चंदगड, कोल्हापूर (५२ क्विंटल ८० किलो),_
_*◆तृतीय :* सुलभा सटुप्पा गिलबिले, नागणवाडी, चंदगड, कोल्हापूर (५१ क्विंटल ६० किलो)._
*_(४) मका आदिवासी गट :_*
_*◆प्रथम :* अर्जुन दामू प्रधान, घोगळ, ता. नवापूर, नंदुरबार (९३ क्विंटल २० किलो),_
_*◆द्वितीय :* शिवदास शांतू गावित, वडसत्रा, ता. नवापूर, नंदुरबार (८२ क्विंटल ४५ किलो),_
_*◆तृतीय :* लक्ष्मण किसन मावस्कर, लवादा, ता. धारणी, अमरावती (४७ क्विंटल)._
*_(५) मका सर्वसाधारण गट :_*
_*◆प्रथम :* क्रमांक सिद्धेश्वर महादेव जरे, खवासपूर, ता. सांगोला, सोलापूर (१७७ क्विंटल ०४ किलो),_
_*◆द्वितीय :* ईश्वर भीमराव कोळेकर, महूद, ता. सांगोला, सोलापूर (१५७ क्विंटल २२ किलो),_
_*◆तृतीय :* गिरजाप्पा रावसाहेब यमगर, घेराडी, ता. सांगोला, सोलापूर (१५६ क्विंटल ७५ किलो)._
*_(६) बाजरी आदिवासी गट :_*
_*◆प्रथम :* बाजीराव रोडू चौरे, बाभुळणे, ता. सटाणा, नाशिक (३३ क्विंटल),_
_*◆द्वितीय :* देवजी शिवबा पवार, मालीवाडे, ता. सटाणा, नाशिक (२६ क्विंटल ७० किलो),_
_*◆तृतीय :* रामदास खंडू चौधरी, अंजडे, ता. सटाणा, नाशिक (२५ क्विंटल १० किलो)._
*_(७) बाजरी सर्वसाधारण गट :_*
_*◆प्रथम :* प्रकाश हणमंत गायकवाड, पिसाळवाडी, ता. खंडाळा, सातारा (१०० क्विंटल १२ किलो),_
_*◆द्वितीय :* छबन नारायण गायकवाड, भादे, ता. खंडाळा, सातारा (९३ क्विंटल ३५ किलो),_
_*◆तृतीय :* दशरथ नामदेव गेंड, मनकर्णवाडी, माण, सातारा (९२क्विंटल७० किलो)._
*_(८) ज्वारी आदिवासी गट :_*
_*◆प्रथम :* होरुसिंग बावा ठाकरे, बंधारा, ता. नवापूर, नंदुरबार (६७ क्विंटल ५० किलो),_
_*◆द्वितीय :* हेमशा नरमा ठाकरे, बंधारा, ता. नवापूर, नंदुरबार (६३ क्विंटल ८० किलो),_
_*◆तृतीय :* दत्तू नुरजी गावित, रायगण, ता. नवापूर, नंदुरबार (४४ क्विंटल ६० किलो)._
*_(९) ज्वारी सर्वसाधारण गट :_*
_*◆प्रथम :* तानाजी श्रीपती यादव, गमेवाडी, ता. कराड, सातारा (४६ क्विंटल २८१ किलो),_
_*◆द्वितीय :* पांडुरंग आनंदा यादव, गमेवाडी, ता. कराड, सातारा (४१ क्विंटल ५०६ किलो),_
_*◆तृतीय :* संदीप रामचंद्र यादव, गमेवाडी, ता. कराड, सातारा (३९ क्विंटल ५१७ किलो)._
*_(१०) भात आदिवासी गट :_*
_*◆प्रथम क्रमांक :* गणपत येसू घोडे, पारगाव मढ, ता. जुन्नर, पुणे (११५ क्विंटल),_
_*◆द्वितीय :* बबन वाळू थोरात, देवचोळे, ता. भिवंडी, ठाणे (११२ क्विंटल ०७ किलो),_
_*◆तृतीय :* मंजुळाबाई तान्हाजी कोंढावळे, तळेरान, ता. जुन्नर, पुणे (१११ क्विंटल)._
*_(११) भात सर्वसाधारण गट :_*
_*◆प्रथम :* क्रमांक साहेबराव मण्याबा चिकणे, सोनगाव, ता. जावळी, सातारा (१५४ क्विंटल ५७ किलो),_
_*◆द्वितीय :* महेश रामदास संसारे, मागवली, ता. वैभववाडी, सिंधुदुर्ग (१५० क्विंटल),_
_*◆तृतीय :* योगिता वासुदेव भोसले, घानेगडवाडी, ता. वैभववाडी, सिंधुदुर्ग (१४८ क्विंटल)._
*_(१२) तूर आदिवासी गट :_*
_*◆प्रथम क्रमांक :* माणिक विष्णू घुर्वे, भेंडाळा, ता. सावनेर, नागपूर (२८ क्विंटल ५० किलो),_
_*◆द्वितीय :* शांताराम वामन नागोसे (२७ क्विंटल २५ किलो),_
_*◆तृतीय :* सुरेश जंगलू कुंभारे, जटामखोरा, ता. सावनेर, नागपूर (२६ क्विंटल १० किलो)._
*_(१३) तूर सर्वसाधारण गट :_*
_*◆प्रथम :* संजय विठ्ठल सत्यकार, खंडाळा, ता. पारशिवनी, नागपूर (४० क्विंटल),_
_*◆द्वितीय :* प्रताप शिवाजी चव्हाण, बाभूळतेल, ता. वैजापूर, औरंगाबाद (३९ क्विंटल ०५ किलो),_
_*◆तृतीय :* सुरेश विठ्ठल काटे, बाभूळतेल, ता. वैजापूर, औरंगाबाद (३८ क्विंटल ७२ किलो)._
*_(१४) सोयाबीन आदिवासी गट :_*
_*◆प्रथम :* महादेव दिवाण नन्नावरे, मिनझरी, ता. चिमुर, चंद्रपूर (४२ क्विंटल ५० किलो),_
_*◆द्वितीय :* धनराज गोविंदा हनवते, निमढेला, ता. वरोरा, चंद्रपूर (४० क्विंटल),_
_*◆तृतीय :* मारोती पांडुरंग रणदिवे, मजरा, चिमुर, चंद्रपूर (४० क्विंटल)._
*_(१५) सोयाबीन सर्वसाधारण गट :_*
_*◆प्रथम :* सुरेश शंकरराव पाटील, उंडाळे, ता. कराड, सातारा (७९ क्विंटल),_
_*◆द्वितीय :* शिवाजी विष्णू पाटील, घुणकी, ता. हातकणंगलेकर, कोल्हापूर (७४ क्विंटल ६० किलो),_
_*◆तृतीय :* सुहास शंकर कदम, इंदोली, ता. कराड, सातारा (७३ क्विंटल)._
*_(१६) उडीद सर्वसाधारण गट :_*
_*◆प्रथम :* संतोष बळीराम काटमोरे, पिंपरी, ता. बार्शी, सोलापूर (४४ क्विंटल १४ किलो),_
_*◆द्वितीय :* राजकुमार सिद्धप्पा हलकुडे, बोळकवठे, ता. दक्षिण सोलापूर, सोलापूर (३१ क्विंटल ५६ किलो),_
_*◆तृतीय :* सुजाता शहाजी कमटकर, राजेवाडी, ता. जामखेड, अहमदनगर (३० क्विंटल २० (किलो)._
_*(१७) मूग सर्वसाधारण गट :*_
_*◆प्रथम :* मंगल सुदाम रासकर, वाघुडेब, ता. पारनेर, अहमदनगर (३२ क्विंटल ४२ किलो),_
_*◆द्वितीय :* विजय तात्यासाहेब देवकर, मोही, ता. माण, सातारा (२५ क्विंटल ४६ किलो),_
_*◆तृतीय :* मनोहर शंकर देवकर, मोही, ता.मांन,सातारा