kiss day : दररोज किस करण्याचे हजारो फायदे
आम्ही नव्हे, संशोधन सांगतंय
थिंक टँक न्यूज नेटवर्क (नाना हालंगडे)
व्हॅलेनटाईन वीकचा एक महत्त्वाचा दिवस म्हणजे आज किस डे आहे. प्रेम व्यक्त करण्याचं माध्यम म्हणून किस करण्याकडे पाहिलं जातं. अनेकजण सेक्स अशा दृष्टीने किसकडे बघतात. मात्र, किस करण्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. किस केल्याने एनर्जी मिळते आणि आत्मविश्वास वाढतो. असे हजारो फायदे यातून होतात. यातील निवडक फायद्याची माहिती आम्ही आजच्या सुमंगलदिनी सांगणार आहोत. Kiss Day
किस डे चा इतिहास (History of Kiss Day)
किस डे चा इतिहास खूप रंजक आहे. कोणतीही व्यक्ती आपल्या प्रियजनांना किस करते. परंतु जेव्हा आपण त्याचा इतिहास पाहतो तेव्हा हे लक्षात येते की त्याचे प्रचलन 6 व्या शतकाच्या आसपास सुरू झाले. असे म्हणतात की 6 व्या शतकात फ्रान्समध्ये प्रेम व्यक्त करण्यासाठी नृत्याचा वापर केला जात होता आणि नृत्य संपल्यानंतर लोक एकमेकांचे चुंबन घेऊन प्रेम व्यक्त करायचे. हळूहळू हे प्रचलन खूप पुढे गेले आणि नंतर तो दिवस किस-डे म्हणून साजरा केला जाऊ लागला.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, किस करताना चेहऱ्याचे ३४ चेहऱ्याचे स्नायू आणि शरीरातील ११२ मुद्रा स्नायू सक्रिय होतात. यामुळे स्नायू घट्ट व टोन्ड राहतात. किस केल्याने चेहऱ्यातील रक्ताभिसरण वेगाने वाढते, ज्यामुळे त्वचा तरूण आणि सुंदर दिसते. किस वृद्धत्व टाळण्यासाठी आणि शारीरिक समस्या दूर करण्यासाठी कार्य करते.
तुम्ही तुमच्या जोडीदाराचे ओठ, गाल इत्यादींवर चुंबन घेतले असेल. चुंबन केल्याने परस्पर प्रेम आणि आपुलकी येते, नात्यात गोडवा येतो, आनंद होतो, सकारात्मक ऊर्जा येते, पण तुम्हाला माहित आहे का की चुंबनाने वजनही कमी होते? होय, एका अभ्यासानुसार चुंबन केल्याने वजन कमी होऊ शकते.
प्रेमाचा आठवडा म्हणजेच व्हॅलेंटाईन वीक (Kiss Day 2023) सुरू आहे. व्हॅलेंटाईन वीक दरम्यान, प्रेमळ जोडपे त्यांच्या जोडीदारांना वेगवेगळ्या प्रकारे प्रभावित करण्याचा प्रयत्न करतात. ते एकमेकांची स्तुती करतात आणि गुलाबाचे फूल, चॉकलेट, सॉफ्ट टॉय अशा अनेक प्रकारच्या भेटवस्तू देतात. या आठवड्याची सुरुवात रोज डेने होते, त्यानंतर प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे, किस डे आणि नंतर व्हॅलेंटाइन डे येतो. पण या सगळ्या दिवसात प्रत्येक कपल किस डेची आतुरतेने वाट पाहत असतो. यंदा हा डे १३ फेब्रुवारीला साजरा केला जाणार आहे.
अनेकजण किस करून त्यांचं प्रेम व्यक्त करतात. मग ते हा किस गालावर, मानेवर किंवा हातावर कुठेही करू शकतात. अनेकजण सेक्स अशा दृष्टीने किसकडे बघतात. ते तसं असेलही. पण किस करण्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. किस केल्याने लोकांना एनर्जी मिळते आणि व्यक्तीमध्ये आत्मविश्वास वाढतो. चला तर मग किस करण्याचे आरोग्यासाठी तुम्हाला कसे फायदे होतात.
चुंबन वजन कसे कमी करते?
एका मिनिटासाठी चुंबन घेतल्यास शरीरातील कॅलरीज जलद बर्न होतात हे अभ्यासात समोर आले आहे. यामुळे दोन ते सहा कॅलरीज बर्न होऊ शकतात. याव्यतिरिक्त, शरीरातील चयापचय देखील चालना दिली जाऊ शकते. जेव्हा तुम्ही ट्रेड मिलमध्ये जॉगिंग करता तेव्हा तुम्ही एका मिनिटाला सुमारे 11 कॅलरीज बर्न करू शकता. या अभ्यासाची पुष्टी करण्यासाठी, वजन कमी करण्यासंदर्भात अनेक लोकांवर सर्वेक्षण देखील केले गेले.
या सर्वेक्षणात असे समोर आले आहे की चुंबन केल्याने शरीरातील कॅलरीज बर्न होतात, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. जोडीदाराचे चुंबन घेतल्यावर मनाला आनंद मिळतो. आनंदी राहिल्याने तुमचे मानसिक आरोग्य चांगले राहते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जोडीदारासोबत शारीरिक संबंध असताना चुंबन घेतल्याने शरीरातील 8-9 कॅलरीज ऊर्जा खर्च होते. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला 390 वेळा किस केले तर तुमचे वजन 1/2 किलो कमी होऊ शकते.
चुंबन” आरोग्यासाठी फायदेशीर
“चुंबन” केवळ तुमचे प्रेम आणि भावना व्यक्त करत नाही. तुम्हाला हे जाणून आश्चर्य होईल की एक चुंबन तुमच्या आरोग्याशी संबंधित अनेक समस्या सोडवण्यासाठी देखील उपयुक्त आहे. एवढंच नाही तर हृदयाचे आजारही चुंबनाने दूर होऊ शकतात. वैज्ञानिक अहवालानुसार चुंबनामुळे ऑक्सीटोसिन हार्मोनची पातळी वाढते आणि त्यामुळे आपल्या शरीरात नैसर्गिकरित्या थंड ठेवणारे हार्मोन एंडोर्फिन वाढते.
कॅलरीज वाढतात
२०१४ मध्ये मायक्रोबायोम जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यास अहवालानुसार, एक रोमँटिक किस केल्याने २ ते ३ कॅलरीज तर भावनिक किस केल्याने ५ पेक्षा जास्त कॅलरीज कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. किस घेताना जेवढा जास्त वेळ लावाल तेवढ्या कॅलरीज बर्न होतील. इतर शारीरिक क्रियाकलापांमुळे ज्या प्रकारे कॅलरीज कमी होतात अगदी त्याच प्रकारे.
आनंदाची अनुभूती
किस केल्याने शरीरात फील-गुड केमिकल्सची निर्मिती होत असल्याने शरीरात ओक्सीटोसिन जे नैसर्गिक आरामदायक हार्मोन आहे, याची पातळी वाढते. याने रिलॅक्स आणि आनंदाची अनुभूती होते.
रोग प्रतिकारशक्ती
किस केल्याने दोघांच्या शरीरात रासायनिक बदल होऊन त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. याने शरीर मजबूत होऊन आजारांपासून लढण्याची क्षमता वाढते.
रक्त सर्कुलेट करण्यास मदत
किसिंगमुळे पुरूषांचे हार्मोन्स महिलेच्या तोंडात जाते, ज्यामुळे टेस्टोस्टेरोन सारख्या हार्माेन्सचा संचार होतो. अशात महिलेत उत्तेजना वाढते आणि परिणामस्वरूप सेक्सची करण्याची इच्छा जागृत होते. सोबतच एड्रेनालिन नावाचे हार्मोन्सही रिलीज होतात. जे हृदयापासून रक्त संपूर्ण शरीरात सर्कुलेट करण्यास मदत करतात.
ज्यांना उच्च रक्तदाबाची तक्रार आहे त्यांच्यासाठी किस एक प्रभावी उपचार आहे. चुंबन तज्ञ आणि लेखिका एंड्रिया डिमर्जियान म्हणतात की जेव्हा लोक किस घेतात तेव्हा त्यांच्या हृदयाची गती वाढू लागते. यामुळे रक्तवाहिन्या रुंद होतात आणि रक्तप्रवाह चांगला होतो, त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो.
जेव्हा लोक एकमेकांना किस करतात, मिठी मारतात किंवा प्रेम व्यक्त करतात तेव्हा मेंदूतील कोर्टिसोलची पातळी कमी होऊ लागते. यामुळे ऑक्सिटोसिन हार्मोन्स बाहेर पडतात, ज्यामुळे तणाव कमी होतो. सोप्या शब्दात, चुंबन मूड फ्रेश करते. अस्वस्थता आणि निद्रानाशासह चिंता कमी होऊ लागते.
वाद मिटतात
दोघांमधील वाद संपविण्यासाठी एक भावनिक किस महत्त्वाची भूमिका बजाविते. दोघांमधील वाद, आरोप-प्रत्यारोप याने सहज मिटतात.
ऑक्सिटॉसिनचं प्रमाण वाढतं
किस केल्याने शरीरात लव्ह हार्मोन म्हणजे ऑक्सिटॉसिनचं प्रमाण वाढतं आणि तुम्हाला रिलॅक्स वाटतं. सोबतच एड्रेनालिन नावाचे हार्मोन्सही रिलीज होतात. जे हृदयापासून रक्त संपूर्ण शरीरात सरर्क्युलेट करण्यास मदत करतात.
स्ट्रेस हार्मोन कमी होतात
किस करतेवेळी मेंदूत हॅपी हार्मोन्स रिलीज होता. ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळतो. या हार्मोन्समध्ये ऑक्सिटोसिन, डोपामाइन आणि सेरटोनिन यांचा समावेश आहे. याने प्रेमाची भावना वाढते. तसेच याने तुमच्यातील स्ट्रेस हार्मोन कार्टिसोलचं प्रमाणही कमी होतं
चेहऱ्याचा व्यायाम होतो
चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी चेहऱ्याचा व्यायाम आवश्यक असतो. किस केल्याने त्वचेच्या ३० स्नायुंचा व्यायाम होतो, ज्याने गाल टाइट होतात आणि चेहऱ्याचे सौंदर्य खुलते.
व्हॅलेंटाईन डे’ साजरा करतानाही ‘किस डे’ साजरा करण्याची प्रथा आहे. चुंबन केवळ जोडपे, प्रेमीयुगुलच करतात असे नाही तर तुम्ही त्या सर्वांना कपाळावर, गालावर प्रेमाने चुंबनही घेऊ शकता. चुंबन एक प्रेमळ शारीरिक हावभाव आहे. यामुळे आनंद वाढतो. परस्पर प्रेम वाढतं. तुम्हीही तुमच्या जोडीदाराचे, मुलांचे, पालकांचे, मित्रांचे, कधी प्रेमाने गालावर, तर कधी कपाळावर चुंबन घेत असाल.
तुम्ही तुमच्या जोडीदाराचे ओठ, गाल इत्यादींवर चुंबन घेतले असेल. चुंबन केल्याने परस्पर प्रेम आणि आपुलकी येते, नात्यात गोडवा येतो, आनंद होतो, सकारात्मक ऊर्जा येते, पण तुम्हाला माहित आहे का की चुंबनाने वजनही कमी होते? होय, एका अभ्यासानुसार चुंबन केल्याने वजन कमी होऊ शकते.
चुंबनाचे फायदे
- शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत होऊ शकते.
- दोन लोकांमधील नातं खूप घट्ट होतं.
- सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते आणि आनंद प्राप्त होतो.
- चुंबन शरीरातील चयापचय वाढवते, ज्यामुळे तणाव कमी होतो.
- एक जोरदार चुंबन शरीरातून 2-10 कॅलरीज कमी करू शकते, जे वजन कमी करण्यासाठी पुरेसे आहे.
- अनेक अभ्यासांमध्ये असेही म्हटले गेले आहे की चुंबन केल्याने चेहरा, मान, जबड्याचा स्नायू टोन होतो. चुंबन घेताना अनेक स्नायू काम करतात, ज्यामुळे चेहरा आकारात येतो.
- जेव्हा तुम्ही किस करता तेव्हा रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. शरीरात ऍन्टीबॉडीज रिलीझ होतात, जे बॅक्टेरिया नष्ट करतात.
- चुंबन तोंडात लाळेचे उत्पादन वाढवते, ज्यामुळे दातांमध्ये पोकळी निर्माण होण्यास प्रतिबंध होतो.
- रक्तदाब कमी होऊ शकतो, कारण चुंबनामुळे रक्तवाहिन्या पसरतात.
- चुंबन सेरोटोनिन, डोपामाइन सारखे आनंदी संप्रेरक सोडते, ज्यामुळे मूड सुधारतो. आनंद येतो.
- जर तुम्हाला हृदयविकारांपासून वाचवायचे असेल, तर तुमच्या जीवनसाथीला नक्की किस करा. यामुळे शरीरात एड्रेनालाईन नावाचा हार्मोन तयार होतो, जो हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असतो.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. Think Tank Live याची पुष्टी करत नाही. तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)