
थिंक टँक / नाना हालंगडे
प्रेमाचा महिना फेब्रुवारी सुरु झाल्यापासून जोडप्यांमध्ये व्हेलेंटाइन डेची उत्सुकता असते. प्रेम व्यक्त करण्यासाठी व्हेलेंटाइन वीक ही योग्य वेळ असते, त्यामुळे प्रेमयुगुलांसाठी व्हेलेंटाइन डे कोणत्या सणापेक्षा कमी नसतो, 7 फेब्रुवारी पासून व्हेलेंटाइन वीक ला सुरुवात झाली. आज 8 फेब्रुवारीला ‘प्रपोज डे’ साजरा केला जात आहे. मनातली भावना सांगण्यासाठी हा दिवस उत्तम आहे. त्यामुळे अनेक जण या दिवसाची वाट पाहात असतात. प्रपोज करण्यासाठी अनेकांकडून मोठी तयारीही केली जाते, परंतु काही जण मनातील भावना सांगण्यासाठी घाबरतात, तर काळजी करू नको आम्ही तुमच्यासाठी खास संदेश घेऊन आलो आहोत, ते संदेश पाठवून तुम्ही मनातील भावना व्यक्त करू शकता..
आयुष्यात खास व्यक्तीसोबत अतुट नाते जोडण्यासाठी कोणत्याही विशेष दिवसाची, क्षणाची किंवा कोणत्याही मुहूर्ताची खरं तर आवश्यकता नसते. आपली आवडती व्यक्ती जीवनात येण्यासाठी गरजेच्या गोष्टी असतात त्या म्हणजे ‘प्रयत्न’ आणि ‘वेळ’. या दोन्ही गोष्टींमुळे कोणतीही व्यक्ती अगदी आपसुकच आयुष्याच्या प्रवासात आपल्यासोबत जोडली जाते. तुम्हाला देखील स्पेशल व्यक्तीला प्रपोज करायचे आहे का? तर तिला/ त्याला एखादा छानसा मेसेज देखील पाठवा…
💕हाती हात देशील का
जन्मभराची साथ देशील का
सांग माझी होशील का?💕
🥀❤️हॅपी प्रपोझ डे!❤️🥀
समुद्राचं किनाऱ्याशी…
ढगांचं आभाळाशी…
मातीचे जमिनीशी..
तसंच अतुट नाते आहे…
माझे केवळ तुझ्याशीच…
आयुष्याच्या वाटेवर मला साथ तुझी हवीय
एकटेपणात तुझी सोबत हवीय
आनंदाने भरलेल्या या आयुष्यात
प्रेम फक्त तुझंच हवंय
महागडे गिफ्ट नको मला
तुझा भरपूर वेळ दे फक्त आणि फक्त मलाच
होकार असेल तर
तुझा हात दे माझ्या हातात
काही पावले माझ्या सोबत चाल..
पूर्ण कहाणी मी तुला सांगेन,
नजरेतून तुला जे कळलं नाही…
त्या भावना मी शब्दातून तुझ्यासमोर मांडेन
ना मला तुला गमवायचं आहे,
ना तुझ्या आठवणीत रडत बसायचंय,
देशील का मला कायम साथ?
राणी, सांग ना मला तुझ्या मनातील बात
💕नाही आज पर्यंत बोलता आले,
आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे…
नाही जगू शकत तुझ्याशिवाय,
इतकेच तुला सांगणार आहे…💕
🥀❤️Happy Propose Day !❤️🥀
💕माझ्या प्रत्येक वेदनेचे कारण आहेस तू
त्या सगळ्या वेदनांचे मलमही आहेस तू
तू आहेस म्हणून आहे माझ्या जीवनाला अर्थ
आता सोडून कुठेही जाऊ नकोस कारण जीवन माझे होईल व्यर्थ💕
❤️🥀Happy Propose Day !🥀❤️
💕आज मी शांत विचार केला
आणि मनात माझ्या तू आलीस / आलास
आता विचार केला सांगून टाकावे तुला
नाहीतर म्हणशील माझा नाद करु नका खुळा💕
❤️🥀प्रपोझ डे च्या शुभेच्छा!🥀❤️
💕विचार केला तुझ्यासाठी काहीतरी करावे खास
नंतर विचार केला माझ्या मनातल्या भावना सांगून
करावे तुझ्या मनासारखे खास💕
❤️🥀प्रपोझ डे च्या शुभेच्छा!🥀❤️
💕नातं तुझं माझं असचं फुलत जावं.
आता तरी तुझ्या माझ्या नात्याला एक नाव असावं💕
🥀❤️Happy Propose Day !❤️🥀
💕प्रेम केलं तुझ्यावर कोणता गुन्हा नाही केला
आज कबूल करतो काही प्लॅन नव्हता केला💕
🥀❤️Happy Propose Day !❤️🥀
💕आकर्षण कदाचित एका दिवसाचं असेल
पण मला ते रोज होतयं
याचा अर्थ मला तुझ्यावर प्रेम होतयं💕
❤️🥀Happy Propose Day !🥀❤️
💕गुलाबाच्या फुला,
काय सांगू तुला
आठवण येते मला
कारण प्रेम झालयं मला💕
🥀❤️प्रपोझ डे च्या शुभेच्छा!❤️🥀
💕माझं प्रेम मी तुला सांगून टाकलं,
आता तुझी पाळी
तुझ्या मनातील भावना येऊ दे तुझ्या ओठांवरी💕
🥀❤️Propose day chya shubhechha ❤️🥀
💕ओढ लागलीया तुला मिळवायची,
तु मला समजुन घेशील का..?
लागलंय वेड तुझ्या प्रेमाचं,
प्रेम तुझं देशील का..?
थांबव आता खेळ हा स्वप्नांचा,
कायमची माझी होशील का..?💕
❤️🥀Happy Propose Day !🥀❤️
💕एक थेंब अळवावरचा,
मोत्याचं रुप घेऊन मिरवतो
एक थेंब तुझ्या ओठांवरचा
माझं जग मोत्यांनी सजवतो💕
💕आपले प्रेम एक नाजूक फुल आहे
ज्याला मी तोडू शकत नाही
आणि सोडूही शकत नाही
कारण तोडले तर सुकून जाईल
आणि सोडले तर कोणीतरी घेऊन जाईल💕
❤️🥀Happy Propose Day…!🥀❤️
💕हृदयाच्या जवळ राहणारं,
कुणीतरी असावे,
असं तुला वाटत नाही का?
मी तर तुलाच निवडलं,
तू मला निवडशील का…?💕
🥀❤️Happy Propose Day !❤️🥀
💕पापण्यात लपलेली तुझी नजर
माझ्याकडे बघून लाजत आहे
तुझ्या पायातील पैंजण जणू
माझ्यासाठीच वाजत आहे💕
❤️🥀हॅप्पी प्रपोज डे!🥀❤️