थिंक टँक स्पेशलराजकारण

माजी आमदार दीपकआबा अजित पवारांसोबत

सांगोल्याच्या राजकारणाचे गणित बदलणार

Spread the love

माजी आमदार दीपकआबा साळुंखे – पाटील हे शरद पवार यांना आपले दैवत मानतात. शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी तो राजीनामा मागे घ्यावा यासाठी माजी आमदार दीपकआबा साळुंखे – पाटील यांनी भावनिक होऊन आवाहन केले होते. त्यामुळे एकूण राजकीय परिस्थितीचा विचार केल्यास माजी आमदार दीपकआबा साळुंखे – पाटील हे शरद पवार यांच्या सोबत जातील असा अंदाज होता. मात्र, हा अंदाज खोटा ठरला आहे. त्यांनी अजित पवार यांच्या गटात जाणे पसंद केल्याचे दिसत आहे.

थिंक टँक न्यूज नेटवर्क : डॉ. बाळासाहेब मागाडे
सांगोला तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार तथा पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात जाणे पसंद केल्याचे दिसत आहे. सध्या मुंबई येथील एमईटी इन्स्टिट्युटमध्ये सुरू असलेल्या अजित पवार गटाच्या स्टेजवर दीपकआबा दिसून आले. त्यामुळे अखेर शरद पवारांची साथ सोडून दीपकआबा हे अजित पवार यांच्या गटात गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपसोबत घरोबा करून उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) यांच्या या भूमिकेचे राज्यातील राष्ट्रवादीत मोठे पडसाद उमटले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सांगोला तालुक्यात पक्षाचे नेते तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील हे अजित पवार की शरद पवार (NCP Leader Sharad Pawar) यांच्यासोबत जाणार याची तालुकावासियांना मोठी उत्सुकता लागली होती.

राष्ट्रवादीच्या तब्बल चाळीस आमदारांसह अजित पवार हे भाजप, शिवसेनेच्या सरकारमध्ये सामील झाले असल्याची चर्चा होती. सध्या सुरू असलेल्या कार्यक्रमात तब्बल तीस पेक्षा अधिक आमदार उपस्थित असल्याचे दिसून येत आहेत. अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आले आहे. हा शरद पवारांना धक्का मानला जात आहे. एकनाथ शिंदे (Maharastra CM Eknath Shinde) यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीवर टीका करत महायुतीचे सरकार खाली खेचून भाजप सोबत घरोबा करून सत्ता स्थापन केली होती. त्याच राष्ट्रवादीला सोबत घेऊन आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सरकार चालवावे लागणार आहे.

अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचे नेते दीपकआबा साळुंखे-पाटील हे कोणत्या गटात जातील जाणार याची उत्सुकता होती.

दीपकआबा साळुंखे-पाटील अखेर अजित दादांसोबत
सांगोला तालुका हा राष्ट्रवादीचा (Sangola NCP) बालेकिल्ला समजला जातो. या तालुक्यात राष्ट्रवादीचं मोठे संघटन आहे. माजी आमदार दीपकआबा साळुंखे – पाटील (Ex MLA Deepak Salunkhe-Patil) हे तालुक्याचे नेतृत्व करतात. माजी आमदार दीपकआबा साळुंखे – पाटील यांचे शरद पवार यांच्या सोबत अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत. २००९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत माजी आमदार दीपकआबा साळुंखे – पाटील यांच्यावर शरद पवारांच्या प्रचाराची जबाबदारी होती. माजी आमदार दीपकआबा साळुंखे – पाटील हे सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष राहिलेले आहेत. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत.

मागील विधानसभा निवडणुकीत सांगोल्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडली जाईल असे अपेक्षित होते. मात्र नेहमीप्रमाणे ती जागा शेतकरी कामगार पक्षाकडे गेली. भाई गणपतराव देशमुख (SKP Leader Ganpatrav Deshmukh Sangola) यांनी निवडणुकीत न उतरता आपले नातू डॉ. अनिकेत देशमुख यांना उभे केले. वस्तुतः शेतकरी कामगार पक्षाच्या वर्षानुवर्षे पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला त्यावेळेस जागा सोडावी असा सर्वांचा आग्रह होता. मात्र तर झाले नाही. नाराज झालेल्या माजी आमदार दीपकआबा साळुंखे – पाटील यांनी तत्कालिक शिवसेनेचे उमेदवार शहाजी पाटील (Shivsena MLA Shahajibapu Patil Sangola) यांना साथ दिली. शहाजी पाटील हे मोठ्या मतांनी विजयी झाले.

अशा स्थितीत सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंखे पाटील हे कोणासोबत जाणार? असा प्रश्न सर्वांच्या मनात होता. ते चित्र आता स्पष्ट झाले आहे.

माजी आमदार दीपकआबा साळुंखे – पाटील हे लवकरच पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करतील अशी शक्यता आहे.

तालुक्यात उडाली खळबळ?
माजी आमदार दीपकआबा साळुंखे – पाटील हे शरद पवार यांना आपले दैवत मानतात. शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी तो राजीनामा मागे घ्यावा यासाठी माजी आमदार दीपकआबा साळुंखे – पाटील यांनी भावनिक होऊन आवाहन केले होते. त्यामुळे एकूण राजकीय परिस्थितीचा विचार केल्यास माजी आमदार दीपकआबा साळुंखे – पाटील हे शरद पवार यांच्या सोबत जातील असा अंदाज होता. मात्र, हा अंदाज खोटा ठरला आहे. त्यांनी अजित पवार यांच्या गटात जाणे पसंद केल्याचे दिसत आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका