45 आगारातील ३७६ कर्मचारी निलंबित
सरकारकडून आंदोलन आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न
पुणे : थिंक टँक न्यूज नेटवर्क
संप मागे घेण्याचे आवाहन करूनही एसटी कर्मचारी कोणतीच हालचाल करत नसल्याचे पाहून सरकारने कारवाईचे हत्यार उपसले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ प्रशासनाने केलेल्या कारवाईत ४५ आगारातील ३७६ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
संप सुरूच ठेवल्याकारणाने व संपात सहभागी झाल्यामुळे निलंबित केले आहे. मात्र मागण्या पूर्ण करण्याबाबत लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय संप मागे घेणार नाही याबाबत कर्मचारी ठाम आहेत.