ताजे अपडेटथिंक टँक स्पेशलशेतीवाडी
Trending

15 वर्षांपेक्षा जुनी वाहने हद्दपार?

1 एप्रिलपासून लागू होणार नियम

Spread the love

थिंक टँक / नाना हालंगडे

या नवीन नियमाच्या अंमलबजावणीनंतर, केंद्र सरकारची (Indian Government) वाहने, सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकारची वाहने, महामंडळांची वाहने, सार्वजनिक उपक्रम, राज्य परिवहन वाहने, सार्वजनिक उपक्रम आणि सरकारी अनुदानित संस्थांची वाहने, जी 15 वर्षांपेक्षा जुनी आहेत त्या भंगारात जाणार आहे. या वाहनांमध्ये लष्कराच्या (Indian Army) कोणत्याही वाहनाचा समावेश केला जाणार नाही. हा नवीन नियम 1 एप्रिल 2023 पासून लागू होणार आहे.

वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी भारत सरकारच्या (Indian Government) रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मोटार वाहन कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत 15 वर्षांहून अधिक जुन्या सर्व शासकीय वाहनांची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे. यामध्ये रजिस्ट्रीमध्ये नूतनीकरण केलेल्या कारचाही समावेश असेल. या सर्व गाड्या नोंदणीकृत भंगार केंद्रावर नष्ट केल्या जातील.

या नवीन नियमाच्या अंमलबजावणीनंतर, केंद्र सरकारची (Indian Government) वाहने, सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकारची वाहने, महामंडळांची वाहने, सार्वजनिक उपक्रम, राज्य परिवहन वाहने, सार्वजनिक उपक्रम आणि सरकारी अनुदानित संस्थांची वाहने, जी 15 वर्षांपेक्षा जुनी आहेत त्या भंगारात जाणार आहे. या वाहनांमध्ये लष्कराच्या (Indian Army) कोणत्याही वाहनाचा समावेश केला जाणार नाही. हा नवीन नियम 1 एप्रिल 2023 पासून लागू होणार आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सांगितले होते की, 15 वर्षांहून अधिक जुनी सरकारी वाहने (Government New Policy) भंगारात टाकण्याची आम्ही तयारी करत आहोत. त्यानुसार त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्या मार्गदर्शनाखाली या नियमाशी संबंधित फाइलवर स्वाक्षरी केली होती. ज्याचा सर्व राज्य सरकारं देखील अवलंब करतील. दरम्यान, हा नियम लागू झाल्यानंतर रस्त्यांवरून बरीच सरकारी जुनी वाहनं गायब झाल्याचं दिसणार आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात रस्ते वाहतूक मंत्रालयाने (Ministry of Road Transport) एक मसुदा जारी केला होता, ज्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारद्वारे वापरण्यात येणारी 15 वर्षे जुनी वाहने स्क्रॅप (Government New Policy) करणे आवश्यक असल्याचं म्हटलं होत. हा नियम सर्व महामंडळ आणि परिवहन विभागाच्या बस आणि वाहनांना लागू होणार होता. त्यावर सरकारने सूचना आणि हरकतींसाठी 30 दिवसांची मुदत दिली होती आणि आता हा नियम लागू होणार आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका